पुणेरी ढोल ताशे
Untitled Document

  हम भी किसीसे कम नही..!

  पुण्यात गणेशोत्सवाची चाहूल लागताच लगबग सुरु होते ती ढोल ताश्या पथकांच्या सरावाची....आणि सुरु होतो जल्लोष, ढोल ताश्यांची दुरुस्ती, नवनवीन ताल बसवणे, ध्वज नाचवण्याचा सराव करणे, आपापल्या पथकांचे पोषाख तयार करणे आदी गोष्टी..पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासुन मानाच्या मंडळांसमोर वाजवणारी अनेक मानाची पथके आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आज शहरात शेकडो लहान मोठी पथकं तयार झाली आहेत. एक ज्ञानप्रबोधिनी पथकाच्या (मुलींचे) पूजा देशपांडे हिच्याशी साधलेला संवाद.....Read More..

  ब्रंह्मातून निघालेला पहिला नाद ‘नादब्रंह्म’

  दिवसेंदिवस पुण्यातील गणेशोत्सवात वाजविल्या जाणा-या ढोल-ताशांच्या पथकांची क्रेझ तरूणाईमध्ये वाढतांना दिसते आहे. यात मुलीही मागे न राहता तरूणांच्या खाद्यांला खांदा लावून या मर्दानी खेळात सामिल होत आहेत. पुण्यातील अनेक पथकांपैकी जी काही प्रमुख पथकं आहेत त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे वाजवणा-यांची असलेली संख्या आणि वाजवले जाणारे नवनवीन ताल. या पथकांमध्ये वाजवणा-यांच्या संख्येचा विचार केला तर यावर्षी नव्यानेच सुरू झालेल्या ‘नादब्रंह्म’ पथकाचा विषय निघतोच. पहिलंच वर्ष असलेल्या या पथकाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी पथकाचे मुख्य श्री.अतुअल बेहेर यांच्या साधलेला संवाद.... Read More..

  सिंहाची गर्जना असलेलं ‘शिवगर्जना’

  पुण्यातील काही प्रसिद्ध पथकांमध्ये शिवगर्जना हे पथक चांगलंच प्रसिद्ध आहे. मिरवणूकीत लोकं या पथकाचा शोध घेत हजारो लोकांना पालथं घालतात. ते जिथं वाजवतील तिथे उभं राहून त्यांना ऎकतात आणि त्यांच्या तालावर ताल धरत त्यांना प्रतिसाद देतात. जवळपास ४५० तरुण-तरूणींचा सहभाग असलेलं हे पथक कशा प्रकारे कार्य करतं. ते सराव कसा करतात. त्यांच्य़ांत एवढी शिस्त कशी? आदी गोष्टींची माहिती घेण्यासाठी या पथकाचे शिरीष थिटे यांच्याशी ‘झगमग टीम’ साधलेला संवाद..... Read More..

  ढोल-ताशे पथकातून पर्यावरण जनजागृती

  पुण्यात गणेशोत्सवाची चाहूल लागताच लगबग सुरु होते ती ढोल ताश्या पथकांच्या सरावाची....आणि सुरु होतो जल्लोष, ढोल ताश्यांची दुरुस्ती, नवनवीन ताल बसवणे, ध्वज नाचवण्याचा सराव करणे, आपापल्या पथकांचे पोषाख तयार करणे आदी गोष्टी.. पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासुन मानाच्या मंडळांसमोर वाजवणारी अनेक मानाची पथके आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आज शहरात शेकडो लहान मोठी पथकं तयार झाली आहेत. त्यात काही लहान मुलांची पथके आहेत तर काही फ़क्त मुलींची आहेत. साधारण १५० ते २०० तरुण- तरुणी असलेल्या या पथकांची माहिती घेण्यासाठी 'झगमग' टीम ने पुण्यातील काही प्रमुख पथकांपैकी एक विमलाबाई गरवारे पथकाचे प्रमुख रा.वि.शिंदे यांच्याशी साधलेला संवाद..... Read More..


AddThis Social Bookmark Button
 

Comments 

 
0 # pradeep rawate 2012-05-02 13:11
Hi...
mala video haave ahet.
Reply | Reply with quote | Quote
 

Add comment