Baudhik Khurak
Baudhik Khurak
Untitled Document
कौटिल्य अर्थशास्त्र आणि आधुनिक व्यवस्थापन - इंद्रियजय हे सर्व शास्त्रांचे सार
(1)

  

  शोचाशौतम मात्यानां राजा मार्गेत समिभि

   वरील तिन्ही प्रकारच्या उपधा काही कारणपरत्वे अशक्य ठरल्यास कौटिल्य नेहमीचा सर्वसामान्य असा गुप्तहेरांचा पर्याय सुचवितो. उपाधींची उपाययोजना टोकाची असावी याची कौटिल्याला जाणीव असावी म्हणूनच सहजशक्य असलेला पर्याय तो देतो. या पर्यायाने परीक्षा घेणारे व परीक्षा ज्यांची घ्यायची त्या दोघांच्याही राजनिष्ठेचा कस लागणे शक्यतेच्या कोटीत येते.

   प्रत्येक राज्यकर्त्याचे गुप्तहेर खाते असतेच. प्रभु रामचंद्रानंतर ज्याच्या राज्यकारभाराबद्दल आपल्या मनात सदैव आदरभाव वसावा अशा शिवछत्रपतींच्या गुप्तहेर खात्यातील बहुरुपी असलेल्या बहर्जी नाईकाची इथे आठवण होते.

   गुप्तहेर खाते हे कोणत्याही शासकाचा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग होय. लोकांत त्यांचा दरारा असला म्हणजे प्रजेचे वर्तन बेशिस्त असत नाही. हा राजेशाहीचाच नव्हे तर लोकशाहीचा एक पायंडा असतो. गुप्तहेर खात्याचा संबंध अंतर्गत सुरक्षा व सीमेवरची आणि सीमेबाहेरील आंतरराज्य सुरक्षा यांच्याशी असतोच. म्हणूनच गुप्तहेर खाते किती कार्यक्षम आहे याला शासन पद्धतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

   वैदक काळ संपल्यानंतर जैन व बौद्ध या धर्माचा पगडा देशी समाजाच्या मनावर बसला होता. आद्य शंकराचार्यांनी हिंदूधर्म पद्धतीतील अनेक जाचक कर्मकांडे दूर करून हिंदूधर्माचे एक प्रकारे पुनुरुज्जीवन केले. शंकराचार्यांचे हे पुनुरुज्जीवन प्रतिक्रिया स्वरूपाचे असेलही. पण या सगळ्या वातावरणात हिंदू समाज एका विवक्षित संभ्रमाच्या अवस्थेत गुरफटला गेला हे नाकारण्यात अर्थ नाही. त्यातूनच हिंदूसमाज दुभंगल्या अवस्थेत वावरत राहिला. ज्यावेळी एकाद्या मोठ्या व विचारवंत देशात अशी सामाजिक अस्थिरता माजते त्यावळी त्याचा फायदा उठविण्यासाठी प्रयत्न बाह्य शक्ति घेतच असतात. किंबहुना ते एक प्रकारचे अशा बाह्य शक्तींना आमंत्रणच असलेला मानवी इतिहासाचा एक मोलाचा बोध आहे.

   राज्यशासनाच्या पद्धतीतील होणाऱया चुका आणि त्यात आवश्यक असणाऱया सुधारणा यांतल्या अगदी बारीक सारीक परंतु तत्काळ किंवा कालांतराने होणारे त्यांचे दुष्परिणाम यांवर आपल्या तल्लख बुद्धीने सखोल चिंतेने कौटिल्याने किती काम केले असेल याची साक्ष पदोपदी त्याच्या अर्थशास्त्रात पाहवयास मिळते.

   फार मोठी ऐतिहासिक देणगी

   ऐतिहासिक दृष्ट्या चंद्रगुप्त ही फार मोठी देणगी त्याने प्राचीन भारतीय इतिहासाला दिलेली आहे. चंद्रगुप्ताने परक्या ग्रीक सत्तेच्या सैन्याची आपल्या पहाडी सैन्याच्या आधारे कत्तल उडवून त्यांच्यापैकी काही लोकांना त्यांच्या देशात हाकलून लावले. सिकंदर म्हणजेच अलेक्झांडरच्या आक्रमणावर ताण करून अखिल आर्यावर्त पादाक्रांत करण्यास आलेल्या सीरियाचा बादशहा सेक्युलसला शरण आणून आपल्या शर्तीवर तह करावयास भाग पाडणाऱया आणि आपल्या स्वतच्या राज्याच्या सीमा काबूलकंदहारप र्यंत नेऊन भिडविणाऱया चंद्रगुप्ताची कर्तबगारी मोठी असली तरी नंदवंशाचा निपात करण्याचे कृत्य न आवडलेले लोकही होतेच. शिवाय तो दासीपुत्र असल्याने त्याचे कुळ हीन दर्जाचे लोक मानीत होते. अनेक आसपासचे राजे त्याने आपले मांडलिक बनवले होते तरी त्याचे ऐश्वर्य त्यांना मनातून खटकत होते व ते त्याच्या अपकर्षाची इच्छा करीत होते. अर्थातच अशा परिस्थितीत चंद्रगुप्ताला सम्राटपदाला पोहोचवायचे तर राजनिष्ठ अमात्य व मंत्री ही पहिली आवश्यकता होती म्हणून त्याचा `मेंटॉर' कौटिल्याला चार गोष्टींवर विशेष भर द्यावा लागला असावा. निष्ठावान मंत्रिमंडळ, राजनिष्ठ प्रजा आणि राज्याचा भक्कम आर्थिक पाया आणि नैतिक आचरण. म्हणूनच त्याने जे सखोल चिंतन व मनन यातून त्याने `अर्थशास्त्र' असे आपल्या या शासकीय व्यवस्थापनाला नाव दिले असावे.

   उपरोक्त चार गोष्टींच्या अनुषंगाने त्याने आपले हे व्यवस्थापन चौखांबी केले ते असे-

   1) साङ्ख्ययोगो लोकायतं चेत्यान्वीक्षका

   2) धर्मोधर्मो त्रय्याम

   3) अर्थेनर्थो वार्तायाम्

   4) नयानयौ दण्डनित्यां बलाबले चैतासां

AddThis Social Bookmark Button
 
Untitled Document
ऑपरेशन-माधव देवीदास मांजरेकर

  हार्ट ट्रान्सप्लान्ट करायची केस होती. पेशंटला अ‍ॅनेस्थेशिया दिला होता. नर्स बोलवायला आली. मी ओ.टी. मध्ये निघालो. हातामध्ये केस पेपरचं पॅड होतं. साधारण साठीचा गृहस्थ होता. क्वाड्रूपल ब्लॉक होते. शिवाय दोन वाल्व एसिनक्रोनस होते. त्यामुळे बायपास करुनदेखील काही उपयोग नव्हता. बाकी सगळं वॉज ओके - बी.पी. गूड, शुगर नॉर्मल, सी.टी. क्लिअर. व्यसन नाही. वजन व्यवस्थित. आम्ही ट्रान्सप्लान्ट करायचा निर्णय घेतला. बाहेर त्याची बायको बसली होती. डॉक्टर ऑपरेशन थेटरमध्ये कितीही तरबेज असला तरी ऑपरशन थेटरबाहेरचा हा प्रसंग त्याला दर वेळेला जड जात असतो. शेवटी वी आर ऑल्सो जस्ट मॉर्टल्स. आम्ही आफ्टर ए सर्टन लेव्हल काही करु शकत नाही. अखेरीस "वैद्यो नारायण हरि:" असं म्हणावं लागतंच आम्हालासुद्धा कधी कधी. पण लोकांना ते नेहमी कळतंच असं नाही. "डॉक्टर, काहीही करा, पण प्लीज यांना वाचवा -", "डॉक्टर पैशांकडे पाहू नका. वाट्टेल तेवढे ओता, पण ह्यांना वाचवा -". इट जस्ट डजन्ट वक दॅ ट वे. "विश अस लक", असं काहीतरी वाक्य मनाशी योजून मी त्या बाईंपाशी पोहोचलो. बाई शांत होत्या. "किती वेळ लागेल?" त्यांचा प्रश्न आला. "वेल, युजुअली चार तास, गीव्ह ऑर टेक अ‍ॅन अवर ऑर टू . तुम्ही थांबणार आहात?" "हो. ऑड्स काय आहेत?"

   मी थोडासा भांबावलो. मला हा डायरेक्ट प्रश्न अपेक्षित नव्हता. म्हणालो, "ही इज अदरवाईज डुइन्ग एक्सेलन्ट. सो वी विल सी.""गुड लक डॉक्टर. आय विल वेट हिअर अ‍ॅन्ड प्रे." मी त्यांना खांद्यावर थोपटलं आणि स्क्रबिंग करायला आत शिरलो. स्क्रब करुन अ‍ॅप्रन चढवला, टोपी घातली, मास्क बांधला आणि ओ.टी मध्ये आलो.

   असली ट्रान्सप्लान्ट ऑपरेशन्स करायला जाताना मला नेहमी आपण एखाद्या मोठया यागामध्ये सामिल होत आहोत असं वाटत आलंय. दंड, बाही, मनगट, बोटं, नखं, क्यूटिकल्स, मी स्वच्छ स्वच्छ करीत जातो. वर पुन्हा ग्लोव्ज घालतो. पेशंटचेही तसंच. शेविंग, स्पंज बाथ, स्क्रबिंग करीत त्याला एकीकडे स्टराईल केलं जात असतं. शेजारीच डोनर हार्ट एका कलर बॉक्स मध्ये आलेलं असतं. पेशंटपाशी जाण्याअगोदर त्या डोनर हा्र्ट ची परीक्षा होते. नुकतंच सोललेलं चिकन असावं तसं काहीसं ते दिसत असतं. रंगही तसाच. आणि बुळबुळीत. ते मानवी शरीरात पुन्हा जोडायला जेमतेम अर्धा पाऊण तास लागत असतो. सक्यूलेशनमध्ये हवा जाऊ नये म्हणून शेवटचे पाण्याखालचे, खरं तर रक्ताखालचे, टाक. आजूबाजूला एवढी आधुनिक यंत्रणा असूनदेखील काहीही दिसत नसतं. फक्त बोटांच्या पेरांनी सुईचा अग्रभाग चाचपडायचा आणि शिलाई करायची. शिवण फार खोलवर जाता कमा नये - आणि फार उथळही राहता कामा नये - नाहीतर सगळे टाक आतल्या आत उसवण्याचा संभव असतो. स्टिचेस घालता घालता नवं हृदय रक्ताने भरुन येऊ लागतं. आणि शेवटचा टाका ते पुरेपूर भरायच्या सुमारास टाईम करावा लागतो. मोमेन्ट अर्ली वुड बी टू अर्ली, मोमेन्ट लेट वुड बी टू लेट. नंतर दोन्ही क्लॅम्प्स काढले जातात आणि ब्लड आपापाल्या प्रेशरने सर्क्य़ूलेट होऊ लागतं. आता पुढल्या पाच मिनीटात वैतरणीच्या अल्याड की पल्याड असल्याचा निर्णय होतो. नवं हृदय थाड थाड उडू लागतं. स्वत:चा सूर गवसू पाहतं. एखादा मासा रक्ताच्या बादलीत तडफडावा तसा. म्लान पडलेलं नवं हृदय गुलाबी गुलाबी होतसर गेलं तर ते या नव्या शरीरामध्ये तगल्याची खात्री होते. आम्ही हु्श्श्य करतो. क्षणभरातच ओ.टी. मध्ये एका वेगळ्याच आनंदाची लहर पसरते. हाय फाय होतात. कॉन्गॅच्य़ूलेशनच्या फरी झडतात. पणे तेच हृदय गडद लाल होत काळवंडत गेलं की भयाण शांतता पसरते. आम्ही नायलॉन नंबर दोनच्या दोराने छाती पुन्हा शिवतो. ग्लोव्ज काढतो. टाईम ऑफ डेथचा उच्चार करतो. आणि बाहेर सॉरी म्हणायला जातो.

   पेशटला अगोदरच स्क्रब केलं होतं. मी कट घेतला. क्लॅम्प्स लावले. जुनं हृदय काढलं. आता पेशंट हार्ट लंग मशीनवर जिवंत होतो. नवं हार्ट इन्सर्ट केलं. स्टिचेस घातले. सारं काही क्लॉकवर्क सारखं होत गेलं. शेवटचा टाका झाला. हार्ट चुळबूळ करु लागलं. पण त्याला सूर सापडेना. ते अरिद्मिक होऊ लागलं. आम्ही् मिनीटभर थांबलो. पण हार्ट कलर जसा डार्क होत गेला तसा मग डिफीब्रिलेटर चार्ज केला. वन, टू , थ्री, क्लिअर. शॉक दिला. हृदय धाडकन उडालं. पुन्हा वन, टू ,थ्री, क्लिअर. पुन्हा एकदा धाड. आणि क्षणातच ई.सी.जी. ऑडिओ बीप्सवर टीकटीक- टीकटीक - बीट्स स्थिर झाल्या. हार्ट व्यवस्थित सुरु झालं. आम्ही सगळ्यांनी एवढा वेळ कोंडू न धरलेला श्वास सोडला. त्या मिनीटभरात कपाळाला घाम फुटला होता. मी थोडासा बाजूला झालो. रिमूप व्हायला दहा सेकंद लागले. नर्स म्हणाली "कॉन्ग्रॅट्स डॉक्टर" - तेव्हा भानावर आलो. "लेट्स कव्हर हिम अप." आम्ही छाती क्लोज केली. ओ.टी. बाहेर आलो. टोपी काढली. मास्क सोडला. सिन्कपाशी जाऊन गार पाणी चेह-यावर फवारलं. मिनीटभर टॉवेलमध्ये तोंड खुपसून श्वास घेत राहिलो. चष्मा पुसत बाहेर आलो. दोन डोळे अधीरतेने माझी वाट पाहत होते. "डॉक्टर -"

   मी हसलो. "इट्स ऑल राईट. रिलॅक्स."
किंचित उभ्या राहिलेल्या त्या बाई, पुन्हा बसल्या, "ओह, थॅन्क्स -"
मी खांद्यावर पुन्हा थोपटलं. तशा बाई बसल्या ठिकाणीच माझ्या अंगावर कोसळल्या.
"मॅडम -". मी बाईंना सावरायला गेलो. तशा त्या आणखीनच घरंगळल्या. पल्स पहायचा प्रयत्न केला.
"नर्स -"
स्टाफ धावत आला. कुणीसं स्ट्रेचर आणलं. मात्र बाई वैतरणीच्या पल्याड गेल्या होत्या. हार्ट फेल. मी घड्याळाकडे पाहिलं. टाईम ऑफ डे थ - टू ट्वेन्टी फाइव्ह.

AddThis Social Bookmark Button
 
विकार -माधव देवीदास मांजरेकर

   काल..

   न्यूयार्क शहराच्या मध्यावर ते हॉटेल होतं. टोलेजंग इमारतीचं. दरवाज्यात बेलबॉय कडक पोशाखात उभे होते. राजदुतांनी लिमोसीन पोर्चमध्ये थांबताच एक जण दरवाजा उघडायला अदबीने पुढे आला. तोवर दुस-याने पलीकडून सामान ताब्यात घेतले. राजदूत हॉटेलमध्ये आले. समोरच संगमरवरी लॉबीमध्ये दहा हत्तींच्या सोंडेतून कारंजं धरलेलं होतं. कोप-यात एक खरंखुर पन्नास फुटी पाम ट्री होतं. मे महिन्यातील भर दुपार असतांनादेखील, झुंबरांची योजना छतामधील स्कायलाईटला पूरक ठरेल अशीच केली होती. कुठुनसे मोझार्टचे मंद सुर येत होते. "सिंफनी वॅन एट उन - इट्स ऑल अबाऊट आमूर...", राजदुतांच्या मनात आलं. इतक्यात एक परिचारीका कातडी बांधणीमध्ये कागदपत्र घेऊन पुढे आली आणि राजदुतांकडे देत त्यांना लिफ्टपाशी घेऊन गेली. त्यातील अमेरीकन प्रेसिडेंन्ट्ची स्वाक्षरी असलेलं ग्रिटीन्ग कार्ड वाचत राजदूत त्या चकचकीत काचेच्या लिफ्टमध्ये शिरलें आणि काही सेकंदातच चोपन्नाव्या मजल्यावरच्या आपल्या पेन्टहाऊसमध्ये पोहोचले. पेन्टहाऊस मध्ये शिरताच सिटिंग रुम, आतल्या बाजूला मास्टर बेडरुम, फ्रीज-मायक्रोव्हेसहित किचन, सुमारे दहाबारा माणसे बसू शकतील एवढी आणि सेक्यूअर ऑडिओ/व्हिडिओ लाईनने अद्ययावत असलेली कॉन्फरन्स रुम, एक स्वतंत्र खोली वाटावी इतकी प्रशस्त बाथरुम - ती पुन्हा संगमरवरी साजात मढलेली. राजदूतांनी किचनमधील फ्रीज उघडला. आतमध्ये त्यांची आवडती शॅम्पेन आधीच कुणीतरी थंड करीत ठेवली होती. "वर्थ एव्हरी पेनी ऑफ थ्री थाऊजन्ड डॉलर्स फॉर ए नाईट" - राजदुतांच्या चेह-यावर पहिल्यांदा स्मित झळकलं...

  आज...

   काल रात्री काय छान खाना झाला होता. बडा मझा आया. "पुढल्या वर्षीच्या जनरल इलेक्शनमध्ये तुम्हीच राष्ट्राध्यक्ष होणार" निमंत्रितांपैकी आलेला जवळपास प्रत्येक जण सांगत होता. आणि खरंच होतं ते. गेली छत्तीस वर्ष राजदूत राजकारणामध्ये होते. त्यापैकी गेली आठ वर्ष जगाची विकळीत झालेली आर्थिक घडी परत नीट बसवण्यामध्ये गेली होती. "तो कोण ग्रीसचा अथमंत्री माझ्या बुटांवर सांडलेली वाईन पुसायला वाकला होता सगळ्यांसमोर. ईटालियन आहेत. खराब होतील म्हणे. सिली बॉय -" राजदूतांनी आपला नाईटगाऊन फडला आणि जकुझीमधील साबणाच्या फसात पाय घातला. संध्याकाळी न्यूयॉक ते पॅरीस विमान होतं. बाजूलाच असलेल्या आयपॉडवर इडिथ पियाफचं गाणं सुरु झालं. पुन्हा एकदा राजदूत युरोपच्या विचारांमध्ये गढून गेले. पुढल्या आठवड्यात जर्मन चान्सलरबरोबर कॉन्फरन्स आहे , मग लंडनला जागितक अर्थपरिषद, आणि हो - अमेरिकेत परतण्याअगोदर व्हॅटिकनला पोपबरोबर एक खाजगी मिटींग. या रिलीजस लोकांचीदेखील एकदा एक मोट बांधली पाहिजे.

   गार्डेनिआचा बाथ घेऊन फ्रेश झालेले राजदूत टर्कीश टॉवेल बांधून बाहेर आले. समोरच सिटींग रुम मध्ये हॉटेलची एक सदनसेविका सोफ्याचं कव्हर बदलण्यात मग्न झाली होती. तोकड्या राखाडी गणवेषामधील ओणव्या असलेल्या त्या स्त्रीकडे राजदूतांचं लक्ष गेलं. आणि - आणि पुढे फक्त तिची एक आणि त्यांची एक अशा दोन वेगवेगळ्या कहाण्या मागे राहिल्या...

  पॅरीसचं विमान चुकलं म्हणून राजदूत घाईघाईने आपलं सामान न घेताच हॉटेलमधून निघून गेले. विमान सुरु व्हायच्या काही क्षण अगोदर पोलिसांनी त्यांना गाठलं. राजदूत विमानाबाहेर आले. पॅरीसचं विमान राजदूतानशिवायचं पॅरिसला निघून गेलं. इथे बलात्काराच्या आरोपाखाली राजदूतांना न्यूयॉ्र्कच्या सरकारी तुरुंगामध्ये हलिवण्यात आलं. पोलिसांची गाडी तुरुंगाच्या आवारामध्ये येताच राजदूतांच्या हातांमध्ये बेड्या ठोकल्या गेल्या. दोन पोलिसांनी दोन बाह्यांना धरुन राजदूतांना बाहेर काढले. सुमारे चौदा हजार आरोपी राहत असलेल्या कारागृहामध्ये राजदूत आले. त्या अंधा-या, दगडी इमारतीत आत शिरताच वाडर्नने प्रथम त्यांचे कपडे काढून घेऊन तुरुंगातील कपडे घालायला दिले. उंची अमार्नी सूटाच्या ठिकाणी पट्यापट्यांचा शर्ट आणि लेंगा आला. इटालियन बुटांच्या जागी तुरुंगातील सपाता आल्या. खाकी लिफाफ्यातील पिवळ्या कागदावर "आपल्याला या वस्तू अमेरिकन सरकारकडू न मिळाल्या आशयाच्या मजकुराखाली सही झाली. राजदूतांची रवानगी आता एका बराकीत करण्यात आली. ती बराक दहा बाय बारा ची होती. एका भिंतीशी एक लोखंडी खाट, आणि दुस-या बाजूला एक उघडे स्टेनलेस स्टीलचे कमोड. बस्स! आतमध्ये एवढीच सामग्री होती. बाहेर गस्त घालणा-या पहारे- क-याची, "लाईट्स आऊट" गजाल ऐकू आली. राजदूतांनी डोळे मिटून घेतले. कधीतरी लहानपणी कानावर आलेल्या एका इन्डियन फोकटेलवर कुणा महाभागाने रचलेल्या दुनोळ्या आठवल्या. अर्थ काहीसा होता.

  मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले...

AddThis Social Bookmark Button
 
Untitled Document
कौटिल्य अर्थशास्त्र आणि आधुनिक व्यवस्थापन - चंद्रगुप्त मोर्य कोण?
(1)

  

  ज्याला इतिहासात विशेष महत्त्व देता येईल असा पुराणात वर्णिलेला राजा म्हणजे शिशुनाग होय. गयेनजिकच्या पर्वतराजीत त्या प्राचीन काळात राजगृह नावाचे शहर त्याची राजधानी होती. याच शिशुनागाचा बिंबिसार राजा हा वंशज होता, त्याच्यासंबंधी जी माहिती आज उपलब्ध आहे त्याने तत्कालीन अंग देशाचे म्हणजे आर्वाचीन भागलपूर व मुंगीर प्रांताचे राज्य घेतले. हा बिंबिसार मगध राज्याचा संस्थापक म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. त्याने मगध राज्यावर अठ्ठावीस वर्षेराज्य केल्यानंतर आपला पुत्र अजात शत्रू याला सिंहासनावर बसविले आणि त्याने स्वत वानप्रस्थ अंगिकारला. पुराण वाङ्मय अध्यात्म विद्येशी संबंधित आहे म्हणून आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात ते प्रक्षिप्त व दुर्लक्षणीय आहे असा भ्रम आजच्या प्रागतिक म्हणविणाऱयात फार व्यापक प्रमाणात दिसून येतो पण तो प्राचीन कालीन इतिहास आहे याची जाणीव अगदीच थोड्यांना आढळते. हा अजात शत्रू प्राचीन इतिहासात कुनिक अथवा कुनीय या नावाने प्रसिद्ध आहे. बिंबिसारीने कौसल देशाचे राज्य जिंकले होतेच. अजातशत्रूने वैशालीचे राज्य घेतले. इ. स. पूर्वी 475 वर्षी तो निधन पावला. त्यानेच गंगातीरावर असलेल्या पाटली नावाच्या गावी एक मोठा मजबूत किल्ला बांधला. याच्या कारकिर्दीत गंगा आणि हिमालय पर्वतराजी यांच्या दरम्यानचा सर्व प्रांत मगधांच्या कब्जात आला होता. अजातशत्रू याचा मुलगा दर्शक किंवा हर्षक या नावाने इतिहासात ओळखला जातो. त्याचा मुलगा उदय. तो इ.स. 450 पूर्वी गादीवर बसला. याच उदयने आपल्या आजोबाने बांधलेल्या किल्ल्याच्या पायथ्याशी जे शहर वसविले त्याचा उल्लेक कुसुमपूर, पुष्पपूर अथवा पाटलीपूत्र (इतिहासात) असा केलेला ाहे. हे शहर व्यापार-उदीम यांनी इतके भरभराटले की , पुढे तेच मगध राज्याची राजधानी झाले. उदयाचा पुत्र नंदीवर्धन आणि त्याचा पुत्र महानंदीन. या महानंदीनाला एका शूद्र स्त्रीपासून जो पित्र झाला तोच महापद्मानंद म्हणजे मंद होय. त्यानेच पुढे मगधाचे राज्य बळकावले व तो नंद राजा झाला. त्याचा हा जो वंश झाला तोच नंद वंश म्हणून प्रसिद्धी पावला. (इ.स.पूर्व 371साली) या नंदाच्या राणीला एका न्हाव्यापासून जो मुलगा झाला त्याचे नाव धनानंद. त्याने आपल्या बापाला ठार मारून मगधाचे राज्य बळकावले. याच नंदवंशातील एका पुरुषापासून मुरा नावाच्या शुद्र स्त्रीला जो पुत्र झाला तोच हा चंद्रगुप्त. मुरेचा मुलगा म्हणून तो मौर्य झाला. त्याच्याच वंशाचा इतिहास हा मौर्य वंशाचा इतिहास होय.

   र्य वंशाचा इतिहास होय. परशुरामाने अनेकदा पृथ्वी निक्षत्रीय केली असे म्हटले जाते पण ते प्रक्षिप्त असावे. मग क्षत्रिय जमात अस्तित्वात कशी राहिली असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अर्थात `गुण कर्म विभागश' या गीतेतील वचनाने त्याचे समर्थन होऊ शकते. असेच एक संस्कृत वचन नदवंशाच्या या नैतिक वर्तनाच्या दुषिततेवरून संस्कृतात प्रचलित झाले ते `नन्दान्तं क्षत्रियकुलम' हे होय.

   महापद्मानंदाने आपल्या पायाखाली काय डळते याहे याचा विचार न करता चंद्रगुप्त हा हलक्या कुळातला म्हणून त्याला हद्दपार केले. प्राचीन काळातील कुटुंब प्रमुखाला ज्या प्रकारे विनाअंकुश सर्व अधिकार प्राप्त होत असत तसेच विनाअंकुश अधिकार एकादा वंशप्रस्थापक राजाला असत. त्यामुळेच आर्य चाणक्याचे ज्ञान आणि प्रत्यक्षानुभव न ओळखता नंदाने त्याचा भर राजसभेत अपमान केला असावा. ज्ञानसंपन्न- अनुभवसंपन्न मनुष्याचा स्वाभिमान हा स्वतच्या कर्तृत्ववानतेची जाणीव असते ती कधीच दुरभिमानात मोडत नाही. झालेल्या अपमानाचा सूड घेण्याच्या प्रतिज्ञतेचे सातत्याने स्मरण व्हावे म्हणून शेंडीची गाठ सोडून आर्य चाणक्य ऊर्प कौटिल्य याने राजत्याग केला आणि राज्याच्या वेशीबाहेर जंगली प्रदेशात झोपडी बांधून राहिलेल्या मुरेच्या पुत्राला- चंद्रगुप्ताला शोधून काढले. चंद्रगुप्ताच्या धमन्यातून अर्थातच राजवंशाचे रक्त वाहत होते. त्यामुळे त्याच्यामधून एका अनुभरी राजनैतिक चौकटीतून एक सम्राट निर्माण करण्यास चाणक्याला साह्य झाले असणे साहजिक ठरते.

   चंद्रगुप्ताच्या सम्राटपदाच्या उर्जितावस्थेला पूर्णांशाने आर्य चाणक्यच जबाबदार होता. चंद्रगुप्ताच्या मौर्यवंशाचा इतिहास हा भारतभूमीच्या स्वातंत्र्याच्या आणि राष्ट्रवादाच्या बीजारोपणाचाच इतिहास आहे.धनानंद हा नंद कुळातला एक अतमयंत जुलमी राजा होता. त्याच्या जुलमी राजवटीला त्याची प्रजा पूर्णत कंटीळली होती. असंतुष्ट प्रजा हा त्या राजसिंहासनाखालचा स्फोटक सुरुंग असतो, अवकास असतो, तो त्या सुरुंगाच्या सुरुवातीला सरबत्ती ळावण्याचा. फक्त निमित्त सापडण्याचा क्षण यावा लागतो. आर्य चाणक्याच्या शिस्तीत तयार झालेले पहाडी सैन्यासह चंद्रगुप्ताची नजर धनानंदाच्या जुलमी राजवटीकडे फळताच तो क्षण आला आणि धनानंदाचे जळमळात सिंहासन कोलमडून पडले. त्यापूर्वी अर्थातच त्याने दिग्विजयी अलेक्झांडरचा संपूर्ण निपात करून भारतभूला पारतंत्र्यातून सोडविले होते. धनानंदाचे सिंहासन त्याने उलथून टाकले असेच नर्हे तर संपूर्ण नंदवंश नेस्तनाबूद केला.

   आंग्ल इतिहासकार व्हिंसेंट स्मिथ म्हणतो, `चंद्रगिप्ताने उत्तरेकडील सर्व राज्ये आपल्या अंमलाखाली आणली असेच नव्हे तर, त्याने नर्मदेच्या पलिकडचाही काही मुलुख ताब्यात घेतला. इतिहासकाळातील या पहिल्याच हिंदू सम्राटाचे साम्राज्य बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेले होते.'

   अर्थात ही माहिती इ. स. पूर्वी 321व्या वर्षाच्या सुमाराची आहे.

   इंद्रियजय हे सर्व शास्त्रांचे सार

AddThis Social Bookmark Button
 
कौटिल्य अर्थशास्त्र आणि आधुनिक व्यवस्थापन- आर्य चाणक्याचे सार्वकालिक `अर्थशास्त्र' - आर्य चाणक्याचे सार्वकालिक `अर्थशास्त्र'
Untitled Document
कौटिल्य अर्थशास्त्र आणि आधुनिक व्यवस्थापन
(1)

   आर्य चाणक्याचे सार्वकालिक
`अर्थशास्त्र'

(उपोद्घात)

   प्राचीन काळातील इतिहासाचा शोध घेताना तत्कालीन भूगोलाचाही समांतर विचार करावा लागतो. त्याविना त्याकाळातील इतिहासाच्या कोणत्याही अंगाचा विचार हा केवळ दुबळाच नव्हे तर अपूर्णही ठरतो. म्हणून त्यातला बोध हा दोषास्पद ठरतो. इतिहासावर आपल्या वैचारिकतेचे अथवा भावनिकतेचे कलम करणे हे तर प्रदूषणच ठरते.भूगोलाचा इतिहासावर जो प्रभाव पडतो तो भौतिक, सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचा असतो. म्हणूनच आर्य चाणक्य किंवा कौटिल्य यांच्या द्रष्टेपणाने नंद वंशाचा झालेला निपात आणि मौर्य वंशाचा झालेला वैभवशाली उदय ज्यायोगे होऊ शकला त्या कौटिल्य अर्थशास्त्राचे आज जगात सर्वत्र काही अंशी पुनर्विलोकन चालू आहे.

  कौटिल्याने राज-कर्तव्यासंबंधी दोन ग्रंथ लिहिले. एक अर्थशास्त्र आणि दुसरा कौटिल्यनीती.

  नंदाच्या सुस्थापित राजसभेत आर्य चाणक्याचा जो अपमान झाला तो जिव्हारी लागल्याने त्याने नंदापासून फारकत घेतली आणि नंदाचा वंशविच्छेद करून सूड उगविण्याची प्रतिज्ञा केली. व चंद्रगुप्ताच्या साह्याने ती पूर्ण करून घेतली अशी सर्वसाधारण माहिती आपल्याला असते. `अर्थशास्त्र' या शब्दाने आपणापुढे जो अर्थ उभा राहतो तो formal Economics यापेक्षा वेगळा नसतो. परंतु व्यास महर्षींच्या बाबतीत आपण `व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम' असे ज्या अर्थाने अथवा व्यापकतेने वापरतो त्यापेक्षा एक पायरी पुढे जाऊन कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा विचार करावा लागावा अशा सार्वजनिक द्रष्टेपणाचा बौद्धिक आवाका आर्य चाणक्याच्या ठायी असावा हेच सिद्ध होते.

   जगाच्या अतिप्राचीन इतिहासात जेव्हा युरोप खंड दाट अंधारात चाचपडत होता त्यावेळी भारताची अथवा आर्यारथाची ही भूमी प्रकाशाने लख्ख उजळलेली होती. काळाच्या इतिहासात आपल्याला `एपिक एज' किंवा महाकाव्यांचा काळ म्हणजे ख्रिस्तपूर्व 5 ते 7 हजार वर्षांपासूनच्या काळापासून शिकविला जातो. कोणतेही ज्ञान हे सैद्धांतिक स्वरूपात येण्यासाठी त्यामागे प्रदीर्घ काळाची प्रक्रिया कार्यरत असते आणि या प्रक्रियेचे कर्ते-करविते होते आपले तत्कालीन ऋषी-मुनी आणि त्यांची शिष्य परंपरा. म्हणूनच `भारतवर्ष' हे भारताचे जुने नाव होते त्यातल्या `भारत' या शब्दातच तत्कालीन जगाच्या तुलनेत या प्रदेशाला भा = प्रकाश + रत = मग्न अशा नावाने गौरवास्पदता लाभली. वर्त, वर्ष असे शब्द त्याकाळी `प्रदेश' या अर्थाने वापरले जात असावेत. महाकाव्याचा काळ हा नेमका केव्हा सुरू झाला याचेच विवेचन पाश्चात्य इतिहासकारांनी वा विद्वानांनी ऐहिक दृष्टिकोनातून केलेले असले तरी `रामायण' या पहिल्या महाकाव्याच्या रचनेची प्रेरणा वाल्मिकी ऋषींना `मा निषाद प्रतिष्ठांत्वाम्' या निषेधाच्या उद्गारातून झाली. ते उद्गार पाणिनीकृत संस्कृतावर आधारलेले आहेत. याचाच अर्थ इतकाच की, त्या चार ओळींची सहवेदनात्मक उद्गारापूर्वीच संस्कृत भाषेची शास्त्रशुद्ध पद्धतीवर पुनर्रचना झालेली होती. ज्ञान आणि काळ हे कधीच स्थिरवादी अथवा `इनर्शिया'त गुरफटलेले नसतात. प्रवाहित्व आणि विस्तार हे त्यांच् समान सहज धर्म असतात. त्या प्राचीनतम काळातील ऋषीमुनीनी जगातल्या सर्वच ज्ञान- शाखांना सैद्धांतिक स्वरूप दिले. `सिद्धांत' हा ज्ञानाच्या विस्ताराच्या संदर्भात End product of the IQ of the longterm integrated knowledge असे म्हणता येईल. पूर्वीच्या राजेरजवाड्यांच्या पदरी विविध श्रेत्रातील विद्वज्जन सल्लागार म्हणून असत आणि त्यांच्या बरोबरची सल्लामसलत ही धोरणे ठरविण्याचा महत्त्वाचा भाग असत. आर्य चाणक्य हा नंदाचा असाच एक सल्लागार होता. व्यवस्थापन शास्त्राच्या इतिहासाचा मागोवा आपण घेतो त्यावेळी आजच्या पिढ्या 1950च्या दशकात शोधाशोध करताना दिसतात. या दशकात व्यवस्थापनाला `शास्त्र' म्हणून मान्यता मिळालेली आढळते आणि त्याचा जनक पीटर ड्रकर हा मानला जातो. पण त्यापूर्वीच्या काळात भारताचा ज्ञानोदय 7000 वर्षांचा मानला तर या त्या काळात व्यवस्थापन नावाची चीज आपल्या देशात अस्तित्वात नव्हती का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. या प्रश्नाचा शोध घेताना प्राचीन उपलब्ध ग्रंथाच्या आधारे व्यवस्थापनासंबंधीची अलीबाबाची गुहा आपणापुढे उघडी होते. रामायण काय किंवा महाभारत काय अथवा आपली उपनिषदे काय, या सर्वात व्यवस्थापनाच्या विविध धोरणांची मागोवा लागतो. हजारो शतकांच्या राजकीय गुलामगिरीचा जो प्रभाव आमच्या मानसिक जडणघडणीत बेमालूम मिसळला गेला आहे त्यामुळे आपण फक्त चूक काय हाच विचार करू शकतो. (मला वाटतं, `वादे वादे जायते तत्त्वबोधा' याचाच हा विपर्यास असावा.) पण `आमचे मोठेपण कशात आहे?' या प्रश्नाचा विचार करण्याची आमच्या तथाकथित विद्वजनांची `नजरबंदी' झालेली असावी! `राष्ट्र' या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण काळाची परीक्षा उत्तीर्ण झालो आहेत, आपली अर्थव्यवस्था विकसनशील आहे आणि अपयशी ठरलेले राष्ट्र ही आपली संभावना होऊ शकत नाही. आपला देश एका काळी यशाच्या शिखरावर आरूढ झालेला होता; जगातले किती देश स्वतसंबंधी अशी प्रौढी सांगू शकतील? आजच्या प्रागतिकवाद हा देशाच्या सीमांबाहेर डोकावण्यात धन्यता मानीत आहे. `आत' डोकावतांना फारसे कोणी दिसत नाही, हाच आमचा कच्चेपणा आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आमच्या शिक्षण व्यवस्थेचे झालेले पाश्चात्यीकरण होय! आपल्यापैकी असख्यांनी `कौटिल्य अर्थशास्त्र' ही संज्ञा ऐकलेली असेल. पण त्यापैकी किती जणांनी ते प्रत्यक्ष समजून घेण्याचे कष्ट घेतले असतील? वास्तविक आपले प्राचीन वाङ्मय हा आपण कोण होतो हे दाखविणारा आरसा आहे. पण कौटिल्याचे अर्थशास्त्र सूडबुद्धीच्या पार्श्वभूमीवर जन्मलेले असले तरी त्यातला समग्र प्रवास हा निर्दोष सकारात्मकतेचा विधायक आहे, कारण विधायकता ही त्याची आधारशीला आहे. आर्य चाणक्य अथवा कौटिल्य म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो तो होता तरी कोण ही जिज्ञासा स्वाभाविक आहे. ख्रिस्ताब्द तिसऱया शतकात नंबुदरी ब्राह्मण कुळात जन्मलेला तो एक अतमयंत कुरूप पण अत्यंत तल्लख बुद्धीचा होता तो. त्याचे नाव विष्णुगुप्त अथवा कौटिल्य. प्रत्येक घटनेच्या पाठी जसा दीर्घकालीन अथवा अल्पकालीन कार्यकारण भाव असतो तसाच एक कारणात्मक भावही असतो. तोच प्रत्येक कृतीचे मूल्यमापन ठरवितो (पूर्वग्रहरहित). तल्लख बुद्धी आणि जिज्ञासू वृत्ती यांचा सुरेख मेळ जमल्याने राजसल्लागार म्हणून जे जे अनुभव त्याला आले त्यांचा व्यवहार्य मागोवा घेत राहिल्याने त्याचे हे `अर्थशास्त्र' केवळ अर्थशास्त्रापुरतेच मर्यादित न राहता अर्थशास्त्राबरोबर राजकारण, कायदा, नेतृत्व, व्यवस्थापन, शासन, युद्धशास्त्र, लष्करी डावपेच, हिशेब पद्धत आदी राजशासनाला व्यवहारोपयोगी अशा अनेक गोष्टींचे शास्त्रीय विवएटन त्यात आढळते आणि त्या ज्ञानापुढे चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्याचा इतिहासही खुजा वाटू लागतो. आमच्या बोलक्या बृहस्पतीचा एक स्वाभाविक दोष म्हणजे अविश्वासू वृत्ती. एकाद्या गोष्टीचा काथ्याकूट करीत वाद माजविणे हे विद्वतेचे लक्षण आजही मानले जाते. याला विद्वता म्हणण्यापेक्षा `विद्वजडता' असेच म्हणावे लागेल. अर्थात आर्य चाणक्य अथवा कौटिल्यही यातून सुटला नाही. चाणक्य नावाची कोणी व्यक्तीच झाली नाही, ती फक्त काल्पनिक आहे आणि तिने लिहिलेले अर्थशास्त्र व नीतिशास्त्र हे दोन्ही ग्रंथ म्हणूनच काल्पनिक आहेत असा वाद काही काळ घुमलाच; पण तो खोटा असल्याचे सप्रमाण सिद्ध झाले आहे.

   `मुद्राराक्षस' नाटकाच्या आरंभी सिद्धार्थकाने चाणक्यनीतीचे वर्णन करताना म्हटले आहे-

  `बुद्धीजलणिज्झरें सिश्चन्ति देसआलकलसेंहि।

  दंसिस्सदि कज्जफलं गरुअं चाणक वणर्आदिलदा।।'

   (चाणक्यानी तीरूप लतेवर देशकालाच्या घटांनी बुद्धीजलाचे सिंचन केले असता, कार्यसिद्धी हे सुंदर फल प्राप्त होईल.)

AddThis Social Bookmark Button
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 1 of 3