कौशल इनामदार
* एका मैफलीची कथा.! भाग - २ * मी त्यांच्या प्रश्नाने गारच झालो! खुद्द गुलाम अलि आपल्याला त्यांची खाजगी तालीम पहायला बोलवताहेत यावर माझा विश्वास बसेना. माझ्यासाठी या घडामोडी स्वप्नवत होत्या. मी होकारार्थी मान डोलावली. त्यांनी दुपारी साडे चारला मला बोलावलं. मी ही आनंदाची बातमी माझ्या आई वडिलांना आणि भावाला कळवली. त्या दिवशी मी साडे चार वाजायची जशी वाट पाहिली आहे, तशी मी पुन्हा कधीही पाहिली नाही! Read more..
अदिती मोहिले
Child and Advertising - एक फसलेला प्रयोग मी commercial arts च्या शेवट च्या वर्षाला होते. आमच्या कॉलेज मध्ये last year म्हणजे full too धमाल. अख्या वर्षाला मिळून एक campaign करायचे. कुठलेही product किंवा service निवडा आणि त्याचे advertising campaign करा. माझा टॉपिक नवा होता पण त्या product साठी वापरले जाणारे माध्यम तर अगदी हमखास यशातल्या चौकटीत बसणारे होते आणि ते होते लहान मुलांशी निगडीत आणि म्हणूनच मी "तो" topic निवडला.Read more..
सुभग ओक
अविस्मरणीय भेटी-गाठी....
प्रेम हा असा “natural resource” आहे जो दिल्याने अधिकच वाढतो.आपले आयुष्य रुटीन होऊन जाते आणि आपल्याला ते कळत देखील नाही. कधी कधी लक्षात येऊन सुद्धा आपण त्या बाबतीत काहीहि करू शकत नाही, जे चाललं आहे ते बरय असं म्हणून आपण त्या रुटीनचाच एक भाग होऊन जातो. मी असला रुटीन-नेस टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. कामात नवीन नवीन “features develop” तर करतोच, त्या साठी नवे algorithms वाचणं/शोधून काढणं हे तर व्यावसायिक दृष्ट्या चालू असतच पण त्याशिवाय नाटकं लिहिणं, गोष्टी लिहिणं, कविता करणं, ब्लॉग लिहिणं, कवितांना चाली लावणं, पेटी वाजवणे, नाटकांचे दिग्दर्शन करणे हे उद्योग हि चालूच असतात.
Read more..
संगीता जोशी
मी बिल भरते....! भाग - 1
सोमवारची सकाळ. जो तो स्वतःचं आवरून आपापल्या कामाला जायच्या तयारीत...मुलं कॉलेजला ...हे ऑफिसला.. तेवढ्यात यांनी आठवण केली, '' अगं, आज MSEB चं बिल भरायचं आहे, बरं का.. आजच शेवटची तारीख आहे...''
'' अहो पण, तुम्ही शनिवारीच भरणार होतात ना? नाहीच का भरलं?.''
Read more..




