'मंगळसूत्रा' साठी अलका कुबलची सत्वपरीक्षा

   या कथेत आजवर आपण पाहिलं की वसूधावर एका मागोमाग संकट येतच आहेत. तरी वसूधा धीराने सगळ्याचा सामना करते आहे. लढते आहे. आता तर तिच्या मुलांकडूनही तिच्या वाट्याला फक्त मन:स्ताप आणि दु:खच येतं आहे. वसूधा या सगळ्याला कंटाळून आपल्या आईच्या,जगदंवेचा देवळाच्या बांधकामाकरता गावी जायचं ठरवते.तिच्या निर्णयाने सगळेच आश्चर्यचकित होतात. पण वसूधा आपल्या निर्णयावर ठाम आहे. वसूधा गावी परत जायच्या तयारीत असतांनाच अर्जून पाटीलच वेगळ्याच कारस्थानात गर्प आहे. तो शेखर आणि निशाला कायमचं वसूधाच्या दूर नेण्याकरता वसूधाविषयी शेखरच्या मनात नको ते वाईट भरवतो आणि त्याला नोकरी करण्याऐवजी गावातल्या वाड्यात जाऊन शेतीकडे लक्ष देण्याचा सल्ला देतो.

  तर समीर मात्र एका होटेलच्या मॅनेजरला मारल्याच्या आरोपात अडकतो. वसूधा गावी जायला निघालेली असतांना समीरच्या अटकेची बातमी तिच्या कानावर येते. वसूधाला गावाला जाण्याचा बेत रद्द करावा लागतो. पोलिसस्टेशनला गेल्यावर मात्र समीर फरार झाल्याचं कळतं. वसूधा पुन्हा लाचार होते. शेखर आणि नीशा गावी निघून गेलेले. समीर रानोमाळ भूमिगत होऊन पळतो आहे. नियती पुन्हा तिच्या सगळ्या इराद्यांवर पाणी फेरते...ती हताश होऊन घरी परतत असतांनाच संपदाला काही गुंड पळवून नेतांना तिला दिसतात. ती चंदू आणि त्याची माणसं आहेत. वसूधा आणि उमेश त्यांचा पाठलाग करतात. शेवटी जे नको तेच घडतं. चंदू संपदावर अतिप्रसंग करण्याचा प्रसंग करत असतांनाच वसूधाच्या हातून चंदूचा खून होतो. वसूधाला अटक होते. पण वसूधाला भेटायला शेखर येत नाही.

  समीरही दूबईला गेल्याचं उमेश वसूधाला सांगतो.अर्जून पाटील इन्स्पे. गायतोंडेला विकत घेऊन वसूधाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे बघायला सांगतो. वसूधाचं सर्वस्वच आता संपलं आहे. वसूधा आपला गुन्हा कबूल करते. तिला सात वर्षांची शिक्षा होते. तिची बदली नाशिकच्या जेलमध्ये होते. अर्जून पाटील आणि गायतोंडेचा डाव फसतो. पण पाटील गायतोंडेला वसूधाला नाशिक जेलमध्ये संपवायला सांगतो. वसूधा संपदाला मंदारकडे आणि नारायणची जबाबदारी उमेशला सोपवून निघून जाते. आणि नियती आपला शेवटचा वार करते...वसूधाला नेणारी पोलिसांची व्हॅन दरीत कोसळते आणि गाडीचा स्फोट होतो... काय आहे नियतीच्या मनात. वसूधा वाचणार की मरणार? वाचली तर तिचं काय होणार? ती परत पोलिसांच्या हवाली स्वत:ला करणार की, कुठे दूर निघून जाणार? आपल्या मुलांच्या, नवऱयाच्या सगळ्यांचा दूर... हे जाणण्याकरीता पाहात राहा मालिका ’मंगळसूत्र''

चित्रपट बातम्या

AddThis Social Bookmark Button
 

Add comment