आलाप भागवत
आलाप भागवत
Untitled Document
"Musical आलाप"

(1)

   आलाप भागवतशी गप्पा म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड अॅप्रोच. एन्टरटेन्मेट इंडस्ट्रीत काय केलंय याविषयी आलाप स्पष्ट. काय करणार याविषयी कमालीचा कॉन्फिडन्ट. कुठला आडपडदा नाही आणि कुठले रुसवे-फुगवे नाहीत. '२४ चा आहे आत्ता. आता एन्गेजन्मेट आणि २६ ला मॅरेज', अशी त्याची जशी आयुष्याची क्लॅरिटी तशीच 'माझं ब्रॅन्डिंग मीच तर करणार. दुसरा कसा काय करू शकेल ते मला हवं तसं? म्हणून तर सुरभी संस्था काढली...', अशी त्याची कमर्शिअल भूमिका. सगळं स्पष्ट, सुवाच्च आणि आलापसारखंच सुरेलही.

  मुंबईत पार्ल्यातल्या सीसीडीमध्ये सॅन्डविचसोबत कॉफी घेत आलापनं अगदी अनौपचारिक सुरूवात केली गप्पांना. 'माझा मेन स्टार्ट हा म्युझिकपासून आहे. म्युझिक अॅज ए करियर मी कॉलेजच्या टीवायनंतर सुरू केलं. आणि त्याआधी म्युझिक टू लर्न हे बारावीपासून,' असं आलापनं सांगितलं. याचं मुख्य कारण म्हणजे आलाप सध्या म्युझिकमध्ये तर आहेच; शिवाय इव्हेन्टस्, नाटकांचा निर्माताही आहे. तरीही सारं करिअर म्युझिकभोवतीच आहे, हे तो ठासून सांगतो. 'मी पहिला परफॉर्मन्स दिला तो एफवायमध्ये. लहानपणी खरं तर मी गाणं एेकूही शकत नव्हतो. हे काय गाताहेत वगैरे वाटायचं ! आज्जी खूप आधी गाण शिकायची म्हणे. माझी ताईही गायची. तिचं एेकून एेकूनच गाणं म्हणजे खूप बोअर आहे, वगैरे मीच म्हणायचो. टर्न मिळाला, तो अकरावीमध्ये एक क्लासिकलची कॉन्सर्ट एेकली तेव्हा. वाटलं, की येस...यात काहीतरी आहे...आपलं लायकिंग हेच आहे.'

   'घरचं सांस्कृतिक बॅकग्राऊंड असं नाहीय...,' असं सांगणाऱया आलापच्या आवाजात वडील 'लेखक आहेत,' याचा विशेष अभिमानही सहज डोकावतो. गप्पांचा ओघ आलाप पुन्हा पटकन म्युझिककडं वळवत सांगतो, 'रुईया कॉलेजला कोजागिरीच्या दिवशी आरडी नाईट होती. त्यासाठी ऑडिशन होणार होती. 'चल जाऊया', असं मित्रानं म्हटलं, म्हणून ऑडिशन दिली. माझं लायकिंग म्युझिक बनल होतंच. त्यातच ऑडिशनमध्ये पास झालो आणि आयुष्यातली पहिली कॉन्सर्ट मिळाली. तेव्हा फर्स्ट इअरला होतो. २००५ ची घटना असेल...', असं आलाप सांगतो.

  गप्पांमध्ये खूपदा आलाप 'बहुदा अमुक वर्षी', असा उल्लेख करतो. आणि लगेच सांगतो, 'आय हॅव टू करेक्ट हं. वर्षांचं गणित चुकतंय काही ठिकाणी !'. याच प्रांजळपणानं करिअर ग्राफकडं आलाप सरकतो. 'मराठी वाड्ंमय मंडळाची एक अभंग गायन स्पर्धा होती. त्यात भाग घेतला. गाण्यातला इन्थूझिअॅझम वाढत गेला. आता ठरवलं, की आपण गायचं. दरवर्षी कोजागिरी नाईटला गायला लागलो. त्या काळात क्लासिकल आवडायचं. सुगमकडं फारसं लायकिंग नव्हतं. पण, एका गुरूंना जॉइन केलं. विकास भाटवडेकर त्यांचं नाव. पार्ल्याला त्यांच्याकडं जायला लागलो आणि आयुष्य बदललं. त्यांनी माझं फूल लाईफ चेंज करून टाकलं. क्लासिकलकडून त्यांनी मला सुगमकडे आणलं. माझं लायकिंग बदललं. मग नक्की झालं, की करिअर करायचं ते सुगम संगितात...', इतक्या सहजपणे आलाप प्रवासाचा एकेक टप्पा मांडतो.