कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ
केवळ काल्पनिक नाही, इतकेच नव्हे
तर, तो प्राचीन काळापासून सर्वश्रूत
असून त्याच्या कार्यासंबंधी अनेक
प्राचीन ग्रंथकारांनी उल्लेख केलेला
आहे. विष्णु पुराणाच्या चौथ्या
अंशाच्या चोविसाव्या अध्यायात
`कौटिल्य नंदकुलाचा समुच्छेद करून
मगध देशाच्या राजावर चंद्रगुप्ताची
स्थापना करील' असे भाकीत आहे.
या पुराण ग्रंथात हा उल्लेख अथवा
भविष्य कथन प्रक्षिप्त मानले तरी
असे प्रकार आपण अगदी वाल्मिकी
प्रणित रामायणापासून दुसऱया
महायुद्धाचे भाकीत वर्तविणाऱया
नॉस्ट्रेडॅमपर्यंत वेळोवेळी वाचत आलो
आहोतच. ऋषी याचा अर्थच मुळी
द्रष्टा असा आहे. `दशकुमारचरित' या
ग्रंथाच्या आठव्या उच्छवासात
`विष्णुगुप्ताने चंद्रगुप्त मौर्याला उपदेश
करण्यासाठी सहा हजार श्लोकांची
दंडनीती लिहिली' असे स्पष्टपणे
दंडीने म्हटले असून त्याच्या ग्रंथात
आणखीही कित्येक ठिकाणी या
संबंधाचे उल्लेख आलेले आहेत.
त्याने `कामंदकीय नीतिसार' नावाचा
एक राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला
आहे. या आपल्या ग्रंथाच्या प्रारंभीच
दण्डीने विष्णुगुप्ताला आदरपूर्वक नमन
करताना म्हटले आहे
नीतिशास्त्रामृ
त थीमानर्थशास्त्र
महोदधे:!
समुद्रधे नमस्तस्मै विष्णुगुप्ताय
वेधसे।
`पंचतंत्र' या ग्रंथात देखील प्रारंभी
मनू आदिकांच्या धर्मशास्त्राबरोबरच
आणि वात्सायनाच्या कामसूत्राबरोबरच
चाणक्यादिकांच्या अर्थशास्त्राचाही
नामनिर्धेश केलेला आहे. पंचतंत्रकार
विष्णु शर्म्याला चाणक्याची आणि
त्याच्या `अर्थशास्त्रा'ची चांगलीच
माहिती असावी असे दिसते.
`नंदिसूत्र' नामक जैन ग्रंथात
रामायणादिकांबरोबरच कौटिलीय
अर्थशास्त्राचा निर्देश आहे. रघुवंशाच्या
17व्या व 18व्या सर्गावर टीका
लिहिताना मल्लीनाथ सुरीने
अर्थशास्त्रविषयक शब्दांच्या
विषदीकरणार्थ कौटिलीय
अर्थशास्त्रातील काही पंक्ती उद्धृत
केल्या आहेत. ही इतकी सर्व माहिती
देण्याचे कारण हेच की, ख्रिस्ताब्दाच्या
प्रारंभापासून पंधराव्या शतकापर्यंतच्या
अभ्यासू लेखकांना कौटिल्याच्या या
ग्रंथाची आणि आdर्य चाणक्याची
चांगली माहिती असावीसे आढळते. या
माहितीचा `फॉल आऊट' पुढे
सतराव्या शतकापर्यँत कसा झाला
असावा याचा पुढे उल्लेख करावा
लागणार आहे.
नंदाच्या राजसभेत झालेल्या
अपमानाचा सूड उगविण्यासाठी
संकल्प सोडलेल्या विष्णुगुप्ताच्या तो
अपमान किती जिव्हारी लागला होता
याची जशी कल्पना येते तोच एका
दासीपुत्राला हाताशी धरून
नंदासारख्या बलिष्ठ राजाचा
वंशविच्छेदन करून त्या दासीपुत्राला
सम्राट बनविणे या चमत्काराचा ठसाही
आर्य चाणक्याने मानवजातीच्या
इतिहासात नोदविलाच पण तो
उमटविण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाला
सार्वकालिकतेचे आयाम जोडले.
आजच्या एकविसाव्या शतकात
कौटिलीय अर्थशास्त्र कळलेच नसावे
किंवा पाश्चिमात्यांच्या ज्ञानविस्ताराची
झापडे त्यांनी आपल्या डोळ्यावर
बांधून मानसिक गुलामीचे प्रत्यंतर
दिले आहे असेच म्हणावे लागेल.
2.
ऐतिहासिक पार्श्वभूमीचे संदर्भ
प्राचीन काळी एखाद्या विषयावर
अथवा त्या विषयाचे विवेचन करणाऱया
ग्रंथावर अधिक माहिती घुसडण्याचे
प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असावेत
असे अनेक प्राचीन ग्रंथांच्या बाबतीत
आढळते. मात्र ही अशी प्रक्षिप्त अथवा
विपर्यस्त माहिती स्वत ग्रंथरूपाने
लिहिण्यापेक्षा एकाद्या ख्यातकीर्त ग्रंथात
ती लिहिण्याचा हा प्रकार असे. याचे
एक सुंदर उदाहरण- तेराव्या
शतकातील-म्हणजे ज्ञानेश्वरीचे.
ज्ञानेश्वरांच्या पश्चात अशी प्रक्षिप्त
माहिती त्या ग्रंथात घुसडली गेली होती.
ही प्रक्षिप्त माहिती अत्यंत
परिश्रमपूर्वकतेने काढून ज्ञानेश्वरी मूळ
स्वरूपात शुद्ध करण्याचे काम संत
एकनाथांनी केले आणि त्या शुद्ध
प्रतीच्या शेवटी लिहिले
जो
ज्ञानेश्वरीपाठी।ओवी करेल
मराठी।
त्याने सोनियाच्या ताटीं।जाण
नरोटी ठेविली।।
अनेक वाचकांना हा किस्सा ठाऊक
असावा. पण असे प्रकार अतिप्राचीन
काळात घडत असत असे आधळते.
या प्रकाराचा उद्गम गुरू-शिष्य
संबंधातून झालेला असावा असे
वाल्मिकी `रामायणा'बाबतीतही दिसून
येते. कारण मूळचे रामायण हे
`पौलस्त्यवध' या नावाने वाल्मिकी
ऋषीनी लिहिले होते असा एक
पुरावादर्शक पुरावा आहे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथाची
एकंदर रचना आणि धाटणी बौद्धायन
वगैरे ग्रंथांच्या शेवटी कौटिल्य म्हणतो-
दृष्टवा विप्रतिप्रति बहुधा शास्त्रेषु
भाष्यकाराणाम।
विष्णुगुप्तश्चकार सूत्रंच
भाष्यचं।।
`पुष्कळ भाष्यकारांनी सूत्रांचे अर्थ
विपर्यस्त केल्याने मा आपल्या सूत्ररूप
ग्रंथावर स्वतच भाष्य लिहिले' असे
तोच वरील श्लोकात म्हणतो. असो.
(क्रमश)