दसरा हा विजयाचा, पराबमाचा, चांगल्या शब्दाचा वाईट शब्दावरील विजयाचे कौतुक असलेला सण! विजयादशमी म्हणजे विजय देणारा दिवस. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही कामात हमखास यश मिळणार असे मानतात. दसरा हा नऊ रात्रीच्या अखेरीस साजरा करतात. आश्विन शु्द्ध प्रतिमेपासून नवमीपयर्तं नऊ दिवस चालणारा हा देवीचा उत्सव होय. दुर्गा,सरस्वती व लआमी या देवतांचे पूजन करणारा हा उत्सव भारतात सर्वत्र गणपतीप्रमानेच सार्वजनिक तसेच कौटुंबिक स्तरावर मोठया उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवसात महाराष्ट्रात खेळला जाणारा ‘भोंडला’ आपल्याला निसर्गात होणा-या या बदलाची आठवण करून देतो. आश्विन महिन्यात ह्त्ती नक्षत्रास सुरूवात झाल्यावर साधारण १५ दिवस भोडंला साजरा करतात. तेव्हा हत्ती नक्षत्राला सुरूवात होऊन, पावसाळा संपत आलेला असतो. दसयाच्या दिवशी रावणाच्या प्रतीमेचे दहनही करतात. गुजरात काठेवाड येथे घरोघर नवरात्र साजरा होतो.
बंगालमध्ये या उत्सवाचे प्रमाण सगळ्यात मोठे आहे. ‘दुर्गा ही बंगालमध्ये कुलदेवता असल्याने ‘दुर्गा पुजेचा हा उत्सव तिथे मोठया थाटामाटात साजरा होतो. हा उत्सव तिथे चार दिवसांचा असतो. उत्सवादरम्यान ‘ढाक’ या वाद्याच्या तालावर नृत्यसोहळा रंगतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या अंबा, तारा, लिलता, भुवनेश्वरी, चिन्नामाता, भैरवी, धुमवती, बागलमुखी आणि मातंगी या नऊ अवतारांची पूजा केली जाते. अलीकडे महाराष्ट्रातही बंगालूमाणे देवीचे सार्वजनिक उत्सव होताना दिसतात, रामलीलाही धुमधडाक्यात साजरी होते. गोव्यातल्या धनगर-गवळी या पशु-पालक जमातीचा ‘दसरा’ हा सवार्त मोठा सण आहे. शूर पराबमी राजे दस-याच्या शुभमुहूर्तावर स्वारीसाठी जात. अन्य राज्यांवर हल्ला चढवीत,त्याला ‘सीमोल्लंघन’ असे म्हणतात. राजे, सरदार लोक या दिवशी शस्त्राची पूजा करीत असत. ही प्रथा पेशवेकाळातही पाळली जायची. विजयी होण्यासासाठी विजयादशमीला मोहीम सुरू करायची रीत होती. शिनवारवाडयात पेशव्यांच्या घरी आणि सातार्याला छत्रपती शाहू महाराजांच्या वाडयात नवरात्र होत असे, दस-याला मोठा दरबार भरत असे. राजस्थानात रजपूत लोकही हा सण उत्साहाने साजरा करी्त. संस्कृतमध्ये ‘वनराज' म्हटल्या जाणा-या आपट्याच्या झाडाचे नाव आहे. भारतात सर्वत्र आढळणारा हा पानगळीचा छोटेखानी वृक्ष बहुगुणी आहे. आपल्याला सण-उत्सवाचा संबंध निसर्गावर श्रद्धा ठेवून त्याचे रक्षण करण्याशी जोडलेला आहे. दस-यालाही आपटा, शमी आणि कांचन या झाडानां विशेष महत्व आहे. या दिवशी आपट्याचे पान एकमेकांना सोने म्हणून देण्याची प्रथा आहे.
प्रत्येक क्षणाला विखुरलेल्या भारतीयांनो,
सोन्यासारखा हा दिवस,
सिमोल्लंघनाचा हा सण,
शमीची पानं सोनं म्हणून वाटताना,
एकमेकांना आपण देऊ या,
शब्दांतले सोनेरी कण,
आणि साठवून टवूया,
त्या सोनेरी आठवणी,
दसरा आला दिवाळीची अक्षता घेऊन,
नटला आहे गुढी तोरणांची प्रसन्न्ता लेवून,
सर्वच भाविकांना झगमग टीम कडून दस-याच्या हार्दिक शुभेच्छा...!