Neha Hinge
Neha Hinge
Untitled Document

Neha Hinge.

बॉलीवूडपेक्षा नेहाला भावतेय राजकारण !

नेहा हिंगे. नाव चिमुकलं. कर्तृत्व मोठ्ठं. तिच्या सणसणीत पाच फूट दहा इंच उंचीएवढं. फेमिना स्पर्धेतल्या झगमगीत यशानं तेवीस वर्षीय नेहाचं नाव 'लाईम-लाईट'मध्ये आलं. आता ती 'मिस इंटरनॅशनल' स्पर्धेत भारतीय सौंदर्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. भारताला पाच दशके हुलकावणी देत असलेला हा किताब जिंकू, असा आत्मविश्वास तिला आहे. त्याला कारणही स्वाभाविक आहे. सौंदर्य स्पर्धांमधल्या 'ब्युटी विथ् ब्रेन'चं ती एक दुर्मिळ उदाहरण आहे !

सर्वसाधारणपणे 'मिस इंडिया'तील सहभागी आणि विजेत्यांचा रस्ता जातो तो बॉलीवूडकडे. एेश्वर्या रॉय, सुश्मिता सेन लारा दत्ता, प्रियांका चोप्रा, दिया मिर्जा, युक्ता मुखी अशी लांबलचक यादी सांगता येईल. अर्थातच, ही गोष्ट सहज आणि अपेक्षित. कारण, सौंदर्य स्पर्धा आणि बॉलीवूड ही दोन्ही क्षेत्रं ग्लॅमरची.

नेहा ही वाट मोडायचा विचार करतेय. यावर्षीची फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल ठरलेली नेहा बॉलीवूडपेक्षाही राजकारणाचा विचार करतेय, हे जरा धक्कादायक वाटतं. Brain & Beauty चे मस्त कॉन्बिनेशन तिच्यात आहे. टेलिकॉम इंजिनिअर असलेली नेहा. 'देशाला चांगला, व्हिजन असलेला तरूण नेता हवाय,' असं ठासून सांगते. केवळ त्यासाठीच म्हणून तिला राजकारणात जायचंय. शिक्षण क्षेत्रात तिला काम करायचं. त्यासाठी पुरेसा वेळ देण्याची आणि अभ्यास करण्याचीही तिची तयारी आहे.

नेहा हिंगे पुण्याची. मुळची पुण्याची आणि सध्याही पुण्यात. मुळ गाव पुण्याजवळचे अवसारी. गेल्या पाच पिढ्या मध्य प्रदेशात. ब्युटी क्विन झाली, तरी नेहा साधीच राहते. स्वतःच्या टुव्हिलरवरून जॉबला जाते. डान्सिंग, पेंन्टिंगची आवड राखते. छान सॉफ्टबॉलही खेळते. अगदी, नॅशनल गोल्ड मेडल मिळविण्याएवढं ! पायलट होण्याचं ध्येय असलेली नेहा चार वर्षांपूर्वी पुण्यात शिफ्ट झाली. सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करता करता सहज म्हणून 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत उतरली आणि आणि चक्क मिस इंटरनॅशनलसाठी क्वालिफाय झाली...!

नेहा social sense जागा ठेवते. समाजासाठी काही तरी करायची तिची तळमळ आहे. अगदी शाळेत असतानाही उपकार ग्रुपसारख्या सामाजिक कार्यक्रमांत ती सहभागी व्हायची. अलिकडंच, पुण्यात निवारा नसलेल्या लोकांना तिनं पावसाळ्यासाठी म्हणून छत्र्यांचं वाटप केलं. गोष्टी छोट्या असतात. पण, त्यातून स्वभाव दाखवतात. नेहाचा स्वभाव हा असा आहे. फारसा गाजावाजा न करता काम करत राहण्याचा.

नेहाला बॉलीवूडचीही ऑफर आहे. पण, तिला मात्र सध्या 'मिस इंटरनॅशनल'वर लक्ष द्यायचंय. गेल्या पन्नास वर्षांत भारताच्या मुलींनी 'मिस युनिव्हर्स' आणि 'मिस वर्ल्ड' हे दोन किताब आणले. राहिलाय, तो 'मिस इंटरनॅशनल'. हा किताब तिला भारतात आणायचाय. त्यासाठी ती मेहनत घेतेय. ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी ती तयारी करतेय. त्यासाठी Zagmag टीमतर्फे तिला शुभेच्छा...!!!

Related Articles.....
 

Add comment