  मराठी मुलगी ’सोनाली कुलकर्णी’. मराठी ह्यासाठी कारण, ही बॉलीवूड मध्ये सुद्धा मराठी मध्ये बोलते. सोनालीने कैरी, दोघी, देवराई, मुक्ता इत्यादी मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच डरना जरूरी है, टॅक्सी नं ९२११, दिल चाहता है, मिशन कश्मीर यांसारख्या हिट हिन्दी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. सोनाली कुलकर्णी सध्या ४-५ हि मराठी मुलगीन्दी चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्यामधील एक आहे सनी देओल बरोबर ’द मॅन’, हा चित्रपट स्वत: सनी देओलने निरज पाठक बरोबर दिग्दर्शित केला आहे. ’रॉकशॉक’ मध्ये तिने लकी अली बरोबर काम केले आहे.

’कॅम्प’ ह्या सिनेमामध्ये तिने २४-२५ मुला-मुलीं बरोबर काम केले आहे आणि ज्यामध्ये ती आयटम सॉन्ग करणार आहे त्या सिनेमाचे नाव आहे ’शॅडो’. अजुन ती दोन मराठी सिनेमा मध्ये काम करीत आहे. सोनालीने ब-याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण त्यामधील बरेच कमी चित्रपट प्रदर्क्षित झाले. तिने गेली तीन वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही. पण जून मध्ये ती सनी देओल बरोबर करत असलेल्या ’द मॅन’ च्या शुटिंगसाठी लंडनला जाणार आहे आणि त्यानंतर तिथेच सुट्टी घालवण्याचा तिचा बेत आहे.
’शॅडो’ मध्ये ती एका पोलिसाची भुमिका करत आहे. त्यामध्ये तिचे नाव आहे संजना राजपुत. तिला पोलिसाची भुमिका पहिल्यापासुन करावीसी वाटत होती आणि ती इच्छा आता पुर्ण होत आहे. तिचे पोलिसाखात्यातील आदर्श आहेत किरण बेदी व मिरा बोरवणकर. ’शॅडो’ ह्या चित्रपटातील भुमिकेबद्दल बोलता तिने सांगितले की, ती ह्या चित्रपटातील भुमिकेबाबत खुप उत्सुक आहे. या आयटम गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे गणेश आचार्य यांनी. गीतकार आहेत आनंद राज आनंद आणि गायिले आहे सुनिधि चौहान यांनी. View Online Video |