Huppa Huyya Marathi movie video
Huppa Huyya Marathi movie video
  मराठी चित्रपटसृष्टी अलिकडे प्रयोगशील होऊन उत्साहाने सळसळू लागली आहे. जेवढी विविधता चित्रपटांच्या विषयात दिसते, तेवढीच त्यांच्या शिर्षकांतून सुद्धा प्रकट होते. अक्षर फिल्मचा आगामी चित्रपट "हुप्पा हुय्या" हा याच पठडीत मोडतो.

  समीर कक्कड आणि ड्रीम व्हू प्रॉडक्शन्सची निर्मीती असलेल्या ह्या चित्रपटाच चित्रीकरण नुकतच सातारा-वाई परिसरात पार पडल. अनिल सुर्वे दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना समर्थ रामदासस्वामिंनी स्थापन केलेल्या ११ मारुतीच्या देवस्थानांची सफर घडवतो.

  गावच्या सरपंचाचा टवाळखोर मुलगा, सिद्धार्थ जाधव हा मारुतीचा भक्त असतो आणि टवाळक्या करता करता त्याच्या हातून कशी समाजसेवा घडते ही धमाल गोष्ट हुप्पा हुय्या मध्ये दाखवली आहेत.

  खूप काळाने सिद्धार्थ नायकाच्या भूमिकेतून चमकला आहे. त्याला साथ आहे मोहन जोशी, गिरीजा ओक, मंगेश देसाई, वैभव मांगळे यांची. ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी असलेली ही कथा हेमंत एदलाबादकरांची आहे व कथानकाला साजेस अस मस्त संगीत दिल आहे अजित परब यांनी. स्वप्नील बांदोडकर व डॉ. नेहा राजपाल यांनी हुप्पा हुय्या साठी पार्श्वगायन केल आहे.

  आगळ्या वेगळ्या कथेवर बेतलेल्या या धमाल चित्रपटाची मराठी प्रेक्षक अगदी आतुरतेन वाट पहात आहेत.
Loading...