’२०१४ राज का रण’चं म्युझिक रिलिज

   महाराष्ट्राचं राजकारण अतिशय विस्कळीत झाल्याचं चित्र दिसतंय. यामुळे आजचा मराठी तरूण दिशाहीन झालेला आहे. अशात राज्याचे नेतृत्व करणारे राज्याच्या विकासाचा विचार न करता एकमेकांसोबत लढण्यात गुंग असतात. काय हे चित्र असंच राहणार? सामान्यांची निराशा अशीच होत राहणार? या राजकारणाचा चेहरा बदलायचा की नाही? असे अनेक प्रश्न तरूणांच्या मनात येत असतात. या प्रश्नांना पडद्यावर साकारणारा ’२०१४ राज का रण’ हा चित्रपट येत्या १० जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या गीतांची एम.पी.थ्री सीडी कलाकारांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आली.

   या चित्रपटात ४ गीते असून ती दिनकर शिर्के आणि महेश मुतालिक यांनी संगीतबद्ध केली असून ही दोन्ही गीते महेश कराडकर आणि भीमराव धुळबुळ यांनी लिहीली आहेत. या चित्रपटातील ’मोरया रे बाप्पा मोरया रे’ हे गीत प्रसिद्ध गायक शान यांनी गायलं आहे. ’मी मराठी, तू मराठी, आम्ही मराठी’ हे गीत अवधूत गुप्ते यांनी तर ’माझ्या मराठीचा झेंडा’ हे गीत राहुल सक्सेना आणि महेश मुतालिक यांनी गायलं आहे. तर ’बळीराजा त्याचं नाव’ या महेश कराडकर यांच्या गीतास रविंद्र साठे यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे.

   ’अभय पाठक प्रॉडक्शन’च्या या चित्रपटाला प्रदिप भोरे यांचं दिग्दर्शन असून अभय पाठक यांनी निर्मिती केली आहे. तर या चित्रपटात रमेश देव, प्रसाद ओक, दिपक शिर्के, संतोष जुवेकर, सुदेश म्हशीलकर, दिपक करंजीकर, दर्शन पाठक, महेश कोळी, कल्पेश पाटील यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपट बातम्या

AddThis Social Bookmark Button
 

Add comment