zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra सुटलो बुवा एकदाचे

जास्त खाल्यावर जसे अजीर्ण होते व पोट बिघडते तशी काही अवस्था गरीब बिच्या-या मायबाप प्रेक्षकांची १-२ महिन्यापासुन झाली आहे. मराठी चित्रपटांचा ओव्हर डोसच आपल्याला या काळात अनुभवायला मिळाला आहे. कारण काय तर हिन्दी चित्रपट निर्माते व मल्टीप्लेक्सवाल्यांचा संप. संपाच कारण काय असणार ते आपल्या सर्वांना आता पर्यंत माहित झाले असेलच, काय तर पैशाची वाटणी. ज्यावेळेला हा संप झाला, त्यावेळी एक तर IPL मॅचेस सुरु झाल्या होत्या, शाळा कॉलेजच्या परिक्षा काही प्रमाणात चालु होत्या, लोकसभा इलेक्शनचा महासंग्राम चालू होता. या सर्व काळात big budget pictures रिलीज झाले असते तर कदाचित त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असते. त्यामुळेच कदाचित हा संप सुरु झाला असावा असे म्हणतात. तर कोणी म्हणते की, बॉलिवूडमधील कोण्या दोन मोठ्या producer's चा आपपसामधील वादामुळे हा संप झाला.

हा संप कोणत्याही कारणामुळे झाला असु दे त्याचा फायदा मराठी चित्रपटांना झाला यात शंका नाही. एक प्रकारे मराठी चित्रपटांची लाटच या २-३ महिन्यात आली. काही लोकांसाठी ती मेजवानी ठरली, तर काही लोकांनी त्याविषयी नाके मुरडली. वेगवेगळे विषय असलेले मराठी चित्रपट या वेळेत मराठी लोकांनी पाहिले. ढगफुटी होऊन जसा पाऊस कोसळावा तसा मराठी चित्रपटांचा पाऊस झाला. काही चित्रपट तरले तर काही चित्रपट बुडून गेले. २-३ महिन्यात चित्रपटांचा over dose झाला. IPL संपले लोकसभेचा महासंग्राम संपला, आपापसातील वाद मिटले (खरे का खोटे देव जाणे) संप मिटला. पुन्हा हिन्दी चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये झळकु लागले.

रांगेचा फायदा सर्वांना ही वाक्य वर लिहिलेली असताना सुद्धा काही माणसे प्रत्येक ठिकाणी मध्ये-मध्ये घुसखोरी करतात, त्याप्रमाणे हिन्दी मोठया चित्रपटांच्या release च्या लाईनीत छोट्या budget च्या हिन्दी चित्रपटांची घुसखोरी चालु झाली आहे, जोडीला मराठी चित्रपट आहेतच, पण तरी सुद्धा चोखंदळ चित्रपट रसिकांना आता म्हंटल्या वाचुन रहात नाही ’सुटलो बुवा एकदाचे - संप मिटला’.

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners





Transaction Processing
Terms and Conditions