सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल

* विशेष दृकश्राव्य निर्मितीव्दारे पंडितजींना आदरांजली
* षडज आणि अंतरंगचे आयोजन
* संगीत विश्वातील दिग्गज कलाकारांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन
* पं.विजय सरदेशमुख यांना यंदाचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर

   देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील मानाचे पान असलेली ५९ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव या वर्षी सांगितीक मैफलीशिवाय अन्य वैशिष्ट्यापूर्ण उपक्रमांमुळे देखील रसिक मनावर गारुड घालणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न स्व. प. भीमसेन जोशी यांच्या सांगितीक आयुष्याचा धांडोळा घेणा-या विशेष दॄक-श्राव्य निर्मितीचे सादरीकरण, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील मातब्बर कलाकारांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन, षडज हा लघुपट महोत्सव आणि अंतरंग ही शास्त्रीय संगीतातील मान्यवर कलाकारांसोबतची संवाद मैफल याम्चा समावेश आहे. अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडाळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. याप्रसंगी इंडियन मॅजिक आयचे अध्यक्ष श्रीरंग गोडबोले उपस्थित होते.

   भारत्रत्न पं. भिमसेन जोशी यांना यंदाच्या महोत्सवात आदरांजली वाहण्यासाठी आम्ही एक विशेष दॄक श्राव्य निर्मिती करत आहोत. पंडितजींच्या अलौकिक सांगितीक वाटचालीतील विविध टप्पे आणि पैलू याव्दारे रसिकांपुढे येणार आहेत. आर्य संगीत मंडळाची संकल्पना असलेल्या या विशेष दॄक-श्राव्य उपक्रमाची निर्मिती पुण्यातील इंडियन मॅजिक आय ही संस्था करत आहे. यामध्ये पंडितजींचे आयुष्य पाच मुख्य भागांमधून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्यामध्ये ध्यासपर्व (जीवनातील आरंभीचा भाग व संगिताकडे असणारी अनिवार ओढ), गुरुभेट आणि शिक्षक, प्रासादीक गाणे, प्रचार-प्रसार आणि संगितविचार यांचा समावेश आहे. महोत्सवात दोन मैफलींच्या दरम्यान छोट्या छोट्या भागांमध्ये ही वैशिष्ट्यपूर्ण दॄक-श्राव्य निर्मिती रसिकांना पहायला मिळणार आहे, अशी माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

   या निर्मितीसाठी इंडियन मॅजिक आयच्या चमूने कर्नाटकातील कुंदगोळे, गदग, हुबळी, धारवाड तर पंजाबमधील जालंधर आणि नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटी देऊन चित्रीकरण केले आहे. पंडितजीच्या आठवणींशी विशेष नाते जडलेली विविध ठिकाणे आणि व्यक्ती यांना यात विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यात अगदी जालंधरचा पंडितजींचा आवडता धाबा असो वा दिल्लीतील पंडितजींचे ९२ वर्षाचे मित्र अश्विनीकुमार यांची विशेष मुलाखत असो. या निर्मितीतून अशा कित्येक आठवणी जागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या निर्मितीतून अशा कित्येक आठ्वणी जागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या महान व्यक्तीच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलूंचा शोध आणि घेणार हा पहिलावहिला उपक्रम आमच्यासाठी खरोखरच आव्हानात्मक आणि संस्मरणीय आहे असे श्रीरंग गोडबोले यांनी यावेळी सांगितले.

   षडज लघुपट दाखविण्यात ७ डिसेंबर रोजी रविन्द्र मंकणी निर्मिते भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्यावरील एक विशेष लघुपट दाखविण्यात येणार आहे तर दि. ८ डिसेबंर रोजी प्रसिध्द अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी प्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर यांच्यावर केलेला लघुपट बघण्याची संधी रसिकांना मिळेल. दि.१० डिसेंबर रोजी मकरंद ब्रम्हे यांनी साकारलेल्या पं.राजन व साजन मिश्रा यांच्या वरील लघुपट रसिकांसमोर येईल.

   अंतरंगमध्ये ७ डिसेंबर रोजी पं. अजय पोहनकर, ८ डिसेबंर रोजी पं. रोणू मजुमदार आणि १० डिसेंबर रोजी डॉ. प्रभा अत्रे यांचे संगीतविषयक विविध पैलू उलगड्वून दाखविणारी संवाद मैफल रंगणार आहे. तसेच दि. ९ डिसेबंर रोजी प्रसिध्द संगीत अभ्यासक बकुळ भावसार यांचे पं. भीमसेन जोशी यांच्यावरील एका विशेष दॄक-श्राव्य सादरीकरण होणार आहे. यात पंडितजींची काही दुर्मिळ रेकॉर्डीग एकण्यात व पाहण्याची संधी उपस्थितांना मिळेल.

   षडज व अंतरंग यासाठी प्रवेश नि:शुल्क असून प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे. षड्जची वेळ सकाळी १० ते ११.३० असून अतंरगंची वेळ ११.४५ ते दुपारी १ अशी आहे.या दोन्ही उपक्रमांसाठीचे कार्यक्रमस्थळी शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक असणार आहे.

   गेली काही वर्ष मंडळातर्फे महोत्सवाच्या ठिकाणी विशिष्ट विषयावर आधारीत छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदा प्रसिध्द अर्कचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी चितारलेल्या मातब्बर कलाकारांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे ७० हून अधिक अर्कचित्रांचा समावेश आहे. पं. भीमसेन जोशी, पं. रविशंकर, पं. जसराज , उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरीप्रसाद चौरासिया यांच्यासह अनेक कलाकारांची अर्कचित्रे या प्रदर्शनात असतील. ऑन-द-स्पॉट अर्कचित्रे काढ्ण्यात श्री. वाईरकर यांची ख्याती आहे. प्रदर्शनातील अनेक अर्कचित्रे त्यांनी ऑन-द-स्पॉट काढलेली आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी पं. विजय सरदेशमुख यानां जाहीर करण्यात आला आहे. रुपये ३५०००/- रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पं. सरदेशमुख हे पं. कुमार गंधर्व यांचे शिष्य होत.

- स्नेहा मुथा

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment