पुण्यातील ढोल-ताशांना पुण्याबाहेरही डिमांड
Savai Gandharv

  पुण्यातील गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पुणेरी ढोल-ताशे. आज पुण्यात शेकडो ढोल-ताशांची पथके तयार झाली आहेत. सुरवातीला फक्त पुण्यात वाजवणा-या या ढोल ताशांना पथकांना पुण्य़ाबाहेरही डिमांड वाढली असून यावर्षी पुण्यातील अनेल प्रसिद्ध पथके मुंबई, सांगली, सोलापूर अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये दाखल होणार आहेत.

पुण्याबाहेरच काय तर पुण्य़ातील शिवगर्जना या पथकाची सातासमुद्रापार ऑस्ट्रेलीत सुद्धा शाखा आहे. तेही गणेश उत्सव आणि इतरही उत्सवांना ढोल-ताशे वाजवतात. तसंच यावर्षी नव्याने सुरू झालेल्या ‘नादब्रह्म’ या पथकालाही चांगलीच डिमांड आली आहे. हे पथक चक्क सिने अभिनेता सलमान खान याच्या घरच्या गणपतीसमोर वादन करणार आहेत. त्यामुळे पथकातील सर्वच मुले चांगलेच आनंदीत आहेत. यासोबतच ज्ञान प्रबोधिनी हेही पथक पुण्याबाहेर वादन करणार आहेत.

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment