zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra पुरूदादांचा लवकरच सर्वत्र 'आनंदी आनंद'

’आनंदी आनंद’ मराठी चित्रपट कथासूत्र

एकेकाळचे, म्हणजे ’प्रभात’ काळापासून, राजा परांजपे यांच्या काळापर्यंत गाजलेले संगीतकार श्री. सदाशिव उर्फ नाना जोगळेकर यांची नात... नाना आणि त्यांची पत्‍नी नानी यांच्या सोबत कोकणात रहाणारी... नाना मुंबईतील चित्रपटसृष्टी सोडून कोकणात आपल्या पत्‍नी बरोबर समृद्ध असे निवृत्‍त जीवन जगत आहेत. ’आनंदी’ ही त्यांची ’नात’... म्हणजे त्यांच्या मुलीची मुलगी... त्यांची मुलगी ’जान्हवी’ आपल्या पतिबरोबर अमेरिकेत असते. त्यांनी अनेक वेळा आपल्या मुलीला, ’आनंदी’ ला आपल्याबरोबर अमेरिकेला नेण्याच प्रयत्‍न केलेला असतो. परंतू प्रत्येक वेळी ’आनंदी’ नकार देते... तिला तिचे ’नाना नानी’ आणि कोकणातल्या निसर्गातले आपल्या सवंगडयाबरोबरचे जीवन संपवायचे नसत.

आपल्या छोटया मित्रांबरोबर रानावनात ’आनंदी’ स्वच्छंदपणे भटकत असते... आणि नाना नानींच्या काळजीचे हेच कारण असते... आपली ’नात’ वयात आली आहे. परंतु तीला त्याची जाणीव नाही. कस होणार हया पोरीचं? हया काळजीन ते त्रस्त असतात. तिच्या लग्नासाठी ते अनेक प्रयत्‍न करतात. परंतु ’आनंदी’ आपल्या मित्रांच्या मदतीने प्रत्येक वेळेला लग्नाचा बेत उधळून लावते. अखेर नानांच्या मुंबईव्या मित्राचा मुलगा ’आनंद’ हयाच्या बरोबर तिचे लग्न होते.. हे ही लग्न ’आनंदी’ उधळून लावण्याचा प्रयत्‍न करते... मात्र ’आनंद’ इतरांसारखा नसतो. लग्न करून ’आनंदी’ मुंबईला येते... आणि इथेच तिच्या आयुष्याला वेगळे वळण लागते. कोकणातल्या निसर्गरम्य जंगलातून ’आनंदी’ कॉक्रीटच्या जंगलात येते आणि मानसिक संतुलन गमावून बसते... तिची अवस्था ’पाण्याविना मासोळी’ अशी होते. आनंद जो अमेरिकेतून ’साउंड ऍन्ड म्युझिक’ चा उच्च अभ्यासक्रम करून आलेला आहे. त्याच्या करिअरचा प्रश्न निर्माण होतो... नाना नानी, नातीच्या काळजीने अस्वस्थ होतात... आनंदचे ’जोशी’ कुटुंब सुनेच्या हया अवस्थेतुन बेचैन होते. मानसरोग तज्ञांच्या मते ’आनंदी’ Dissosative Affonia ची शिकार होउन जाते... ’आनंद’ तिला हया संकटातून बाहेर काढण्याचे... ’शिवधनुष्य’ उचलतो... अतिशय तरल आणि काव्यमय असा प्रवास असलेली ही कथा आनंदी आणि आनंद ह्यांच्या आयुष्यात संगीताच्या माध्यमातून एक ’दुवा’ बनते. कोकणातल्या निसर्ग सौंदर्यात फुलणारी ही कथा मुंबईच्या कॉंक्रीट जंगलात हरवलेल्या...
’आनंदी’ ला ’आनंद’ च्या मदतीने पुन्हा माणसात आणतो कां ?
स्वत:च्या भावविश्वातून ’आनंदी’ बाहेर येते कां ?
’आनंदी आनंद’ हा चित्रपट हया सर्व प्रश्नांचा उलगडा करतो... ?

कथा, पटकथा व दिग्दर्शन - पुरुषोत्‍तम बेर्डे
निर्माता - एन. के. सिंग
संगीत - डॉ. सलील कुलकर्णी
गीतकार - संदिप खरे
संवाद - अरविंद औंधे
संकलन - राजेश राव
छायाचित्रण - समिर आठल्ये

कलाकार - विक्रम गोखले, सुहास जोशी, मोहन जोशी, वंदना गुप्‍ते, मंगेश देसाई, पॅडी कांबळे, अक्षया भिंगार्डे, राजन ताम्हाणे, लतिका गोरे आणि प्रथम पदार्पण आनंदराज व प्रिया बापट

पाहुणे कलाकार - दिपक शिर्के, राजन भिसे, संजय क्षेमकल्याणी, राहूल मेहेंदळे

बाल कलाकार - चिन्मय कोल्हटकर, सुमित पवार, स्वामिनी वाडकर, आर्या जोगळेकर

सहाय्यक कलाकार - श्रीकांत पोतदार, सिद्धार्थ मोते, अमित कदम, श्रुतिका, अश्विनी केशवन, राजश्री जोगळेकर, विवेक मिस्त्री, राजेंद्र झोडगे, कुणाल शेरनवरे, विजय पाठक, राजन दिघे, संजय दिघे, संजिव साळवी, नेने आजी आणि मावळंगे गावातील ग्रामस्थ.

चित्रपटातील इतर सहभागी व्यक्‍ती

Click on Image for big view

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions