CBSE च्या शाळकरी मुलांना राष्ट्राभिमानाच बालकडू पाजा महाराष्ट्रद्वेषाचे विष नको !
Untitled Document
CBSE च्या शाळकरी मुलांना राष्ट्राभिमानाच बालकडू पाजा महाराष्ट्रद्वेषाचे विष नको !
(1)

   प्रिय मराठी बांधवांनो इयत्ता 7 वी चे CBSE बोर्डाचे सामाजिक विज्ञानाचे पुस्तक वाचण्यात आले. सरूवातीच्या पानापासूनच एकूण रागरंग कळायला लागला, पाठय़पुस्तक संशोधन समितीमधील नाव व त्यांची ठिकाणं वाचल्यावर एक लक्षात आले की समितीमध्ये महाराष्ट्राबद्दल व महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल कमी किंवा अगदीच काही माहिती नसलेले विद्वान (?) आहेत. एकंदर पुस्तक वाचल्यावर कळते की ह्या लोकांना महाराष्ट्राबद्दल आकस आहे. ज्या महाराष्ट्राने मराठी माणसाने देशात सामाजिक सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली त्या महाराष्ट्राला इतिहासात योग्य स्थान दिलेले नाही. हा आकस नाही तर काय?

   या पुस्तकातील तमाम विद्वान हे महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील आहेत. म्हणजे महाराष्ट्रात विद्वान नाहीत की काय? महाराष्ट्रातील सामाजिक व ऐतिहासिक तज्ञ लेखक, संशोधक यांनी आपल्या कर्तृत्वाने जगात मान्यता मिळवलेली आहे. त्या कुणाही लेखक, संशोधकांचा या पुस्तकात आधार घेतलेला नाही.

   ह्या पुस्तकातील काही ठळक मुद्दे खाली पानं क्रमांकासह देत आहोत:

   1) धडा क्र. 1 पान क्र.10 -Language and religion ¢ाा मध्ये आमीर खुसरोचा संदर्भ देऊन विविध प्रांतातील बोली भाषांचा गोषवारा दिलेला आहे परंतु त्यात मराठी भाषेचा नामोल्लेख पण केलेला नाही. पुस्तकात हा काळ 1318 चा दिलेला आहे. त्याच्या जवळ जवळ 25 वर्ष आधे संत ज्ञानेश्वरांनी (1275 -1296) भावार्थदीपिकेची निर्मिती केली होती. तो मराठी भाषेचा सुवर्णकाळ होता. आमीर खुसरोला मराठी भाषेबद्दल माहिती नव्हती याचा अर्थ तेव्हा मराठी भाषा नव्हतीच असा होत नाही. मग ह्या पुस्तकात त्याकाळच्या इतर तज्ञांचे संदर्भ का दिले नाहीत? हा माय मराठीचा व महाराष्ट्राचा घोर अपमान आहे

   2) धडा क्र. 5 पान क्र. 60 ते 72 Rulers and Buildingscाध्ये जी काही माहिती व चित्रे दिलेली आहेत ती फक्त उत्तर भारतातील बांधकामांबदल दिली आहेत. महाराष्ट्रातील संभाजीनगर जवळील देवगिरी किल्ला व तसेच छत्रपती शिवरायांनी बांधलेले अनेक किल्ले व विशेष उल्लेखनीय असा रायगड जो जगातील काही मोजक्याच उत्तम किल्ल्यांपैकी एक, त्याचा ह्या पुस्तकात नामोल्लखही नाही.

   3) धडा क्र. 3, पान क्र.30 -The Delhi Sultans Ùाा करता खर्ची घातलेली पाने एकूण 13. खैबर खिंडीतून भारतावर ज्या लुटारुंनी अगणित आक्रमणे करुन उत्तर भारतावर सत्ता प्रस्थापित करुन अनन्वित अत्याचार केले त्या सुलतानांवर रकानेच्या रकाने भरताना हे विद्वान (?) थकले नाहीत. पान क्रमांक 31 वर ह्या सर्व व काही राजपूत राजांचा सालानुसार उल्लेख आढळतो पण त्याच सुमारास उर्वरित भारतात अनेक राज्यकर्ते होते त्यांचा नाममात्र देखील उल्लेख पुस्तकात आढळत नाही. उदा.दख्खनचे देवगिरीचे साम्राज्य व इतर. पुस्तकात दिलेल्या सर्व सुलतानांनी सत्ता स्थापन करुन अनेक पिढय़ा ती उपभोगली यात दुमत नाही पण उर्वरित भारतातील राजांबद्दल दुजाभाव का? ह्या सर्व तथाकथित विद्वानांना भारत म्हणजे फक्त उत्तर भारत वाटतो का ?

   ह्या पुस्तकातील सर्वात उद्वेगजनक बाब

   4) धडा क्र. 10 पान क्र. 149 -Eighteenth Century Political Formations “ TheMaratha ”cाध्ये महाराष्ट्राचे व मराठी जनांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख चार वेळा आढळतो. आता ह्या पुस्तकातील विरोधाभास खालील तक्त्यात बघा. ज्या शिवरायांवर महाराष्ट्रात शोध घेतल्यास हजारो पानांचे संशोधन सापडेल, त्याच्यांवर केवळ चारच पानं ? राजे महाराजे काय फक्त उत्तरेतच होते का?

AddThis Social Bookmark Button