zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra ’अंकगणित आनंदाचं’ चित्रीकरण सुरु
E-mail

आपल्याकडे आईविषयी प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्‍त करण्याची परंपरा आहे. तशी वडिलांबद्दलच्या भावना व्यक्‍त करण्याची परंपरा मात्र रुजलेली नाही. वडिलांनीही मुलीबद्दल वा मुलाबद्दल फार हळव्या भावनांचं प्रदर्शन करायचं नाही, असा जणू संकेतच काल-परवापर्यंत तरी रुढ होता. पण हे संकेत आता वदलायला लागले आहेत.
’अंकगणित आनंदाचं’ या आगामी कौटुंबिक मराठी चित्रपटात वडिल-मुलाच्या नात्यातील भावनिक कंगोरे रेखाटण्याचा प्रयत्‍न करण्यात आला आहे. अर्पण गुजर आणि निलेश जोशी यांच्या ’नाइट ऍन्ड सुलतान’ बॅनरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश जोशी करीत आहेत.
’अंकगणित आनंदाचं’ या चित्रपटाची कथा छोटया गावातल्या संवेदनशील मनाच्या आनंद नावाच्या तरुणाची आहे. शहरात लग्न करुन चांगल्या नोकरीत स्थिरावलेला आनंद केवळ वडिलांच्या इच्छेखातर गावी परतण्याचा निर्णय घेतो. त्याच्या या निर्णयाला कंटाळून त्याची पत्‍नी त्याला सोडून जाते, त्याचवेळी गावी वडिलाचं अकस्मात निधन होतं. गणितात तरबेज असलेला आनंद स्वत:च्या जीवनातल्या आनंदाच्या अंकगणितात मात्र अपयशी ठरतो. आयुष्यात कमालीची अस्थिरता आलेली असतानाच आनंद आयुष्यात नव्याने चालून आलेली संधी मोठया जिद्दीने स्विकारतो आणि आपल्या लहान मुलाच्या सोबत असलेलं नातं अधिकाधिक घट्‍ट करीत जिद्दीने या प्रतिकुल परिस्थितीवर मात करतो. आयुष्यातील आनंदाचे अनमोल क्षण टिपणारा वडिल-मुलाच्या नात्यावर बेतलेला चित्रपट म्हणजे... ’अंकगणित आनंदाचं’.
संदिप कुलकर्णी, ऎश्वर्या नारकर, सुलभा देशपांडे, मास्टर राहुल फाळके, स्मिता ओक, गणेश रेवडेकर, गिरीश जोशी या कलाकारांच्या महत्‍त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. ’अंकगणित आनंदाचं’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मनिषा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. कौटुंबिक कथानकाच्या या चित्रपटाचे छायचित्रण संजय खानझोडे करीत असून कला दिग्दर्शन गिरीश कोळपकर यांचे आहे. चित्रपटाला ध्वनी संयोजन अप्पा तारकर देत असून कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी प्रमोद मोहिते सांभाळीत आहेत.
’अंकगणित आनंदाचं’ चित्रपटाच्या चित्रीकरणास नुकतीच सुरुवात झाली आहे.

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions