लेखक :-राम प्रधान .
मानवी इतिहासाला रक्तरंजित देणारे महाभाग भाग(2)
(1)
हुकुमशाही विरुध्ध लोकशाही
हुकूमशहा हा नेमका कसा असतो
याचा निश्चित स्वरूपाचा वस्तुपाठ
आपल्याला मुसोलिनीच्या आचरणात
आणि वैचारकितेत सापडतो. जगातले
सगळे हुकूमशहा याच वस्तुपाठाच्या
आसपास वावरताना आढळतात.
मुसोलिनी इटलीची एकजूट हवी
होती ती फक्त स्वत:च्या हुकुमतीसाठी
लोकांनी स्वतंत्र अथवा वेगळा विचार
करावा याला वाव राहू नये म्हणून तो
भाषण स्वातंत्र्याची, अभिव्यक्ती
स्वातंत्र्याची गळचेपी करी. त्यात
त्याचा उद्देश इटलीच्या कल्याणाचा तर
स्वत:पुढे कोणतेही आव्हान उभे राहू
नये हेच होते. कामगार-स्वातंत्र्याचा तो
फार मोठा विरोधक होता म्हणून
भांडवलशाही व कामगार यांची अभेद्य
एकजूट असल्याचे दाखविण्याचा तो
प्रयत्न करी. नीट पाहिले तर तो मूळात
भित्रा होता. हिटलरचा साहसी स्वभाव
त्याच्या ठायी नव्हता. इटलीची सर्व
प्रजा आपल्या गुलामगिरीखाली असावी
ही त्याची आकांक्षा याच आंतरिक
भीतीपोटी होती. प्रत्येक हुकूमशहा,
मग तो कितीही प्रबळ असला तरी एका
विशिष्ट भीतीखाली रात्रंदिवस वावरत
असतो; ती भीती स्वत:च्या सत्तेला
येऊ शकणाऱया आव्हानाच्या
काल्पनिक भीतीपोटी असते.
Uneasy
lies the head that wear's a
crown ही म्हण द्व्यर्थी असल्याने
आपण तिची उकल करीत असलो तरी
मला वाटतं ज्याने कुणी ही म्हण केली
तो काळ लक्षात घेता त्याच्या
नजरेसमोर हुकूमशहाच असणार.
लोकांचे `समाधान' हे दोन प्रकारात
असते. एक म्हणजे लोक समाधानी
आहेत असा मारून मुटकून देखावा
किंवा आभास निर्माण करणे आणि
लोकहित साधून लोकांना खऱया अर्थाने
समाधानी ठेवणे. मारून मुटकून
समाधानी ठेवण्याच्या तंत्रात लोकांची
काहीच गाऱहाणी नाहीत अशी भ्रांती
निर्माण करणे येते. या तंत्राचे दोन भाग
असतात एक मुस्कटदाबी करणे अथवा
लोकांची क्रियाशक्तीच खच्ची करणे.
मुसोलिनीच्या काळात इटलीत
वृत्तपत्र स्वातंत्र्य नावाची चीजच
अस्तित्वात नव्हती.
विचार स्वातंत्र्याची गळचेपी
करण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग
म्हणजे वैचारिकतेची एकात्मिकता
जेव्हा विशिष्ट विचारांचं हॅमरिंग (ब्रेन
वॉशिंग) करीत राहिले जाते तेव्हा
व्यक्ती अन्य विचाराला अथवा
वैचारिक भिन्नतेला पारखी बनते आणि
त्या विशिष्ट विचारांचे अनुयायी एकमेव
वैचारिक मुशीतून तावून सुलाखून
बाहेर पडतात. अगदी अलिकडे जो
वाद घुमत आहे तो याच विषयावरचा
आहे. धार्मिक दहशतवाद यात
समाविष्ट होतो.
हुकूमशहा सर्व राष्ट्रांचे एक हत्यार
बनवितो; साधन बनवितो.
लोकांना
कर्दनकाळ वाटणारा हुकूमशहा
धनाढ्यांपुढे मात्र लाळघोटेपणा करीत
असतो; कारण त्यांच्या पैशांच्या
जोरावरच त्याला सत्ता आपल्या हाती
ठेवायची असते. त्यामुळे अर्थातच तो
भांडवलदारांचा पुरस्कर्ता असतो.
एकंदर उपरोक्त विवेचनाचे सार
सांगायचे तर डाकूगिरी आणि
लाचलुचपत हेच हुकूमशाही शासन
पद्धतीचे दोन मुख्य आधारस्तंभ होते.
`हुकुमशहापासून सोडवा' या
आपल्या सुंदर ग्रंथात प्रो. रॉबर्ट सी.
बुक्स म्हणतात, ``मोठ्यात मोठ्या
प्रमाणावर लाचलुचपत व अन्य नतद्रष्ट
व भ्रष्ट प्रकार रूढ करू पाहणाऱया
सत्ताधाऱयाला त्यासाठी हुकूमशाही
व्यतिरिक्त अन्य प्रकार सुचविणे
कोणत्याही घटनातज्ञाला अगर
सैतानालादेखील शक्य नाही.''
पण हुकूमशहा तशी मूळ प्रेरणा व
अभिलाषा असूनही एकदम घडत
नाही. कारण लोक (म्हणजेच
अनुयायी) हे त्याचे साधन असते.
त्यांना प्रथम काबूत आणावे लागते.
मुसोलीनी हा मी हुकूमशहा बनण्याचा
वस्तुपाठ म्हणतो कारण त्याच्या
जीवनाच्या पायऱयाच तशा होत्या.
|