संगीतकार संमेलनाच्या रंगछटा
Savai Gandharv

   आज मराठी संगीत विश्वात अनेक नवीन संगीतकार दाखल होतांना दिसून येतं. अनेक नवनवीन प्रयोग मराठी संगीतात करून मराठी संगीत आणखी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याच्या ते प्रयत्नात असतात. मात्र संगीतात नवनवीन प्रयोग करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि ह्या येणा-या अडचणींचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. या समस्येला डोळ्यांसमोर ठेवून मनसा आणि दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सहाय्याने गेल्या तीन वर्षांपासून संगीतकार संमेलन भरविले जात आहे. नुकतंच संगीतकार संमेलन २०११ मुंबई येथे पार पडलं. या संगीतकार संमेलनात छेडल्या गेलेल्या सुरांची मजा सर्वच रसिकांना घेता यावी, यासाठी झगमग डॉट नेट या वेबसाईटवर या संमेलनाच्या तीन दिवसातील ९ सत्रांचा लेखी आढावा रसिकांना वाचता येणार असून सोबतच याच सत्रांचा ऑडिओ स्वरूपातील आढावा सुद्धा श्रोत्यांना ऎकता येणार आहे. फक्त www.zagmag.net वर लवकरच......

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment