इंद्रियजय हे सर्व
शास्त्रांचे सार
इंद्रियजय हेच सर्व विद्यांचे ध्येय
आहे असे सांगतांना कौटिल्य
म्हणतो
म्हणतोतद्वि
रुद्धरृत्तिरवश्यें द्रियश्चातु
रन्तो।़पि राजा सद्यो विनश्यति (या
विरुद्ध वागमारा म्हणजे इंद्रिये
आपल्या ताब्यात न ठेवणारा राजा
चारही दिशांचा स्वामी असला तरी
नाश पावतो.) आपले पावित्र्य न
दवडता आपल्या इच्छा त्याने पूर्ण
करून घ्याव्यात या त्याच्या
आदेशात दोन गोष्टींचे संकेत
सापडतात. एक म्हणजे लोभ
आणि मोर यापासून राजा अथवा
नेता आथवा उद्योगप्रमुखाधिकारी
(सी.ई.ओ.) यांनी
दूर राहवे आमि दुसरे म्हणजे जे
साधायचे त्याचे योग्य नियोजन
असावे. आता प्लानिंग म्हटले
म्हणजे पैशाचा प्रश्न उभा राहतोच.
काळ, काम, वेग याचे देखील
नियोजन कार्य सिद्धीसाठी तेवढेच
महत्त्वाचे आहे. अनेकदा
नियोजनासाठी पैसा आवश्यक
असतो याचा dनुभव पदरी
असल्याने आर्य चाणक्य यांनी
म्हटले आहे `अर्थ एव प्रधान' पण
तो मिळवितांना राजाने (अथवा
प्रमुखाने) केव्हाही मर्यादांचे
उल्लंघन करू नये म्हणून
अमात्याने (सल्लागार किंवा
हिशेबतपासणीस) त्याला
वेळोवेळी सावध करावे असा
चाणक्याचा सल्ला आहे. पैशाची
हाव माणसाला नेहमीच
विनाशाचा मार्ग दाखवित असते
म्हणूनच अभिलाषेवर अंकुश
असारा लागतो. तो नसेल तर
मम्न्मत हत्तीप्रमाणे माणूस उन्मत
बनतो आमि विनाशाच्या गर्तेत
कोसळतो.
राज्यशकट हाकतांना राजाने
विनाशाच्या चिखलात रुतू नये
यासाठी त्याला योग्य अमात्याची
जोड असावयास हवी. म्हणून
त्याची निवड करण्याचे जे
मार्गदर्शन कौटिल्य करतो ते
`कार्यसामर्थ्यद्धी पुरुषसामर्थ्य
कल्प्यते'. या सल्ल्यात माणसाची
योग्यता ठरविण्याचा निकष तो
त्याने केलेले काम असे जेव्हा जो
सांगतो त्यात आधुनिक
व्यवस्थापनाचे रिझल्ट
ओरिएंटेशन आढळते. पण
त्याचबरोबर त्याने कोणत्यावेळी
काय काम करावे याचे
वेळापत्रक आयोजकाने ठरवून
द्यावे म्हणून `योजकस्तत्र दुर्लभ।'
अशाच अवस्थेचा तो निर्देश
करतो आणि मग मंत्री आणि
पुरोहित यांच्या संयोजनाकडे
वळतो.
परंतु आपल्या पुरोहितांची
परीक्षा करण्यासंधीची जी पद्धत
आर्यचाणक्य सांतो ती वरवर
पाहाता प्रथम दर्शनी विक्षिप्त
किंवा विचित्र वाटली तरी नीट
विचाराअंती त्यातील तथ्यांश
ध्यानी येतो. परीक्षेचा हा मार्ग दुर्बो
वाटला तरी त्याती रिझल्ट
ओEिरएन्टेशन निखालस प्रभावी
वाटते.
आर्य चाणक्याच्या उमेदीचा
काळ लक्षात घेता त्या काळात
जी समाज परिस्थिती होती
त्यातच त्याला वावरावे लागत
होते. किंबहुना सामाजप्रिय
असणाऱया माणसाला त्याच्या
समकालीन परिस्थितीच चौकट
मोडता येत नाही. म्हणूनच
त्याचौकटीत काही दुरुस्ती करू
पाण्याच्या वैचारिकतेचा पुरस्कार
करणाऱयाला `सुधारक'
नामाळिधाने संबोधले जाते. ते
बंड नसते तर शांततामय
सुधारणेचे तंत्र dसते. तत्कालीन
समाजव्यवस्थेत पुरोहित हे
राजप्रासादतील बडे प्रस्थ असे.
पण आतल्या गोटातल्या सगळ्या
बातम्या त्याला माहित असत.
पण आपले अमात्य आणिमंत्री
किती निष्ठावान आहे याची
परीक्षा घेण्याची कौटिल्याने एक
अजब क्लुप्ती सांगितली
आहे.तत्कालीन समाजाची
चौकट चातुवर्ण्याची होती आणि
कर्मठ हिंदू धर्माप्रमाणे शुद्रांना
वेदोक्त ज्ञान देणे निषिद्ध मानले
जाई. पण आपला पुरोहित हा
शुद्रांना वेद शिकवितो असा खोटा
आरोप करून त्याला काधून
टाकण्याचे नाटक रचावे, मग
अशा पुरोहिताने अमात्य व
मंत्र्याकडे जाऊन त्यांच्याकडे
राजाची निंदा करावी आणि
राजकुळातील अन्य कोणा
व्यक्तीला गादीवर बसविण्याचा
इरादा त्याच्यापुढे बोलून दाखवावा
व त्यांना या कटात सामील
होण्याची विनंती करावी. जे
निष्ठावान असतील ते त्या
पुरोहिताची निर्भत्सना करतील. जे
फितुरी करणारे असतील ते त्या
कटात सामील होण्याची तयारी
दाखवतील. ते राजनिष्ठ नाहीत
असे समजावे व जे निर्भत्सना
करणारे असतील ते राजनिष्ठ
आहेत असे समजावे. या परीक्षा
घेण्याच्या प्रकारालाचाणक्याने
आपल्या अर्थशास्त्रात `धर्मोपधा'
असे म्हटलेले आहे. याच प्रकारे
सेनापतीद्वारा सैनिकी
अधिकाऱयांची जी परीक्षा घ्यायची
तिला तौ `अर्धोपधा' म्हणत
असे. राजाच्या जनानखान्यातील
एखाद्या चांगल्या दासीकडे हे काम
सोपविले जात असे. तिने
जोगिणीचा वेष धारण करून
अमात्यादिकांकडे जाऊनत्यांना
राणीसाहेब तुमच्यावर फिदा
झाल्या आहेत, त्यांनी रंगमहालात
तुमच्या स्वागताची तयारी केली
असून प्रेमाची आठवण म्हणून त्या
तुम्हाला बरेचसे द्रव्यही देणार
आहेत असा `गुप्त' निरोप
सांगायचा. जे या भूलथापांना
भाळणार नाहीत ते चांगले अशी
परीक्षा उत्तीर्ण व्हायचे.
तिसरा परीक्षचा प्रकार
`भयोपधा:'. व्यापारी महाजात
बसून परदेशी जाण्याची मसलत
एका अमात्याने बाकीच्यांना
द्यायची आणि आपला हा कट
उघडकीला आला अशा
बहाण्याने राजांने सर्वाना कैद
करायचे आणि संबंधितांची सर्व
मालमत्ता जप्त करायची. अशा
प्रकारे विपन्नावस्थेत गेलेल्या त्या
सर्वांना एकाद्या गुप्तहेराने
राजालाच ठार मारण्याची मसलत
त्यांच्याशी करायची. जे या
मसलतीत अनुकूल होणार नाहीत
ते चांगले!
या सगळ्या उपधा म्हणजे
राजसभेतील महत्त्वाच्या व्क्तींच्या
पाठीशी लावले गेलेले शुक्लकाष्ट
असे. जे या उपाधींच्या कसाला
लागून यशस्वीपण बाहेर पडत
त्यानांच राजाने आपल्य पदरी
ठेवायचे. या सगळ्या उपधांत
राजाचा अथवा राणीचा र्पत्यक्ष
असा संबंध येऊ द्यायचा नाही हा
मात्र कटाक्ष असे.
या परीक्षेंच्या प्रयोजनाबाबत
कौटिल्य म्हणतो,
तस्मा द्वाह्यमधिष्ठानं कृत्वी र्को
चतुर्विधे (क्रमश)