Untitled Document
राज ठाकरे || राहुल गांधी
(1)
उजाडले पण सूर्य कुठे आहे ?
" राज आणि राहुल ही दोन माणसे
पुढच्या काळात तरुणांना काय
द्यायचे, याचा तपशील ठरवतील.
त्यांच्या आधीच्या राजकारण्यांपेक्षा
सध्याचा काळ खूपच वेगळा आहे.
आता जग कधी नव्हे ते जवळ आले
आहे. लोकांचे राजकारण्यांवरचे
अवलंबित्व हळूहळू कमी होत
जाईल. फ्रत्येक देशांतर्गत फ्रश्नाला
जागतिक परिमाण असेल. त्यामुळे
जगाचा विचार करून संवादांचे
परीघ वाढवावे लागतील. यापुढे देश
तरुण होणार याचा अर्थ तो जगाशी
जोडलेला असणार, माहितीचा साठा
त्याच्याकडे असणार, त्याचा विश्वास
भाबडा नसणार, तर तो तपासला
जाणार, याचा अर्थ या दोघांना
राजकारण करतांना बदलत्या
समाजाची गरज समजून घ्यायला
लागेल.
"
|