’मान सन्मान’ चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित
E-mail

चित्रपटात करण्यात आला आहे. राकेशकुमार मेहता यांची निर्मिती असलेल्या ’मान सन्मान’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण राजा कारळे यांनी केले आहे.
शिवाजी साटम, रिमा लागू, रेशम टिपणीस, यतिन कार्येकर, पंकज विष्णू, अविष्कार दारव्हेकर, मेघा घाटे, आशिष पवार या कलाकारांच्या यात महत्‍त्वपूर्ण भूमिका आहेत. गीतकार अविनाश घोडके, डॉ. सुनंदा पालवणकर, सागर खेडेकर यांनी लिहिलेल्या यातील भावगर्भ गीतांना संगीतकार चिनार-महेश यांच्या संगीताची साथ लाभली आहे. ’मान सन्मान’ चित्रपटातील गीतांच्या ध्वनीफितीचे प्रकाशन ’टी. सिरीज’ चे जनरल मॅनेजर (AMR) श्री. अजित कोहली, सुधाकर बोकाडे यांच्या हस्ते मुंबईतील ’रिक्रिएशन क्लब’ येथे नुकताच संपन्न झाला आहे. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. ’टी. सिरीज’ कंपनीने ’मान सन्मान’ चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित केली आहे.
या चित्रपटात ५ गीते असून ती पुढीलप्रमाणे -

गीत गीतकार गायक
१. निळ्या सावळ्या रुद्रपित्याचा... अविनाश घोडके रविंद्र साठे, साधना सरगम
२. पिवळे पिवळे हरीण... सागर खेडेकर विजय प्रकाश, पल्लवी प्रसाद
३. दिल दारा वे... मनोज यादव सुझेन डिमेलो
४. डॅडी आणि मम्मीविना... डॉ. सुनंदा पालवणकर सचिन मुळे, सावनी रविंद्र, अनिरुध्द जोशी, पल्लवी प्रसाद, अनन्या वाडकर
५. आई... डॉ. सुनंदा पालवणकर अनिरुध्द जोशी, सचिन मुळे, सावनी रविंद्र

’मान सन्मान’ चित्रपटातील प्रत्येक गीत हे वेगवेगळ्या भावछटा रेखाटणारे आहे. दुभंगलेल्या कुटुंबव्यवस्थेत आलेली पोकळी चित्रीत करणा-या ’मान सन्मान’ ची कथा के. इकबाल यांची असून पटकथा-संवाद शशांक केवले यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझायनर म्हणून एम. एस. साळवी काम पाहत असून संकलन सनील कोकाटे करीत आहेत. या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी भरत वोरा, राजेंद्र माणीक सांभाळीत असून छायाचित्रण अनिकेत खंडागळे यांनी केले आहे. कला दिग्दर्शन मनोहर आचरेकर यांचे असून ध्वनी संयोजन प्रकाश निकम यांचे आहे.
’मान सन्मान’ ७ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे, त्याअगोदर यातील सुश्राव्य गीतांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

AddThis Social Bookmark Button