zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra कशासाठी पैशासाठी

भारतीय राजकारणाचा एन्टरटेनमेंट शो सुरु व्हायच्या आधी IPL हा एक वर्षापूर्वी जन्मलेला शो सुरु झाला. मोबाईल फोनच्या क्षेत्रामध्ये ज्या वेगाने भारताने क्रांति केली आहे त्या पेक्षा जास्त क्रांति कमी वेळात या IPL ने केली आहे. आज काल आपले विचार एवढे संकुचित झाले आहेत की पैसा मिळवणं याला आपण क्रांति म्हणुन बसलो आहोत.

IPL चा झटका एवढा जबरदस्त आहे की आपल्या राजकारण्यांनी सुध्दा त्याचा धसका घेतला व त्याला देशाबाहेरचा रस्ता दाखविला. IPL साठी जाहिरातदार पैशाच्या थैल्या या मंदीच्या काळातही रीकाम्या करायला तयार असल्याने सर्वांनी आपला देशाभिमान बाजुला ठेऊन या स्पर्धा की ज्याच्या नावामध्येच INDIA आहे, त्या स्पर्धा सरळ परदेशात सुरु केल्या. आधी तरी क्रिकेट हा गेम फार इन्टरेस्टिंग वाटत होता पण आता जसं म्हटलं जातं की, "खड्ड्यामधुन रस्ता" त्या प्रमाणे बाकी सर्व गोष्टी झाल्यावर मग उरलं तर क्रिकेट. या प्रमाणे हा खेळ सुरु आहे. खेळामध्येच फ़ॅशन सुरु आहे. खेळ व खेळाडू स्वत:ला इतक्या ब्रॅडसाठी उपलब्ध करुन देतात कि, आता त्यांनी त्यांचा चेहरा व हातपाय यानांच स्टिकर लावायचे बाकी ठेवले आहे. कदाचित भविष्यात तो प्रकार पहायला मिळेल हे आपले दुर्दव असेल. मनोरंजनासाठी खेळ हा प्रकार बाजुला राहुन आता पैशासाठी खेळ हा प्रकार सुरु आहे. म्हणुनच म्हणतात ना " बाप बडा न भैया, सबसे बडा रुपय्या"

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions