गणपतींसमोरील देखाव्यांवर अण्णांचा प्रभाव
Savai Gandharv

  काल मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात गणरायाचे आगमन झाले असून सगळीकडे अतिशय पवित्र आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पुढेचे दहा दिवस बाप्पाचे दर्शन घेणे, प्रसाद खाणे ह्या गोष्टींची धूम असणार आहे. प्रत्येक शहरातील मिठाईची दुकाने वेगवेगळ्या पदार्थांनी सजली आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक गणेश मंडळांनी अतिशय सुंदर असे देखावे उभारले. यावर्षीच्या देखाव्यांमध्ये अण्णा हजारेंचाही प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसतोय.

बाजारपेठा सजल्या

   नोकरी, व्यवसाय यामुळे खरेदीसाठी वेळ न मिळालेल्यांनी आज सकाळीच मंडई गाठली. गणपतीसाठी लागणारे फुले, पत्री, दूर्वा यांच्या खरेदीबरोबरच सजावटीच्या वस्तूंची खरेदीही झाली. दूर गावाहून आलेल्या कमळांच्या पाकळ्या उमलत होत्या. पूर्ण उमललेल्या कमळांवरून नजर हटत नव्हती. ऋषिपंचमीसाठीही खरेदी चालू होती. त्यामुळे सायंकाळी तुळशीबाग, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसर गर्दीने फुलून गेला. लक्ष्मी शिंदे म्हणाल्या, ""ऋषिपंचमीसाठी विविध भाज्या, दही, काकडी, फुले, पाने, हार लागतात. त्याचबरोबर पूजेसाठी लागणारे साहित्य, रांगोळी यांचीही खरेदी झाली

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment