
आपल्याला माहितच असॆल की, सध्या बहुतांश निर्मातॆ आणि डिस्ट्रिब्युटर संपावर आहॆत. नुकतीच युनायटॆड प्रॊड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स फॊरमची प्रॆस कॉन्फरन्स झाली. इथॆ हजॆरी लावली हिंदी चित्रपटातील निर्मिती, दिग्दर्शन आणि डिस्ट्रिब्युटिंग क्षॆत्रातल्या बड्या बड्या हस्तींनी. यात मोठ्या उमेदीने हजर होते. मुकेश भट्ट, आशुतोष गोवारीकर, कुणाल कोहली, यश चोप्रा, रमेश सिप्पी, रोनी स्क्रीनवाला, ज्योती देशपांडे, शाहरुख खान आणि आमीर खान. या कॉन्फरन्सचे सुत्रसंचालन केलं करण जोहर यांनी.
आमीरने आपल्या भाषणात या फ़ॉरमचा (संपाचा) मुद्दा लोकांसमोर ठेवला. आमीरच्या मते, त्यासाठी हा एक दुख:द दिवस आहे. परंपरागत येणा-या नफ्याची विभागणी ८०% निर्मात्याला आणि २०% प्रस्तुतकर्त्याला अशी केली जात असे. पण आता प्रस्तुती
व्यवसायात ब-याच कॉरपोरेट्स आणि मल्टीप्लेक्स वाल्यांची मक्तेदारी सुरु झाली आहे. परीणामी, तिकीट दर इतका अफाट आकारला जातो की, जनसामान्याला तो परवडणं अशक्य आहे. म्हणुन लोक चित्रपट बघायला येत नाहीत. आणि नफाही होत नाही. म्हणुन या फोरमचं असं म्हणणं आहे की, याची व्यवस्थित चर्चा व्हावी आणि एक सुत्रबध्द मार्ग निघावा. सर्वाना नफा अर्धा - अर्धा मिळावा. शाहरुखही भाषणात या मुद्याला दूजोरा देत आम्ही गैरसमजात नाही आहोत असं म्हणाला. या बैठकीत शाहरुख आणि आमीरच्या नवीनच झालेल्या दोस्तीचे कांही सुखद क्षणही बघायला मिळाले.