`अष्टसिध्दी पतिष्ठान' बॅनर-
खाली `साई महिमा' या साई
चरित्रावर आधारीत महानाट्याची
निर्मिती होत आहे. या नाट्यात
साईंच्या पकट दिनापासूनचा सर्व
पवास नृत्य, नाट्य व संगीताच्या
आविष्कारातून असंख्य कलाकारां
च्या संचात सादर होणार
आहे.
`साई महिमा' या महानाट्याचा
सोमवार, 12 डिसेंबरला
आजीवसन स्टुडिओ, जुहू येथे
गीतध्वनीमुद्रणाने मुहूर्त करण्यात
आला. ब्रम्हांडनायक या सुपसिद्ध
मालिकेतील श्री गजानन
महाराजांची भूमिका करणारे
वसंत गोगटे यांच्याहस्ते उद्घाटन
करण्यात आले. या
महानाट्यातील शीर्षकगीत
गायक रविंद्र साठे यांच्या सुमधूर
आवाजात स्वरबद्ध करण्यात
आले. या सभारंभास मराठी-हिंदी
नाट्यसृष्टी व चित्रपटसृष्टीतील
अनेक नामवंत कलावंत व तंत्रज्ञ
तसेच संस्थेचे मार्गदर्शक
शशिकांत शिंदे, दिलीप मेस्त्राr
उपस्थित होते.
आज 21व्या शतकात मानव
दररोज नवनवीन आव्हानांनी
जगाला बदलण्याचा पगतीशील
पयत्न करत आहे. ह्या
पयत्नांमुळे चांगल्या सोबत
समाजाला ऱहासाकडे नेणारे काही
वाईट बदलही होत आहेत. हे सर्व
बदलण्यासाठी हे महानाट्य एक
निमित्त बनून आपल्यांमध्ये परि-
वर्तनाचा संदेश घेऊन येत आहे.
`अष्टसिध्दि पतिष्ठान' ही
सामाजिक संस्था असून आजवर
संस्थेने अनेक उपकम राबविले
आहेत. समाजात पबोधनाचे कार्य
करणे हा संस्थेचा या मागील
विशेष उद्देश आहे. या सामाजिक
उपकमास अनेकांचा मदतीचा
हातभार लाभला आहे. साई
महिमा या महानाट्यात अनेक
नवोदित कलाकरांना अभिनयाची
संधी मिळणार आहे.