सवाई गंधर्व महोत्सव आता ओळखला जाणार‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ नावाने
Savai Gandharv

   भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ सुरु केलेला आणि देश- विदेशातील अभिजात संगीताच्या रसिकांसाठी पंढरी ठरलेला स्वरयज्ञ यावर्षीपासून ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’या नावाने ओळखला जाणार आहे. अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.

   स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांच्या पश्च्यात होणारा हा पहिलाच महोत्सव आहे. महोत्सवाचे हे ५९ वे वर्ष असून यंदा पहिल्यांदाच हा महोत्सव ७ ते ११ डिसेंबर असा पाच दिवस चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेच्या मैदानावर हा स्वरसोहळा पार पडेल. श्रीनिवास जोशी यांनी यंदाच्या कार्यक्रमाबद्द्ल माहिती दिली.

   महोत्सवाचा आरंभ (७ डिसेंबर) दरवर्षीप्रमाणे सनई वादनाने होईल. यंदाचे सनई वादक कलावंत आहेत. तुकाराम दैठणकर. त्यानंतर संजय गरुढ(गायन), पं. अश्विनी भिडे देशपांडे (गायन), पं. सतीश व्यास (संतुरवादन) आणि पं. अजय पोहनकर (गायन) आदी कलाकार आपली कला सादर करतील. महेश काळेंच्या गायनाने दुस-या दिवशीच्या (८ डिसेंबर) सत्राला सुरुवात होईल. त्यानंतर शैला दातार यांचे गायन होईल. यानंतर होणा-या पं. रोणू मजुमदार(बासरी) आणि कद्री गोपालनाथ (सॅक्सोफोन) यांचे हिंदुस्थानी आणि कर्नाटक सहवादक हे यंदाच्या महोत्सवाचे एक विशेष आकर्षण आहे. या दिवशीच्या शेवटी पुणेकरांना ज्येष्ठ गायक डॉ. बालमुरलीकॄष्ण यांचे गायन एकण्याची संधी ब-याच कालावधीनंतर उपलब्ध होत आहे.

  ; तिस-या दिवशी(९ डिसेंबर) कुमार मर्डुर (गायन), कार्तिक शेषाद्री( सतारवादन), शंकर महादेवन(कर्नाटक क्लासिकल ) आणि पं. जसराज(गायन)यांचा कलाविष्कार पुणेकरांना अनुभवण्यास मिळणार आहे.

   चौथ्या दिवशीचे (१० डिसेबंर) कलाकार आहेत योजना शिवानंद (गायन), श्रीनिवास जोशी(गायन), पं. मालिनी राजुरकर (गायन), त्यानंतर नृत्यनिकेतन उडपी भरनाट्यम शौलीत आणि शमा भाटे यांची नादरुप संस्था कथ्थक शैलीत ‘साकार-निराकार’ या विशेष प्रस्तुतीद्वारे भारत्रत्न पं. भीमसेन जोशींना मानवंदना देणारा आहेत. या दिवसाचा शेवत जगप्रसिध्द सरोदवादक उ.अमजद अली खॉ यांच्या सरोदवादनाने होईल.

  ; पाचव्या म्हणजे अखेरच्या दिवशी (११ डिसेंबर) ओंकार दादरकर(गायन), पज्ञा देशपांडे (गायन), डॉ. नागराज राव हवालदार (गायन), डॉ. श्रीमती एन. राजम (व्हायोलीन), पं. वेंकटेश कुमार (गायन) आदी कलाकार रसिकांसमोर येतील. महोत्सवाची सांगता किरणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने होईल.

   कार्यक्रम रोजी संध्याकाळी ४ ते १० या वेळेत पार पडतील. मात्र पहिल्या (७ डिसेंबर) आणि चौथ्या (१० डिसेंबर) दिवशी दुपारी ३. ३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.

   या स्वरमहोत्सवात पहिल्यांदाच आपली कला सादर करना-यांमध्ये संजय गरुड आणि महेश काळे या कलावंतांचा समावेश आहे. संजय गरुढ हे ज्येष्ठ दिवंगत गायक आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सचिव पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य आहेत तर महेश काळे हे तरुंण गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आहेत. त्याचबरोबर बरोबर प्रसिद्ध गायक पं. शंकर महादेवनही यंदाच्या महोत्सवात प्रथमच रसिकांसमोर येत आहेत. त्यांचे सांगितीक गुरु आहेत टी. आर. बालामणी, तारादेवी आणि श्रीनिवास खळे.

   सॅक्सोफोनवर कर्नाटकी संगीत वाजवणारे कद्री गोपालनाथ यांनी मंगलोर येथील कलानिकेतन गोपालकॄष्ण अय्यर यांच्याकडून संगीताचे धडे घेतले असून त्यांना सॅक्सोफोन - चक्रवर्ती असे ओळखले जाते. कुमार मर्डूर हे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सोमनाथ मर्डूर यांचे पुत्र-शिष्य आहेत. ज्येष्ठ सतार वादक पं. रवी शंकर यांचे शिष्य कार्तिक शेषाद्री यांचे वादनही पहिल्यांदाच रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

   योजना शिवानंद या पं. निवॄत्तीबुवा सरनाईक, पंडिता मणिक भिडे आणि पं. दिवंगत शिवानदं पाटील यांच्या शिष्या आहेत. डॉ.नागराज राव हवालदार हे ज्येष्ठ दिवंगत गायक पं. माधव गुढी यांचे शिष्य आहेत, तर ओंकार दादरकर हे पद्मश्री माणिक वर्मा आणि पं. उल्हास कशाळकर यांचे शिष्य आहेत. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पाठीशी अनेक संस्था उभ्या राहिल्या असून किर्लोस्कर, युनियन बॅक, स्वंट्रल बॅक ऑफ इंडिया हे शीर्षक प्रायोजक असून दरोडे जोग प्रॉपर्टीज मुख्य प्रायोजक आहेत. त्याचबरोबर या महोत्सवाला किर्लोस्कर ग्रीन, लोकसत्ता, आशा पब्लिसिटी, रेडीओ मिर्ची, झी मराठी आणि गार्डियन हॉलिडेज यांचे सह्कार्य लाभले आहे.

   महोत्सवाची तिकीट विक्री १ डिसेंबर्पासून लक्ष्मीरस्त्यावरील दिनशॉ आणि कंपनी, कमला नेहरु पार्कसमोर शिरीष ट्रेड्रर्स आणि कोथरुड तसेच टिळक रोडवरील नावडीकर म्युझिकल्स आणि बाजीराव रस्त्यावर बेहेरे बंधू आंबेवाले येथे सुरु होईल.

   खुर्च्यांसाठीचे सिझन तिकीट १८०० रुपये तर भारतीय बैठकीचे सीझन तिकीट फक्त १५० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमस्थळी त्या त्या दिवसांच्या भारतीय बैठ्कीची तिकीटे देखील १०० रुपयात उपलब्ध असतील.

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment