१० व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी पुण्यात मोठ्या थाटात पार पडला. श्रीराम लागू यांच्या हस्ते या फेस्टिवलचे उद्घाटन झाले. राणी मुखर्जी आणि आयर्लंडचे भारतातील राजदूत गुडमुंड एरिकसन यांची विशेष उपस्थिती होती. अमिताभ बच्चन आणि आशा भोसले यांना ‘आउटस्टँडिंग काँट्रिब्युशन ऑफ इंडियन सिनेमा’ हा पुरस्कार दिला गेला. इलया राजा यांना "सचिनदेव बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साउंड' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी सांस्कृतिक मंत्री संजय देवताळेही हजर होते. करियरची 50वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सचिन पिळगावकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे, महोत्सवाचे प्रमुख डॉ. जब्बार पटेल, उपाध्यक्ष सबिना संघवी, राज्याचे सांस्कृतिक संचालक आशुतोष घोरपडे, विविध देशांतील चित्रपट कलावंत आदी या वेळी उपस्थित होते.
पुण्याबद्दल असणा-या अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल सांगताना ते म्हणाले की,"चित्रपटसृष्टीत मला नशिबाने आणले आणि प्रेक्षकांनी प्रेमाने स्वीकारले. पुणे कलानगरी म्हणून आवडतेच; पण माझे या शहराशी एक खास नाते आहे. येथेच मी पहिल्यांदा जयाला (बच्चन) भेटलो आणि याच शहरात मी तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले.''
‘चांदण्यात फिरताना, माझा धरलास हात...’ हे गाण गाऊन आशा भोसले यांनी पुणेकराना एक वेगळाच अनुभव करुन दिला. आशा भोसले यांनी दिलखुलास संवाद साधत रसिकांना खुश केले. इलया राजा यांचे कौतुक करता करता, त्या म्हणाल्या की सर्वात सुदंर संगीत हे तमिळ मधील आहे. असे म्हणत त्यानीं तमिळमध्ये गाऊन दाखवले. यावेळी इलया राजा म्हणाले,"संगीत हे निसर्गातच आहे. ते कुणी निर्माण करू शकत नाही.''
सध्या मराठी चित्रपटात काम करणारी राणी मुखर्जी मराठमोळी पैठणी, नाकात नथ, हातात हिरव्या बागडया त्यातच मराठीत संवाद साधत आपण पुणेरी असल्याचेही सांगितले. "मी मराठीत बोलले तर चालेल का,' असे विचारत ती म्हणाली, ""मला पुणे खूप आवडते. मी मराठीच आहे, मी मुंबईत जन्मले. त्यामुळे मी मराठी नसले तरी मराठीच आहे. आता मी अय्या ह्या मराठी चित्रपटात काम करुन मी पक्की मराठी झाले आहे.'' आता फक्त तीन शब्द बोलते, असे सांगून राणी लाजत म्हणाली,"अय्या, इश्श, अग्गबाई..!''
सुधीर गाडगीळ व दुरिया शिपचांडलर यांनी सूत्रसंचालन केले व डॉ.जब्बार पटेल यांनी प्रास्ताविक केले. या महोत्सवात 240 सिनेमे 6 वेगवेगळ्या थिएटर्समध्ये 10 स्क्रीन्सवर दाखवले जाणार आहे तसेच हे फेस्टिव्हल 19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
नव्याने स्नेहाचे संबंध निर्माण करण्याची संधी व स्नेह वृद्धिंगत करणारा सण म्हणजे संक्रांत
साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
मकरसंक्रांत हा सण भारतात विविध ठिकाणी विविध प्रकारे साजरा केला जातो. महाराष्ट्र(मकरसंक्रांत) तर पंजाबमध्ये(लोहडी) आणि तमिळनाडू(पोंगल) व येवल्यातील(पतंगोत्सव) असे विविध वैशिष्टय जपणारा हा सण आहे.
सूर्याने एका राशीतून दुसर्या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला 'मकरसंक्रांत' असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला उत्तरायण असेही संबोधतात. सूर्याच्या संक्रमणासोबतच जीवनाचे संक्रमण जोडले आहे. यामुळे या उत्सवाला सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्व आहे.
आरोग्यासाठी आणि कल्याणासाठीही तीळ महत्त्वाचेच आहेत. तीळ जल स्नान, तीळ दान, तीळ भोजन, तीळ जल अर्पण, तीळ आहूती, तीळ उटणे अशा प्रकारे तीळाचा उपयोग केला जातो. गुळाची पोळी हे या सणाचे वैशिष्ट्य! तिळाचे लाडू किंवा वडया याही या सणांच्या निमित्तानेच बनतात. या काळात वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा बोर हे शेतातले नवीन उत्पन्न येतं त्यामुळे याच पदार्थाचे वाण देण्याचीही पद्धत आहे. या सणाच्या निमित्ताने परिचित लोकांकडे जाणे, जुनी भांडणे विसरून नव्याने स्नेहाचे संबंध निर्माण करण्यासाठी ही छान संधी असते.
महाराष्ट्रात हा सण दोन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत (सामान्यतः १४ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते.
दरवर्षीच्या मकरसंक्रांतीबरोबरच येवल्यात पतंगोत्सव साजरा होत असतो. संक्रांतीच्या या दिवसात घराच्या गच्च्यांवर, कौलांवर, पत्र्यांवर जाऊन पंतग उडविला जातो. पतंगाप्रमाणे मन ही आकाशात गिरक्या घेत असतं. गाण्याच्या तालावर लोक पतंग उडविण्यात धुंद असतात.
अशाच प्रकारे तमिळनाडूमध्ये ’पोंगल’ नावाने हा सण साजरा केला जातो. सौर पंचांगानुसार पोंगल महिन्याच्या पहिल्या तारखेला येतो. हा शेतकऱ्यांचा उत्सव मानला जातो. तो तीन दिवस असतो. पहिल्या दिवशी घरातील सगळा कचरा एकत्र करून जाळला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी घरातील पशूधनाची पूजा केली जाते.
मकरसंक्रांत पंजाबामध्ये ’लोहडी’ म्हणून साजरी केली जाते. शीखांच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा उत्सव आहे. मकरसंक्रांतीच्या एक दिवस अगोदर लोहडी साजरी केली जाते. घरात नुकतीच सून आली असल्यास किंवा पहिला मुलगा झाला असल्यास या लोहडीचे महत्त्व काही वेगळेच असते.
अग्नी प्रज्ज्वलित केल्यानंतर त्याच्या सभोवताली तांदूळ, रेवडी आणि साखरफुटाणे यांची उधळण केली जाते. उपस्थित लोक ते उचलतात. या अग्नीतून मक्याच्या लाह्या वा शेंगदाणे जो कोणी उचलतो त्याची इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे. यानंतर नाच-गाण्याचा कार्यक्रम होतो. महिला एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणतात. नाचतात. रात्रीच्या भोजनात मक्याची रोटी, सरसों का साग असते. अशा प्रकारे आनंद साजरा केला जातो.
पतंग कितीही उंच उडाला तरीही मांज्याचा रिळ जमिनीवरच राहतो. याप्रमाणेच आपण जीवनात कितीही यशस्वी झालो तरी पाय जमिनीवरच असायला हवे. कधी-कधी पतंग कापलीही जाते. म्हणजेच जीवनात आपण अयशस्वीही होऊ शकतो. पण त्याने घाबरून न जाता नवा पतंग घेऊन त्याला उडविण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आयुष्यात अपयश आले तरी ते झटकून नव्याने प्रयत्न करा.
ईश्वराने मानवांच्या उद्धारासाठी मानवरूप धारण केले. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ख्रिश्चन धर्मियांत ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. खरतर २४ डिसंबरच्या संध्याकाळपासूनच या सणाला सुरुवात होते. या संध्याकाळला "ख्रिसमस ईव्ह" असे म्हणतात. २४ डिसेंबरच्या संध्याकाळी सर्व लहानथोर ख्रिश्चन चर्चच्या आवारात नटून थटून एकत्र येतात. या काळात चर्च दिव्यांच्या रोषणाईने सजवलेले असते. चर्चच्या आवारात ख्रिस्त जन्माचे देखावे तयार केले जातात. विविध रंगाच्या चांदणीच्या आकाराच्या अकाश कंदील घरोघरी लावले जातात. यालाच "डेव्हिडचा तारा" असे म्हटले जाते. मिष्टान्न म्हणून विविध प्रकारचे केक्स, डोनट्स बनवले जातात. याबरोबरच परस्परांना भेटवस्तू देणे, शुभेच्छापत्र पाठवणे, फटाक्यांची आतषबाजी करणे इत्यादी प्रथा जगभरच पाळल्या जातात.ख्रिसमस ईव्हच्या दिवशी संध्याकाळपासूनच चर्चच्या आवारात जमलेले ख्रिश्चन बांधव नाचगाण्यात मशगूल होतात. याच दिवशी रात्री बारा वाजता चर्चमध्ये घंटानाद केला जातो. तो ऐकताच जमलेला जनसमुदाय परस्परांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात.खास नाताळसाठी म्हणून भक्तिगीते रचली जातात. त्यांना "ख्रिसमस कॅरोल्स" असे म्हणतात. ती गात लहानमुले, युवकयुवती रात्री १२ ते ४ पर्यंत एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात.
२४ डिसेंबरच्या रात्रीपासून चर्च व घरोघरी दिसणार्या पाळणाघराच्या दृश्याबरोबरच रोषणाई केलेला ख्रिसमस वृक्षही सर्वत्र पहायला मिळतो. फर नावाच्या वृक्षाची ती प्रतिमा असते. फर हा वृक्ष सदाहरित असतो. तसेच त्याचा आकार चर्चच्या शिखरासारखा वर निमुळता होत गेलेला असतो. म्हणून "ख्रिसमस वृक्ष" म्हणून फरच्या झाडाला मनाचे स्थान दिले जाते. सफलतेचे प्रतिक म्हणून त्याची पूजा सर्वत्र केली जाते. सोळाव्या शतकात मार्टिन ल्यूथरने जर्मनीतील स्वतःच्या घरात मेणबत्त्यांनी सजवलेला फर वृक्ष उभा केला. तेव्हापासून ही प्रथा सर्वत्र रुढ झाली.
परदेशाप्रमानेच भारतात देखिल ख्रिश्चन धर्मिय लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भारतातही ह्या सणाची मोठी लगबग दिसुन येते. शहरातील घरे, बाजारातील आनंदी वातावरण, विविध चर्चच्या समुहाचे कॅरल सिगींग, ख्रिसमस ट्रीने भेटवस्तुंची सजलेली दुकाने असे आनंदी वातावरण सध्या दिसुन येत आहे. ख्रिसमसच्या सेलीब्रेशनमध्ये विविध नाविन्य पुर्ण उपक्रम राबणारे काही ग्रुपही विविध शहरात काम करत असतात. असाच एक ग्रुप म्हणजे पुण्यातील शिलो चर्च ऑफ क्राईस्ट हा युथ ग्रुप आहे. ते ख्रिसमस मध्ये विविध उपक्रम राबवून सण साजरा करतात. आज पुण्यात अनेक मॉल आहेत, या मॉल संस्कॄतीमध्ये कॅरल सिगीगं चालु झालं आहे. मॉल मध्ये ग्रुपस ला इन्व्हीटेशन येताय आणि तिथुन ख्रिसमस कसा साजरा केला पाहिजे, हा संदेश देण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
ख्रिसमसच्या या आठवड्यात प्रत्येक दिवशी काही तरी वेगळे केले जाते. पहिल्या दिवशी किर्तनाचा कार्यक्रम असतो, बायबल मध्ये जे दाखले दिले आहेत ते किर्तनातुन सांगितले जातात. दुस-या दिवशी सन्डे स्कुलची जी मुलं असतात ती बायबलमधील गोष्टींवर नाटिका सादर करतात. तिस-या दिवशी ट्रेडीशनल दिवस म्हणुन साजरा केला जातो. तर चौथ्या दिवशी तरुणांचा दिवस असतो, त्यात फुड फेस्टिव्हल करतात. आपापल्या घरातुन काही तरी वेगळे पदार्थ बनवून आणतात आणि गेट-टु-गेदर करतात.
ख्रिसमस नतंर एक मेळावा पण भरतो, तेव्हा सर्व ख्रिस्त बांधव एकमेकांना भेटतात. यात गेल्या दोन तीन वर्षा पासुन नाविन्य बघायला मिळतंय. काही अध्यात्मिक गाणी म्हटली जातात. प्रत्येक वेगवेगळ्या चर्च चे ग्रुप येतात आणि आपले सादरीकरण करतात.
पुण्यातील अनाथ आश्रमात, वॄद्धाश्रमात, अंध शाळेत N.G.O.(सेंट जॉन होम) मध्ये जाऊन केक, स्विट्स, चॉकलेट्स, भेट वस्तु वाटतात. त्यांचां आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांना हव्या असलेल्या जीवनाश्यक वस्तु देण्याचा प्रयत्नही करतात. कारण ख्रिसमस हा देण्याचा सण आहे. ते दर वर्षी स्व:इच्छेने मदत म्हणून २० ते २५ हजार रुपये फंड जमा करतात. यंदा ते एक नवीन उपक्रम राबवणार आहेत. सिग्नल वर जे गरीब मुलं-मुली काहीना-काही मागत असतात. त्यांना या थंडीच्या दिवसात उबदार कपडे देण्याचा त्यांचा मानस आहे. ते वर्षभरात अनेक गरीब कुटुंबांना धान्य पुरवून किंवा अन्य स्वरुपात त्यांना सहाय्य करतात. अशाप्रकारचे उपक्रम राबविणारे पुण्यात २५ ते ३० चर्च तर ३० ते ३५ तरुण गट आहेत.
ते ख्रिसमस सेलिब्रेशन एक आठवडा करतात. २० तारखेपासुन त्यांच्या सेलिब्रेशनला खरी सुरुवात होते. त्यात ते कॅरल सिगीगं करतात, एकमेकांना घरी फराळासाठी निमत्रंण देतात, डेकोरेशनस करतात, नातेवाईकांना भेट वस्तु देतात आणि २४ तारखेच्या रात्रीला सर्व तरुण एकत्र येऊन प्रार्थना करतात व फायर कॅम्प करतात. २५ तारखेला दिवसभर ते नातेवाईकांसोबत घालवतात आणि अनेक सांस्कॄतिक कार्यक्रम देखील ते करतात. त्यात बायबल मध्ये जे दाखले दिले आहेत, म्हणजे येशु ख्रिस्ताचा जन्मनंतर देवदुत कसे आले? नंतर मेढपाळ कसे आले? याचा सेट तयार करुण नाटीका सादर केली जाते. जग कशा प्रकारे वाईट मार्गाला जात आहे. त्यातुन कसे बाहेर पडता येईल. यावर नाटीका सादर करतात. येशु ख्रिस्त या जगात येण्याचं कारण म्हणजे, त्यांनी असा आनंद दिला की, या जगात पैसा आहे, घर दार आहे परंतु हे आनंद अल्पकाळ टिकणारे आहेत. त्यामुळे चिरकाळ टिकणा-या गोष्टीवर विश्वास ठेवा असे येशु सांगतात. अशी माहिती शिलो चर्च ऑफ क्राईस्ट, पुणे संदिप गायकवाड यांनी दिली. संदिप गायकवाड या संस्थेत ३-४ वर्षापासुन तरुण गटाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.
नाताळ मध्ये विशेष आकर्षणाचा भाग म्हणजे 'सांटाक्लॉज'. चौथ्या शतकात आशिया मायनर मध्ये सेंट निकोलस नावाचे बिशप होते. स्थूल शरीर, पांढरीशुभ्र दाढी आणि सदैव हसतमुख असलेले हे बिशप सत्कृत्ये आणि मुलांबद्दलचे अपार प्रेम या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. सांटाक्लॉजच्या रुपाने नाताळ सणात त्यांची आठवण काढली जाते. ख्रिसमस ईव्हच्याच दिवशी घरातील मुले
झोपण्यापूर्वी घरातील प्रमुख ठिकाणी पायमोजे लोंबत ठेवतात. रात्रीच्या वेळी सांटाक्लॉज धुरांड्यातून उतरून पायमोज्यात खेळणी, खाऊ, पोषाख अशा नाना वस्तू ठेवून जातो अशी मुलांची समजूत करून दिली जाते. या सांटाक्लॉजला इंग्लंडमध्ये "फादर ख्रिसमस" तर हॉलंडमध्ये "सेंट निकोलस" असे नाव आहे. खास करून लहान मुलांमध्ये सांटाक्लॉजची जास्त क्रेझ पहायला मिळते.
* विशेष दृकश्राव्य निर्मितीव्दारे पंडितजींना आदरांजली
* षडज आणि अंतरंगचे आयोजन
* संगीत विश्वातील दिग्गज कलाकारांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन
* पं.विजय सरदेशमुख यांना यंदाचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर
देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील मानाचे पान असलेली ५९ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव या वर्षी सांगितीक मैफलीशिवाय अन्य वैशिष्ट्यापूर्ण उपक्रमांमुळे देखील रसिक मनावर गारुड घालणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न स्व. प. भीमसेन जोशी यांच्या सांगितीक आयुष्याचा धांडोळा घेणा-या विशेष दॄक-श्राव्य निर्मितीचे सादरीकरण, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील मातब्बर कलाकारांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन, षडज हा लघुपट महोत्सव आणि अंतरंग ही शास्त्रीय संगीतातील मान्यवर कलाकारांसोबतची संवाद मैफल याम्चा समावेश आहे.
अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडाळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. याप्रसंगी इंडियन मॅजिक आयचे अध्यक्ष श्रीरंग गोडबोले उपस्थित होते.
भारत्रत्न पं. भिमसेन जोशी यांना यंदाच्या महोत्सवात आदरांजली वाहण्यासाठी आम्ही एक विशेष दॄक श्राव्य निर्मिती करत आहोत. पंडितजींच्या अलौकिक सांगितीक वाटचालीतील विविध टप्पे आणि पैलू याव्दारे रसिकांपुढे येणार आहेत. आर्य संगीत मंडळाची संकल्पना असलेल्या या विशेष दॄक-श्राव्य उपक्रमाची निर्मिती पुण्यातील इंडियन मॅजिक आय ही संस्था करत आहे. यामध्ये पंडितजींचे आयुष्य पाच मुख्य भागांमधून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्यामध्ये ध्यासपर्व (जीवनातील आरंभीचा भाग व संगिताकडे असणारी अनिवार ओढ), गुरुभेट आणि शिक्षक, प्रासादीक गाणे, प्रचार-प्रसार आणि संगितविचार यांचा समावेश आहे. महोत्सवात दोन मैफलींच्या दरम्यान छोट्या छोट्या भागांमध्ये ही वैशिष्ट्यपूर्ण दॄक-श्राव्य निर्मिती रसिकांना पहायला मिळणार आहे, अशी माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.
या निर्मितीसाठी इंडियन मॅजिक आयच्या चमूने कर्नाटकातील कुंदगोळे, गदग, हुबळी, धारवाड तर पंजाबमधील जालंधर आणि नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटी देऊन चित्रीकरण केले आहे. पंडितजीच्या आठवणींशी विशेष नाते जडलेली विविध ठिकाणे आणि व्यक्ती यांना यात विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यात अगदी जालंधरचा पंडितजींचा आवडता धाबा असो वा दिल्लीतील पंडितजींचे ९२ वर्षाचे मित्र अश्विनीकुमार यांची विशेष मुलाखत असो. या निर्मितीतून अशा कित्येक आठवणी जागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या निर्मितीतून अशा कित्येक आठ्वणी जागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या महान व्यक्तीच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलूंचा शोध आणि घेणार हा पहिलावहिला उपक्रम आमच्यासाठी खरोखरच आव्हानात्मक आणि संस्मरणीय आहे असे श्रीरंग गोडबोले यांनी यावेळी सांगितले.
षडज लघुपट दाखविण्यात ७ डिसेंबर रोजी रविन्द्र मंकणी निर्मिते भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्यावरील एक विशेष लघुपट दाखविण्यात येणार आहे तर दि. ८ डिसेबंर रोजी प्रसिध्द अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी प्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर यांच्यावर केलेला लघुपट बघण्याची संधी रसिकांना मिळेल. दि.१० डिसेंबर रोजी मकरंद ब्रम्हे यांनी साकारलेल्या पं.राजन व साजन मिश्रा यांच्या वरील लघुपट रसिकांसमोर येईल.
अंतरंगमध्ये ७ डिसेंबर रोजी पं. अजय पोहनकर, ८ डिसेबंर रोजी पं. रोणू मजुमदार आणि १० डिसेंबर रोजी डॉ. प्रभा अत्रे यांचे संगीतविषयक विविध पैलू उलगड्वून दाखविणारी संवाद मैफल रंगणार आहे. तसेच दि. ९ डिसेबंर रोजी प्रसिध्द संगीत अभ्यासक बकुळ भावसार यांचे पं. भीमसेन जोशी यांच्यावरील एका विशेष दॄक-श्राव्य सादरीकरण होणार आहे. यात पंडितजींची काही दुर्मिळ रेकॉर्डीग एकण्यात व पाहण्याची संधी उपस्थितांना मिळेल.
षडज व अंतरंग यासाठी प्रवेश नि:शुल्क असून प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे. षड्जची वेळ सकाळी १० ते ११.३० असून अतंरगंची वेळ ११.४५ ते दुपारी १ अशी आहे.या दोन्ही उपक्रमांसाठीचे कार्यक्रमस्थळी शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक असणार आहे.
गेली काही वर्ष मंडळातर्फे महोत्सवाच्या ठिकाणी विशिष्ट विषयावर आधारीत छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदा प्रसिध्द अर्कचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी चितारलेल्या मातब्बर कलाकारांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे ७० हून अधिक अर्कचित्रांचा समावेश आहे. पं. भीमसेन जोशी, पं. रविशंकर, पं. जसराज , उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरीप्रसाद चौरासिया यांच्यासह अनेक कलाकारांची अर्कचित्रे या प्रदर्शनात असतील. ऑन-द-स्पॉट अर्कचित्रे काढ्ण्यात श्री. वाईरकर यांची ख्याती आहे. प्रदर्शनातील अनेक अर्कचित्रे त्यांनी ऑन-द-स्पॉट काढलेली आहेत.
शास्त्रीय संगीतामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी पं. विजय सरदेशमुख यानां जाहीर करण्यात आला आहे. रुपये ३५०००/- रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पं. सरदेशमुख हे पं. कुमार गंधर्व यांचे शिष्य होत.
Thanksgiving or Thanksgiving Day, celebrated on the fourth Thursday in November, has been an annual tradition in the United States since 1863, when during the Civil War, President Abraham Lincoln proclaimed a national day of thanksgiving to be celebrated on Thursday, November 26.
Thanksgiving is America's preeminent day. It is celebrated every year on the fourth Thursday in the month of November. It has a very interesting history. Its origin can be traced back to the 16th century when the first thanksgiving dinner is said to have taken place.
Journey of Pilgrims
The legendary pilgrims, crossed the Atlantic in the year 1620 in Mayflower-A 17th Century sailing vessel. About 102 people traveled for nearly two months with extreme difficulty. This was so because they were kept in the cargo space of the sailing vessel. No one was allowed to go on the deck due to terrible storms. The pilgrims comforted themselves by singing Psalms- a sacred song
Arrival in Plymouth
The pilgrims reached Plymouth rock on December 11th 1620, after a sea journey of 66 days. Though the original destination was somewhere in the northern part of Virginia, they could not reach the place owing to winds blowing them off course. Nearly46 pilgrims died due to extreme cold in winter. However, in the spring of 1621, Squanto, a native Indian taught the pilgrims to survive by growing food.
Day of Fasting and Prayer
In the summer of 1621, owing to severe drought, pilgrims called for a day of fasting and prayer to please God and ask for a bountiful harvest in the coming season. God answered their prayers and it rained at the end of the day. It saved the corn crops.
First Thanksgiving Feast
In the summer of 1621, owing to severe drought, pilgrims called for a day of fasting and prayer to please God and ask for a bountiful harvest in the coming season. God answered their prayers and it rained at the end of the day. It saved the corn crops.
First Thanksgiving Feast
It is said that Pilgrims learnt to grow corn, beans and pumpkins from the Indians, which helped all of them survive . In the autumn of 1621, they held a grand celebration where 90 people were invited including Indians. The grand feast was organized to thank god for his favors. This communal dinner is popularly known as “The first thanksgiving feast”. There is however, no evidence to prove if the dinner actually took place.
While some historians believe pilgrims were quite religious so, their thanksgiving would've included a day of fasting and praying, others say that the Thanksgiving dinner did take place.
Turkey and First Thanksgiving Feast
There is no evidence to prove if the customary turkey was a part of the initial feast. According to the first hand account written by the leader of the colony, the food included, ducks, geese, venison, fish, berries etc. There is no evidence to prove if the customary turkey was a part of the initial feast. According to the first hand account written by the leader of the colony, the food included, ducks, geese, venison, fish, berries etc.
Pumpkin and Thanksgiving Feast
Pumpkin pie, a modern staple adorning every dinner table, is unlikely to have been a part of the first thanksgiving feast. Pilgrims however, did have boiled pumpkin. Diminishing supply of flour led to the absence of any kind of bread.
The feast continued for three days and was eaten outside due to lack of space. It was not repeated till 1623, which again witnessed a severe drought. Governor Bradford proclaimed another day of thanksgiving in the year 1676. October of 1777 witnessed a time when all the 13 colonies joined in a communal celebration. It also marked the victory over the British.
After a number of events and changes, President Lincoln proclaimed last Thursday in November of thanksgiving in the year 1863. This was due to the continuous efforts of Sarah Josepha Hale, a magazine editor. She wrote a number of articles for the cause.
Black Friday is the day following Thanksgiving Day in the United States, traditionally the beginning of the Christmas shopping season. On this day many U.S. retailers open very early, often at 5 a.m., and offer promotional sales to kick off the shopping season.
Ingredients
* 1 (18 pound) whole turkey
* 1/2 cup unsalted butter, softened
* salt and freshly ground black pepper to taste
* 1 1/2 quarts turkey stock
* 8 cups prepared stuffing
Directions
1. Preheat oven to 325 degrees F (165 degrees C). Place rack in the lowest position of the oven.
2. Remove the turkey neck and giblets, rinse the turkey, and pat dry with paper towels. Place the turkey, breast side up, on a rack in the roasting pan. Loosely fill the body cavity with stuffing. Rub the skin with the softened butter, and season with salt and pepper. Position an aluminum foil tent over the turkey.
3. Place turkey in the oven, and pour 2 cups turkey stock into the bottom of the roasting pan. Baste all over every 30 minutes with the juices on the bottom of the pan. Whenever the drippings evaporate, add stock to moisten them, about 1 to 2 cups at a time. Remove aluminum foil after 2 1/2 hours. Roast until a meat thermometer inserted in the meaty part of the thigh reads 180 degrees F (80 degrees C), about 4 hours.
4. Transfer the turkey to a large serving platter, and let it stand for at least 20 to 30 minutes before carving.
Ingredients
6 (8 ounce) sweet potatoes
1 1/2 tablespoons prepared horseradish
2 tablespoons honey
2 tablespoons butter or margarine
1/2 teaspoon salt
1/4 cup heavy cream
Directions
1. Preheat the oven to 400 degrees F (200 degrees C). Place potatoes on a baking sheet and bake for 40 to 50 minutes, until tender enough to easily pierce with a fork. Cool slightly and remove peels.
2. Place the cooked sweet potatoes into a large bowl and mash with the horseradish, honey, butter and salt. Whip with an electric mixer until light and fluffy, adding heavy cream as needed to get the texture you desire. Serve immediately, or keep warm in the oven until time to serve.
1. Slice peppers lengthwise, remove seeds and core; fill with cheese.
2. Roll out sausage with rolling pin, between two layers of plastic wrap. Remove plastic from sausage, and wrap a thin coating of sausage around each jalapeno.
3. Roll peppers in spicy seasoned coating mix.
4. Bake at 350 degrees F (175 degrees C) for 15 to 25 minutes or until brown and sizzling and cheese is melted.
Tools large saucepan
colander
potato masher
wooden spoon
large frying pan
small saucepan
small bowll
blender or food processor
9x13-in or other large baking dish
slotted spoon
foil
Time
2½ pounds red or Yukon Gold potatoes, quartered
salt
2 T butter
¾ c milk
6 oz fresh goat cheese
black pepper
3 T plus ½ c olive o8il
1½ pounds fresh mushrooms (Portobello, shiitake, oyster, and/or chanterelle), chopped
4 gloves garlic, minced
½ oz dried porcini mushrooms OR 1 oz dried shiitake mushrooms, minced
1 hour 30 minutes
¾ c Marsala or Madeira
1 c red lentils
1 c sour cream
½ c Parmesan, grated
1 c fresh basi
6 whole green onions, chopped
2 T lemon juice
1 pound fresh lasagna noodles or dry noodles, cooked
Directions
1.Boil potatoes with water and salt about 15 minutes, until tender. Drain and macsh with butter, milk, and half of the goat cheese. Add salt and pepper and set aside.
2.Meanwhile, heat 3 T oil over medium heat, add fresh mushrooms, and sauté until golden, about 5 minutes. Add 3 cloves garlic, sauté another minute, then add dried mushrooms, Marsala, salt, and pepper. Set aside.
3. Boil 2 c water with lentils, cook five minutes until tender, set aside.
4. Combine sour cream with remaining goat cheese and half of the Parmesan, set aside.
5. Preheat oven to 375.
6. Oil the baking dish, then line with lasagna noodles. With the slotted spoon, sprinkle mushrooms evenly over noodles, then top with noodles. Spread on the mashed potatoes, then more noodles. Add sour cream, then lentils, then another layer of noodles. Cover with foil and bake for 45 minutes.
7. Just before the lasagna is done, combine basil, green onions, and remaining garlic in the blender. Slowly add ½ c olive oil, then lemon juice, then 2 T water. Season with salt and pepper and spoon onto dinner plates.
8. Sprinkle remaining Parmesan over the lasagna and cut into squares. Place a serving on each plate, and serve immediately.
Notes This recipe seems complicated, but in fact it just has a lot of ingredients and mixtures set aside all over the kitchen. As long as you have counter space and lots of dishes, you shouldn't have any trouble.
नावावर जाऊ नका. या वर्षी धर्मसंकट आलाय खरं. thanksgiving आणि संकष्टी एकाच दिवशी आल्याने बर्याच अनिवासी भारतीयांना पेचात टाकलाय. facebook वरच्या काही लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया
१. टर्की चा विचार करू नका
२. टोफुर्की (टोफू + टर्की)
३. साबुदाणा भरून केलेली टर्की
४. दोन्ही divas paalu शकता. संकष्टी भारतीय वेळेप्रमाणे पाळा म्हणजे दुपारी १.३० पर्यंत संपेल. म्हणजे तोपर्यंत धार्मिक बना आणि नंतर टर्की वर तुटून पडा.
५. टर्की ला उपवासाचे पदार्थ खायला घाला आणि नंतर तिला खा. म्हणजे उपासाची टर्की खाल्यासारखे होईल.