लाडक्या बाबांच्या आदरार्थ ‘फादर्स डे’
Untitled Document
लाडक्या बाबांच्या आदरार्थ ‘फादर्स डे’
(1)

  

आपले चिमुकले हाथ धरून जे आपल्याला चालायला
शिकवतात....
ते बाबा असतात.....
आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने सगळ्यांना
सांगतात.....
ते बाबा असतात....
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना
सावरतात....
ते बाबा असतात...

   आज अनेक मुला-मुलींना आपल्या आई-वडिलांना सोडून स्वत:च्या करीअरसाठी एका देशातून दुस-या देशात, एका शहरातून दुस-या शहरात जावं लागतं. शेवटी काय तर घर सोडावं लागतं. कधी कधी तर एकाच शहरात असूनही त्यांना भेटता येत नाही. काय करणार नाईलाज असतो. आणि आजकाल आई-वडिलही समजून घेतात की, आपले मुलं कामात आहेत. पण आपल्या लाडक्या लेकरांना भेटण्याची त्यांची इच्छा होत असेलंच ना...? तशीच मुलांचीही इच्छा होत असेलंच ना..? म्हणून या गोष्टीवर उपाय म्हणून भारतात ’फादर्स डे’ कडे सकारत्मक दृष्टीने पाहिलं जातंय. समाजाच्या अनेक घटकांमधून या ’डेज’ना विरोध होत असतो, पण जर या निमित्ताने संपूर्ण फॅमिली एकत्र आनंद साजरा करत असतील, तर त्यात काय गैर आहे ? वेगवेगळ्या देशात हा ’डे’ वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. काही प्रमुख देशांमध्ये आणि भारतात ’फादर्स डे’ येत्या १९ जून ला साजरा केला जाणार आहे. वडिल आणि मुलींचं नातं तसं मुलांपेक्षा वेगळं आणि जास्त जिव्हाळ्याचं असतं. त्यामुळे फादर्स डे बद्दल काय वाटतं? तो कसा साजरा करतात? बाबांना गिफ्ट काय देणार? याच प्रश्नांना घेऊन चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींचे मत आम्ही जाणून घेतले.

   * आदिती सारंगधर -
तरूणाई साजरे करत असलेल्या ‘डेज’ ना ब-याचदा पाश्चात्य संस्कृती म्हणून विरोध केला जातो. याबाबत आदितीला विचारले असता ती म्हणाली, "अफकोर्स..साजरे करावेत...!आपण आपला वाढदिवस साजरा करतोच ना..? त्याचप्रमाणे जर एक दिवस आपल्या बाबासाठी साजरा केला तर त्यात काय हरकत आहे? मी या गोष्टीच्या विरोधात नाहीच. मी खूप आनंदाने फादर्स डे साजरा करते. प्रत्येक फादर्स डे ला आम्ही तिघीही बहीणी एकत्र जमतो. बाबांना विश करतो. काही गिफ्ट देतो. यावेळीही जर शूटींग नसेल तर कल्याणला जाऊन त्यांच्या बरोबर धम्माल करेन", असं ती म्हणाली.

   यावेळी तिने तिच्या बाबांच्या काही आठ्वणीही शेअर केल्या, "लहानपणापासून त्यांना दिलेल्या त्रासाबद्दल मी त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून सॉरी म्हणते आणि धन्यवादही देते. या क्षेत्रात यायला बाबांनी केलेला सपोर्ट हा पूर्णपणे प्रॅक्टीकल सपोर्ट होता. रात्री बेरात्री मला स्टेशनला घ्यायला येणं, सोडायला जाणं. ह्या गोष्टी त्यांनी केल्यात. नेहमीच चांगल्या गोष्टींचे फंडे त्यांनी शिकविले. आता पैसा येत असल्याने तो कसा वापरायचा, त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा. याबाबत तर बाबांनी खूप काही शिकवलं". असं ती म्हणाली.

AddThis Social Bookmark Button