उपेंद्र लिमये झालाय गायक

  मधुर भांडारकर यांच्या ‘चॉंदणी बार’, ‘पेज ३’, ‘ट्रॅफीक सिग्नल’ आणि राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार राज’, ‘डार्लिंग’, ‘कॉन्ट्रॅक्ट’ या चित्रपटातील आपल्या तडफदार अभिनयानंतर मराठीतील ‘जोगवा’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता उपेंद्र लिमये आता आपल्याला गायकाच्या रूपात दिसणार आहे. 'जेआरडी एंटरटेन्मेंट' च्या आगामी 'चिरगूट' या चित्रपटासाठी उपेंद्र पार्श्वगायन करत आहे. दिलीप जगताप यांनी लिहिलेल्या आणि कनकराज यांनी संगीतबद्ध केलेल्या कविता स्वरुपातील गीताला उपेंद्र लिमये यांच्यासोबत साधना सरगम यांनी पार्श्वगायन केले आहे. या वेगवेगळ्या चित्रपटांतील त्याच्या या बहुरंगी भूमिकांना प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगलंच वाखाणलं आहे. त्यामुळे उपेंद्रला आता गायकाच्या रूपात प्रेक्षक किती पसंत करतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

चित्रपट बातम्या

AddThis Social Bookmark Button
 

Add comment