भावगंधर्वांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रंगीतरजनी
Savai Gandharv

   प्रसिद्ध संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘अक्षय गाणॆ अभंग गाणे’ हा त्यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह(पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे.

   शिरीष रायकर यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात रविंद्र साठे, डॉ. सलिल कुलकर्णी, विभावरे आपटे-जोशी, मधुरा दातार, राधा मंगेशकर हे गायक कलाकार गायन करणार आहेत. तर संगीत संयोजन विवेक परांजपे आणि निवेदन अरूण नूलकर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून भोजनाचीही व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment