पावसाच्या सरीत पुण्यातील दहीहंडी उत्सव
Savai Gandharv

  पुणे : महाराष्ट्रातील पहिली मानाची दहीहंडी समजल्या जाणा-या पुण्याच्या बाबू गेनू दहीहंडी उत्सवाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांनी गर्दी केली होती. डिजेच्या तालावर ताल धरत हजारो लोक यात सामिल झाले. यावेळी उत्सवाचे खास आकर्षण ठरले ते अण्णा हजारे. शिवाय अनेक मानाच्या दहीहंड्यासमोर मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही हजेरी लावली होती. भाविकांनी सायंकाळी ५ नंतर दहीहंडी उत्सवात सामिल होण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. अचानक वरून बरसणा-या अलगद पावसाच्या सरींचाही गोविंदांनी आणि लोकांनी आनंद चांगलाच आनंद लुटला.

   सायंकाळी पाच पासून लोकांनी दहीहंडीच्या ठिकाणांवर गर्दी करण्यास सुरवात केली होती. जिथून गोविंदाचे थर स्पष्ट दिसतील अशा ठिकाणावर लोकांनी आधीच आपला मुक्काम ठोकला होता. बाकी तरूणाई गच्च भरलेल्या गर्दीत ठूमके लावत होते. ग्रुपने आलेले तरुण ‘मी अण्णा हजारे’ असं स्लोगन असलेल्या गांधी टोपी घालून अण्णांच्या समर्थनात घोषणा देत होते. प्रत्येक ग्रुप मध्ये हेच दिसून आले. त्यामुळे अण्णांना या दहीहंडींच्या माध्यमातून आणखी चांगलंच एक्सपोजर मिळालं.

   पुण्यातील बाबू गेनू, दुर्वांकूर, सुवर्णयुग मित्र मंडळ, सदाशिव पेठ, जिलब्या मारूती, हिराबाग चौक दहीहंडी उत्सवांना भाविकांनी जोरदार प्रतिसाद दिला. पुण्यातील प्रसिद्ध सुवर्णयुग मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील शिवतेज तरूण मंडळाच्या गोविदांनी तब्बल सात थर लावून फोडली. या गोविंदांचा उत्साह वाढवण्य़ासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसाद ओक, शर्मिष्ठा राऊत, दिपाली सय्यद, अमृता साठे, मृण्मयी देशपांडे, गिरीश ओक ह्या मराठी कलाकारांनी आणि विवेक ओबेराय, रिया सेन आणि निशा कोठारी अशा हिंदीतील बड्या स्टार्सनी पुण्यातील विविध दहीहंड्यांना हजेरी लावली होती. या सर्वांनीच इतरांप्रमाणे डिजे तालावर ताल धरल्याने त्यांना पाहण्यास त्यांच्या चाहत्यांनीही चांगलीच गर्दी केली.

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment