तमाम संगीतरसिकांच्या मनावर मोहीनी घालणारा संगीतकार म्हणून ईलाय राजा रसिकांना परिचित आहेत. भारतीय संगीतसृष्टीला लाभलेला ‘अद्वितीय चमत्कार’ म्हणजे ईलाय राजा असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. सूर आणि सिंफनी यावर कमालीची हुकूमत असलेल्या या जादूई संगीतकाराने गेली कित्येक वर्षे संगीताच्या तालावर रसिकांना ताल धरायला लावला आहे. एकाच पठडीत अडकून न राहता त्यांनी वेगवेगळ्या पकारचं संगीत देत संगीतकार आणि गीतकार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपल्या असामान्य प्रतिभेने संगीतविश्वाला ‘चारचाँद’लावणारा हा संगीतकार आता लवकरच एका मराठी चित्रपटाला आपल्या संगीतने सजवणार आहे. तृप्ती भोईर निर्मित आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘हॅलो जयहिंद’ या मराठी चित्रपटाला संगीतबद्ध करणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसासाठी ही बाब अभिमानास्पद ठरणार आहे.
अतिशय खडतर परिस्थितीतून सुरु झालेला त्यांचा पवास अनेक वळणं घेत आज अलौकिक आणि अद्भूततेच्या पातळीवर जाऊन पोहचला आहे. तामिळनाडूच्या थेनी येथील पन्नाईपुरम या खेड्यात 1943 ला या संगीतरत्नाचा जन्म झाला. संगीत हेच जीवन मानून वयाच्या 14 व्या वर्षापासून आपल्dया भावासोबत गावोगाव हिंडून गाण्यांचा कार्यकम ते करत असत. त्यांचा त्यावेळी सुरु झालेला पवास आज तितकाच उमेदीने सुरु आहे. संगीतक्षेत्रासाठी काहीतरी करण्याची तळमळ मनाशी बाळगूनच त्यांनी ‘अन्नाकिली’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पर्दापण केलं. तीस वर्षांच्या या संगीतमय पवासात त्यांनी आजवर विविध भाषेतील 950 हून अधिक चित्रपटांना संगीत दिलंय. बॉलिवूड रसिकांना ‘सदमा’, ‘अप्पूराजा’,‘हे राम’,‘शिवा’,‘पा’ या चित्रपटांतील त्यांचं संगीत खूपच भावलं. ‘अंजली’या चित्रपटातील त्यांनी दिलेल्या पार्श्वसंगीताला पेक्षकांनी चांगलीच दाद दिली.

भारतीय संगीताला पाश्चिमात्य देशात महत्त्व मिळवून देणा-या संगीतकारांमध्ये ईलाय यांचं नाव पामुख्याने घेतलं जातं. भारतीय संगीतात पाश्चिमात्य वाद्य वापरण्याचा ट्रेंड त्यांनी रुजू केला. तेलगू, कन्नड, मल्dयाळम यांसारख्या दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांना सुमधूर संगीत देऊन ईलाय राजा त्यांच्या नावापमाणेच ‘दाक्षिणात्य
संगीताचा राजा’ झाला. चित्रपटसृष्टीत नव्याने येणाऱया संगीतकारांसाठी ईलाय राजा मार्गदर्शकच ठरत आहेत.लंडनमधील ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक या जगद्विख्यात संगीत महाविद्यालयाने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविलं आहे. संगीताला सर्वस्व मानणाऱया ईलाय यांनी संगीताचा झेंडा भारतातच नव्हे तर जगभर फडकवला. त्यांच्या गाण्यांना भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. ईलाय राजा यांच्या पतिभेला पोचपावती म्हणून भारत सरकारकडून त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तर चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आज संगीतक्षेत्रात ईलाय राजा यांचा उल्लेख सैगनानी (संगीतातील ज्ञानी) असा केला जातो.
Comments