’कानबाई माझी नवसाची’ ३१ जुलैला चित्रपटगृहात
E-mail

येत्या ३१ जुलैला धुळे, शिरपूर, जळगावसह उत्‍तर खानदेशात प्रदर्शित होत आहे. लाखो भक्‍तांचे श्रध्दास्थान असलेली कानबाई देवी आणि तिचे भक्‍तगण यांच्या निस्सीम भक्‍तीचे यथार्थ चित्रण यात करण्यात आले आहे.
’स्टुडिओ विधी व्हाईस’ बॅनरखाली तयार होत असलेल्या ’कानबाई माझी नवसाची’ या धार्मिक-कौटुंबिक चित्रपटाच्या सह-निर्मात्या शिल्पा भद्रिक वीरा आहेत. भक्‍ती हीच शक्‍ती याची सत्यता पटवून देणा-या या चित्रपटाची कथा संकल्पना विश्राम बिरारी यांची आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन सुभाष घोरपडे यांनी केले आहे. चित्रपटातील देवीच्या भक्‍तीपर गीतरचना जगदिश देवपुरकर, मंगला रोकडे, राजेश बामगुडे, शिरीष कुलकर्णी यांच्या असून, त्यांना संगीतकार अशोक वायंगणकर यांनी संगीत दिले आहे. गायक रविंद्र साठे, शकुंतला जाधव, नेहा राजपाल, ऋचा देवरे बिरारी, शशिकांत मुंबरे यांच्या सुरेल आवाजात ती स्वरबध्द करण्यात आली आहेत. चित्रपटाचे कला दिग्दर्शन वासु पाटील यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन राजू नायडू यांनी केले आहे. चित्रपटाचे छायांकन चारुदत्‍त दुखंडे यांनी तर संकलन फैसल-इम्रान यांचे आहे. निर्माती व्यवस्था प्रविण जाधव, संजय पाटील यांनी सांभाळली आहे.
कण्हेरनी कानबाई अर्थात शंकराची पत्‍नी पार्वती माता. खानदेशात आई कानबाई देवी खूप प्रसिध्द आहे. मिता जयेश वीरा निर्मित ’कानबाई माझी नवसाची’ चित्रपटात अलका कुबल, यतिन कार्येकर, प्रकाश धोत्रे, प्रदिप कोथमिरे, अंशुमाला पाटील, शिवानी कराडकर, गणेश दिवेकर, योगेश महाजन, निशा परुळेकर, स्नेहल देसाई, कमल ठोके, सुरेंद्र साठे, नितीन कदम, बालकलाकार मानसी घोरपडे, सिध्दी कांबळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. कानदेवीच्या श्रध्देचे माहत्म्य सांगणा-या ’कानबाई माझी नवसाची’ हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल अशी आशा आहे.

AddThis Social Bookmark Button