आजपासून देशभरात नवरात्रोत्सवाला जोरदार सुरवात झाली असून येत्या नऊ दिवसात आदिशक्ती दूर्गामातेची पूजा मोठ्या जल्लोषात रंगीबेरंगी वातावरणात केली जाते. दूर्गामातेच्या भक्तांसाठी हे नऊ दिवस जणू मंतरलेलेच असतात. या उत्सवाचं एक सर्वात खास आणि आकर्षिय वैशिष्ठ्य म्हणजे ‘दांडिया’. मुळात गुजराती असलेला हा नृत्यप्रकार या उत्सवा दरम्यान देवीच्या आराधनेसाठी नऊही दिवस केला जातो. या दांडियात आज तरूणाई मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात. आणि त्यासाठी लागणारी तयारीही मोठ्या जोशात करतात. विविध शहरात दांडिया रासचे आयोजन खूप मोठ्याप्रमाणात केल्या जाते.
राज्यात वेगवेगळ्या देवींचे अनेक प्रसिद्ध देवस्थाने असून या उत्सवादरम्यान हजारो भाविक दूरदूरून देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी अनेक देवस्थानांनी आवश्यक त्या सुविधांची व्यवस्था केली आहे. दर्शनासाठी गर्दी होत असल्याने या गर्दीत कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे.
घटस्थापना होणा-या दिवसापासून भक्त नऊ दिवस उपवास करतात आणि बरेचसे भक्त अनवानी चालतात. नऊही दिवस वेगवेगळ्या देवींच्या मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. इतर शहरांप्रमाणे पुण्यातील भवानी माता, चतु:शृंगी माता, जोगेश्वरी माता आणि पद्मावती माता या मंदिरांमध्ये आजपासून भाविकांनी गर्दी केली आहे. त्याचप्रमाणॆ मुंबईतील मुंबादेवी, महालक्ष्मी देवी, जीवदानी देवी येथेही दर्शनासाठी भाविकांनी तूफान गर्दी केली आहे. सर्वच भाविकांना झगमग टीम कडून नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...!