'पिफ'च्या उद्‌घाटन समारंभ थाटात
Savai Gandharv
pune international filme festival

  १० व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्‌घाटन समारंभ गुरुवारी पुण्यात मोठ्या थाटात पार पडला. श्रीराम लागू यांच्या हस्ते या फेस्टिवलचे उद्‌घाटन झाले. राणी मुखर्जी आणि आयर्लंडचे भारतातील राजदूत गुडमुंड एरिकसन यांची विशेष उपस्थिती होती. अमिताभ बच्चन आणि आशा भोसले यांना ‘आउटस्टँडिंग काँट्रिब्युशन ऑफ इंडियन सिनेमा’ हा पुरस्कार दिला गेला. इलया राजा यांना "सचिनदेव बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साउंड' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी सांस्कृतिक मंत्री संजय देवताळेही हजर होते. करियरची 50वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सचिन पिळगावकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे, महोत्सवाचे प्रमुख डॉ. जब्बार पटेल, उपाध्यक्ष सबिना संघवी, राज्याचे सांस्कृतिक संचालक आशुतोष घोरपडे, विविध देशांतील चित्रपट कलावंत आदी या वेळी उपस्थित होते.

pune international filme festival

   पुण्याबद्दल असणा-या अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल सांगताना ते म्हणाले की,"चित्रपटसृष्टीत मला नशिबाने आणले आणि प्रेक्षकांनी प्रेमाने स्वीकारले. पुणे कलानगरी म्हणून आवडतेच; पण माझे या शहराशी एक खास नाते आहे. येथेच मी पहिल्यांदा जयाला (बच्चन) भेटलो आणि याच शहरात मी तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले.''

pune international filme festival

   ‘चांदण्यात फिरताना, माझा धरलास हात...’ हे गाण गाऊन आशा भोसले यांनी पुणेकराना एक वेगळाच अनुभव करुन दिला. आशा भोसले यांनी दिलखुलास संवाद साधत रसिकांना खुश केले. इलया राजा यांचे कौतुक करता करता, त्या म्हणाल्या की सर्वात सुदंर संगीत हे तमिळ मधील आहे. असे म्हणत त्यानीं तमिळमध्ये गाऊन दाखवले. यावेळी इलया राजा म्हणाले,"संगीत हे निसर्गातच आहे. ते कुणी निर्माण करू शकत नाही.''

pune international filme festival

   सध्या मराठी चित्रपटात काम करणारी राणी मुखर्जी मराठमोळी पैठणी, नाकात नथ, हातात हिरव्या बागडया त्यातच मराठीत संवाद साधत आपण पुणेरी असल्याचेही सांगितले. "मी मराठीत बोलले तर चालेल का,' असे विचारत ती म्हणाली, ""मला पुणे खूप आवडते. मी मराठीच आहे, मी मुंबईत जन्मले. त्यामुळे मी मराठी नसले तरी मराठीच आहे. आता मी अय्या ह्या मराठी चित्रपटात काम करुन मी पक्की मराठी झाले आहे.'' आता फक्त तीन शब्द बोलते, असे सांगून राणी लाजत म्हणाली,"अय्या, इश्‍श, अग्गबाई..!''

   सुधीर गाडगीळ व दुरिया शिपचांडलर यांनी सूत्रसंचालन केले व डॉ.जब्बार पटेल यांनी प्रास्ताविक केले. या महोत्सवात 240 सिनेमे 6 वेगवेगळ्या थिएटर्समध्ये 10 स्क्रीन्सवर दाखवले जाणार आहे तसेच हे फेस्टिव्हल 19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment