"मिशन चॅम्पियन" हा मराठी यशस्वी चित्रपट निर्मिती करणा-या वीणा लोकूर आता आपल्याला दिग्दर्शिकेच्या भूमिकेत दिसणार असून येत्या १५ जुलै रोजी त्यांचा "प्लॅटफॉर्म" हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.
या चित्रपटाविषयी वीणा लोकूर यांनी सांगितले की, स्त्रीभृण हत्येवर अनेकदा बोलले आणि लिहीलेही गेले आहे. त्याबद्दल खूप ओरडही केली गेली आहे. आजही ब-याचदा मुलगी जन्माला आली की परिस्थीतीमुळे असेल, समजाचा पगडा आहे त्यामुळे असेल, पण अनेकदा असे होते की एकतर तिला जन्मल्यावर मारले जाते, कचरा कुंडीत टाकले जाते किंवा मुलींना कुठेतरी नेऊन सोडून दिले जाते, त्याही पलिकडे म्हणजे तिला दलालामार्फ़त कुठेतरी विकले जाते. यावर प्रत्यक्षात फारच कमी प्रकाश पडलाय..म्हणूनच या विषयावर हा चित्रपट करायचा असे ठरवल्याचे त्यांनी सांगितले.
या चित्रपटात त्यांची मुलगी सई लोकूर हीला लॉंन्च केले आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बेळगाव येथे करण्यात आले. "मिशन चॅम्पियन" या चित्रपटाच्या यशस्वीतेनंतर "प्लॅटफॉर्म" अतिशय गंभीर आणि वेगळ्या विषयावरील चित्रपटालाही प्रेक्षक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.