मराठी चित्रपटांना आणि रंगभूमीला ग्लोबल करणं हा ‘मिफ्ता’चा मुख्य उद्देश असल्याने, तो उद्देश पूर्ण करण्यासाठी अभिजीत पाटील आणि महेश मांजरेकर यांनी अनेक प्रसिद्ध लेखक, गायक, दिग्दर्शक, विविध संमेलनांचे आयोजक, संयोजक अशा व्यक्तींना टीम मिफ्तात सामिल करून घेतलंय. त्यामुळे मिफ्ताचं नाव लवकरच जगातील प्रसिद्ध पुरस्कारांमध्ये घेतलं जाईल यात शंकाच नाहीये. लंडन येथे होणा-या या सोहळ्याच्या लंडन कमिटीत संदिप पाध्ये, डॉ. महेश पटवर्धन, महराष्ट्र मंडळ लंडनचे अध्यक्ष श्री.अविनाश धोपटकर, श्री. काणेगांवकर यांच्याबरोबरच युरोपमधील कार्यकर्ते व प्रसिद्ध लेखक श्री.अनिल नेने यांनाही सामावून घेण्यात आहे. ह्याबरोबरच हाऊंन्स्लो, इलफ्रर्ड, मिल्टन किन्स, रेडींग, न्यु कासल, नॉर्वेमा आणि वेल्स येथील महाराष्ट्र मंडळेही या सोहळ्यात सहभागी आहेत. यानिमित्ताने श्री. अनिल नेने यांच्याशी केलेली बातचीत.....
मिफ्ता या पुरस्कार सोहळ्याबद्द्ल श्री.अनिल नेने यांच्याशी बोलण्याआधी त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याबद्द्ल जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. श्री. अनिल नेने हे एक प्रसिद्ध लेखक असून त्यांचं ‘खावे त्यांच्या देशा’हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. शिवाय त्यांचा‘मनोगत’ हा कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालाय. महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकसत्ता, सागर अशा महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्तपत्रातून आणि परदेशातील अनेक माध्यमातून त्यांनी वेळोवेळी विविध विषयांवर विपुल लेखनही केलं आहे. महाराष्ट्रा बाहेरील सर्वात जुन्या म्हणजे लंडनच्या महाराष्ट्र मंडळात १९७७ ते ८८ या काळात विविध पदांवर काम केलंय. तसंच युरोपियन मराठी संमेलने आणि परदेशात होणा-या सर्वच मराठी संमेलनांच्या आयोजनात त्यांचा खूप जवळून संबंध राहिला आहे.
या सोहळ्याचे आयोजक अभिजीत पाटीलशी त्यांचं सुत कसं जुळलं, याबद्दल श्री.अनिल नेने सांगतात की, " पॅरीसच्या युरोपियन मराठी संमेलनात मला एक धावपळ करत काम करणारा अत्यंत उत्साही कार्यकर्ता दिसला. तो म्हणजे अभिजीत पाटील. तेव्हाच त्याच्याशी माझा परिचय झाला. नंतर मी त्याची महाराष्ट्र मंड्ळाच्या तत्कालीन अध्यक्षा यामिनी साठे हिच्याशी आणि विविध मराठी मंडळांशी परिचय करून दिला. त्यानंतर अशा ब-याच मराठी संमेलनात, बीएमएमच्या अधिवेशानात आम्ही नेहमी भेटत गेलो. आज अभिजीत हा माझ्यातला आणि ‘मिफ्ता’तील दुवा आहे.
अभिजीत पाटील बद्द्ल पर्सनली तुम्ही काय सांगाल? असं विचारता त्यांनी सांगितले की " मुळात टूरिझमच्या घरात त्याचा जन्म झाला. त्याचे वडिल राजाभाऊ पाटील हे पॅकेज टूर देणारे पायोनियर होते. त्यांनी तेव्हा टूरिझम क्षेत्रात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. त्याचप्रमाणे अभिजीत सुद्धा हा आपलं स्वत:चं वेगळं टूरिझम मार्केट डेव्हलप करतोय. राजा राणी ट्रॅव्हल्स हे विविध साहित्य संमेलनात, अधिवेशनात, मिफ्ता सारख्या सोहळ्यांना आज ट्रॅव्हल पार्टनर म्हणून सोबत असतात. परदेशात सतत घडणा-या मराठी संस्कृती, कला आणि रंगभूमी यांच्या विषयी घडणा-या कार्यक्रमांना अनिल नेने मराठी अॅफक्टीव्हीटी मार्केट असं म्हणतात. ते मार्केट अभिजीत डेव्हलप करतोय. आज जगभरात मराठी कलाकारांचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. ह्यातून मराठी अॅटक्टीव्हीटी मार्केट तयार होऊ शकतं. असं म्हणण्यापेक्षा ते होतंय अस अनिल नेने यांचं मत आहे आणि तेच करण्याचं काम निश्चितच अभिजीत करतोय. माझ्यामते अभिजीत या क्षेत्रात काम करणारा हा पहिलाच पर्यटन व्यावसायिक आहे.
‘मिफ्ता’ सोहळ्याचं यजमानपद यावर्षी लंडनकडे कसं आलं? यावर ते सांगतात की, " मला वाटतं या गोष्टीचं पुष्कळचं श्रेय हे अभिजीत पाटील याला जातं. गेली अनेक वर्ष अभिजीत जगभर व्यवसाय करतोय. त्याच्या प्रत्येक क्षेत्रात अनेक ओळखी आहेत. अनेक मराठी मंडळांशी त्याचा संबंध आहे. यातूनच ही संकल्पना समोर आली. काय झालंय की गेल्या काही वर्षात अनेक मराठी लोकं नोकरी वा व्यवसायाच्या निमित्ताने भारताबाहेर मोठ्या प्रमाणावर यायला लागलेत. लंडनमध्ये येऊनही ते वेगवेगळ्या भागात पसरले आहेत. त्यांना एकत्र आणण्यासाठी सर्वच लहान, मोठ्या मराठी मंडळांनी एकत्र येऊन या सोहळ्याच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. यात संदिप पाध्ये, महेश पटवर्धन आणि अभिजीत पाटील ही मंडळी माझ्यासारखीच सहभागी आहेत.
लंडनमध्ये होण्या-या या सोहळ्याबद्दल काय सांगाल? यावर ते म्हणतात की, " मी माझं वैयक्तीक मत सांगतो की, मराठी मंडळांचा जर पाठिंबा लाभला तर हा एक उत्तम सोहळा होऊ शकतो. हे मला माहित होतं त्यामुळे या संकल्पनेकडे माझं आकर्षण होतंच. खरंच ही खूप उत्तम संकल्पना आहे. मला वाटतं या पुरस्कार सोहळ्याला आपण ‘मराठीतला ऑस्कर पुरस्कार सोहळा’ म्हटल्यास वावगं ठरू नये. यातून मराठी सिनेमा आणि रंगभूमीची इथल्या लोकांना ओळखच नाही तर त्यातील कलाकारांना प्रत्यक्षात भेटताही येणार आहे. आणि त्यांना जवळून जाणूनही घेता येणार आहे.
‘मिफ्ता’ सोहळ्याच्या बाबतीत अभिजीत पाटील यांची सर्वात आवडलेली गोष्ट सांगतांना ते म्हणतात की, " या सोहळ्याच्या माध्यमातून अभिजीत जे मराठी अॅखक्टीव्हीटी मार्केट डेव्हलप करतोय ती खूप चांगली गोष्ट आहे. या माध्यमातून परदेश आणि महाराष्ट्राच्या संस्कृतींची देवाण घेवाण होणार असून याचा फायदा दोनही देशांना होईल. त्याच्या व्यवसायाबाबत मला काही माहिती नाही पण जे काही तो करतोय. त्यातून मराठी कला, साहित्य आणि संगीताचा लाभ आणि विकास नक्कीच होईल एवढंच मी सांगतो.
तुम्ही ‘मिफ्ता’ला भविष्यात कुठं बघता? असं विचारता ते म्हणाले की, " दोन गोष्टी कुणाच्याही जीवनात महत्वाच्या असतात. कला आणि साहीत्य ह्या दोन गोष्टी कुणाचंही आयुष्य समॄद्ध करून टाकतात. अशाप्रकारचे प्रयोग केल्याने मराठी माणसाला नक्कीच आनंद मिळेल. मला वाटतं भारताबाहेरील जन्मलेल्या जास्तीत जास्त तरुणांना याकडे आकर्षीत करायला हवं. म्हणेज मराठी कला, मराठी संस्कृती आणखी वाढेल...
एकंदर काय तर एवढ्या मोठ मोठ्या प्रतिभावंत व्यक्तीमत्वांना घेऊन हा सोहळा केला जातोय. त्याचं स्वरूपही भव्य आहे. त्यामुळे श्री.नेने यांनी म्हटल्याप्रमाणे ‘मिफ्ता पुरस्कार सोहळ्याला’ मराठीतील ‘ऑस्कर’ म्हटल्यास खरंच वावगं ठरू नये....असंच वाटतं.