Diwali poem article
Untitled Document

"दीपावलीच्या शुभेच्छा"
चाहूल लागता दीपावलीची, आनंद होई सकल जनासी

तयारी करण्या सुरवात जाहली, माता पित्यासह बालकांची

(ध्रुव पद)


साफ सफाई झाड लोट ती, रंग ही देती भिंतीना

सुग्रास पदार्थ बनविताना, दिवस न पुरे त्या गृहिणींना

रोषणाई करू कंदील बनवू, धावडून सोडती वडिलांना

(1)


आली दिवाळी आली दिवाळी, ध्यास लागला बाळ गोपालाना

खरेदी खरेदी काय म्हणता, सोने चांदी, कपडा लक्ता

दिवस हौसे-मौजेचे हे,जातील मग बघता-बघता

विचार पक्का करुनी मग, निघालो जरी एकदा

नकळे मज काय घ्यावे, बहिणी आणि बायको करता

(२)


  जमीन सारवू, सुसज्ज करूया, लेप देऊनी गेरूचा

फटाके ही वाळत पडती, आधार घेउनी सुपाचा

अत्तरे, तेले, साबण आले, सुगंध पसरे उटण्याचा

प्रात्त्काली उठा आज, समय असे अभ्यंग स्नानाचा

(३)


आप्त स्नेही येती सर्व, उधाण येई गप्पांना

लाडू, करंज्या, चकली, चिवडा, हवन सारे करताना

सुखी जीवन भासत असे हे वामकुक्शीतील स्वप्नांना

सण हा असा घेऊन येई, शुभेच्या नवीन वर्षांना

(४)


~लता विनोद

AddThis Social Bookmark Button
 

Add comment