मी लगेच होकार दिला - सतीश राजवाडे
Subscribe For Newsletter   
Hello Sign In New user? Start here.
मी लगेच होकार दिला - सतीश राजवाडे
मुंबईत नुकतंच ‘बदाम राणी गुलाम चोर’ या चित्रपटाचं फर्स्ट लूक लॉन्च मनसे प्रमुख श्री.राज ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ ..

   मुंबईत नुकतंच ‘बदाम राणी गुलाम चोर’ या चित्रपटाचं फर्स्ट लूक लॉन्च मनसे प्रमुख श्री.राज ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती शेखर कुलकर्णी यांनी केली असून दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे. या चित्रपटाबाबत सतीशने काही भावना व्यक्त केल्या....

   एक प्रेक्षक म्हणून मी माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक खूप ऎन्जॉय केलं होतं. लेखक विवेक बेळे यांचा मी फॅन झालो. काही दिवसांनी ह्याच विवेक बेळेंच निर्माता शेखर कुलकर्णी ह्यांच्याकडून मला फोन आला. माकडाच्या हाती शॅम्पेन ह्या नाटकावर आधारित चित्रपट करायचा असं ठरत होत आणि त्याचे दिग्दर्शन मी करावे असा तो फोन होता. मी लगेच होकार दिला.

   मी आजपर्यंत जे काही काम केलं आहे त्यापैंकी ही सर्वात चॅलेंजींग फिल्म आहे. मुळात नाटक इतकं यशस्वी म्हणून जबाबदारी दुप्पट होती. विवेक बेळे यांनी नाटकाचं रूपांतर पटकथेत अगदी उत्कृष्टरीत्या केले आहे. मला त्या पटकथेशी प्रामाणिक रहायचं होतं. अशा उत्तम स्क्रिप्ट बरोबर मला मिळाली एक ड्रीम कास्टींग उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे, विनय आपटे, दिपक करंजीकर, सुधीर गाडगीळ आणि डॉ.मोहन आगाशे.

badamranichor_launch
   निर्माता शेखर कुलकर्णी ह्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी माकडाच्या हाती शॅम्पेन ह्या विषयावर फिल्म करायची ठरवलं. अजित भुरे ह्यांचे विशेष आभार..तुमच्या मुळे आज माकडाच्या हाती शॅम्पेन ‘बदाम राणी गुलाम चोर’ ह्या नावानं चित्रपटगृहात प्रदर्शीत होतोय. बदाम राणी गुलाम चोर हा प्रवास मी खूप ऎन्जॉय केलाय...माझी खात्री आहे प्रेक्षक सुद्धा ऎन्जॉय करतील.

   माझी टीम ज्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं.गुंड्या, प्रथमेश, नरेश, रोहन, सुमुख...माझं काम सोपं केल्याबद्दल थॅंक्स....

   यश अपयश हे या व्यवसायाचे रूप आहे. ‘बदाम राणी गुलाम चोर’ नी मला काय दिलं तर एक अप्रतिम माणूस, एक मस्त मित्र विवेक बेळे. बेळ्या तू या सिनेमाचा खरा हीरो आहेस.

चित्रपट बातम्या

 

Add comment