बदलती मराठी नाईका
मराठी चित्रपटाचा आजवरचा प्रवास पाहणं आणि
अनुभवणं खरोखराच रोमांचकारी आहे. त्यातूनही मराठी
चित्रपटातील नायिका हळूहळू कशी बदलत गेली, स्री
कितीतरी विविधांगी रूपं मराठी चित्रपटांतून पाहायला
मिळाली. असं जरी असलं तरी आपल्या प्रेक्षकांना स्री
भोळं, भाबडं, कष्टकारी, त्यागमूर्ती, सोशिक असंच रूप
प्रेक्षकांनी जास्त उचलून धरलं!
नायिकाप्रधान चित्रपट आपल्याकडे फारच थोडे आले,
नायिकाप्रधान म्हणजे स्री वेगळं, पठडीतलं रूप सोडून
वेगळी नायिका रंगवणारे. त्यातूनही नायिकेची रोमंटीक
इमेज निर्माण करणारे चित्रपट तर फारच कमी. यालाही
कारण आहे आपली संस्कृती, भोगापेक्षा त्यागाला अधिक
मानणारी आणि कर्तव्याला पहिलं प्राधान्य देणारी आहे.
मराठी चित्रपटांत प्रेमगीत, नायक/नायिकेचा रोमान्स
दाखवला गेला, पण हिंदी चित्रपटाप्रमाणे तो आणि तीची
प्रेमकहाणी, खानदान की इज्जत, अमिरी-गरिबी असे फॉ
र्म्युलाबाज चित्रपट फारसे आले नाहीत. मराठी चित्रपट
जेव्हा बोलू लागला तेव्हा कथाप्रधान सामाजिक आशयाचे
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व
अधोरेखित करणारे चित्रपट निर्माण झाले.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ हा
आदर्श विचारांन आणि आचारांन भारलेला काळ होता.
साहाजिकच, त्याचं प्रतिबिंब चित्रपटांत उमटलं. त्यावेळच्या
चित्रपटांकडे नजर टाकली तरी ऊन-पाऊस, प्रपंच,
मोलकरीण, जगाच्या पाठीवर, अन्नपूर्णा, एकटी, साधी
माणसं या चित्रपटांतील नायिका नेहमीच कणखर, आलेल्या
परिस्थितीशी झुंज देणारी, आपलं कुटुंब आणि आपली मुलं,
पती यांना संभाळण्यासाठी जीवाचं रान करणारी अशीच
होती. नायिकेचं रोमॅण्टिक किंवा शृंगारिक रूप मराठी
प्रेक्षकांना तेवढंसं भावत नाही.
तेव्हाही ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात बिकिनी घालून
यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या का लाजता? असं गाऊन
मीनाक्षी शिरोडकर यांनी खळबळ उडवून दिली होती.
पण हे काही अपवाद. भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट
चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सुवर्णकमळ
मिळवणारा चित्रपट ठरला तो साने गुरुजीलिखित आणि
आचार्य अत्रेदिग्दर्शित ‘श्यामची आई’ हा चित्रपट. एका
मराठी चित्रपटाने हा मान पटकावला. त्यातलं मुलावर
संस्कार करणाऱया, मुलाला माणूस
घडवू पाहणाऱया आईचं चित्रण सर्वांनाच
भावलं.
आजवरचे मराठी चित्रपट, असेच
स्री मातृत्व आणि पातिक्रत्य यांना
केंद्रस्थानी ठेवून निर्माण झाले. अर्थात,
काळाबरोबर त्यात बदलही झाले.
नायिकेची रोमॅण्टिक इमेज आणि
नायक-नायिकेच्या प्रेमकहाणीचा धमाल
चित्रपट म्हटलं की पटकन ‘मधुचंद्र’
या चित्रपटाची आठवण येते. ‘मधू इथे
अन् चंद्र तिथे’, ‘हे चिंचेचे झाड दिसे
मज चिनार वृक्षापरी’ अशी सुंदर गाणी
काशीनाथ घाणेकर आणि उमा यांचा
रोमान्स यांनी चित्रपट प्रेक्षकांना खूप
भावला. नंतर मात्र मराठी चित्रपटातलं वैविध्य हरवून
एक चित्रपट चालला म्हणून मग तशाच चित्रपटांची लाट
आली. ग्रामीण प्रेक्षकांनी उचलून धरलेल्या तमाशापटांची
लाट आली. नायकाला भुलवणारी तमासगिरीण नायिका
हिट ठरली. त्यानंतर आली ती अलका आठलेची रडुबाई
चित्रपटांची लाट. सुनेवर अन्याय, अत्याचार करणारी
सासरची माणसं आणि सोशिकपणे, निमूटपणे ते सारं सहन
करून पतीला परमेश्वर आणि सासू-सासऱयांना आईवडील
मानणारी सून या एकमेव फॉर्म्युल्यावर अनेक हिट चित्रपट
आले. थोरली जाऊ, धाकटी सून. लेक चालली सासरला,
सुपरडुपर हीट माहेरची साडी!
एका बाजूला हे चित्रपट असतानाच दुसरीकडे अशोक
सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीचे दोन नायक आणि दोन
नायिका असलेले धमाल विनोदी चित्रपट आले. अर्थात, नंतर
अती तिथे माती या म्हणीप्रमाणे विनोद जाऊन अशा चित्रपटांत
उथळपणाच राहिला.