मोतीलाल नेहरू ते राहुल गांधी : एक दृष्टी़क्षेप
मोतीलाल नेहरू ते राहुल गांधी : एक दृष्टी़क्षेप

९०

सोनियाजींचा राजकारण प्रवेश "शक्याशक्यतेची कला म्हणजे राजकारण असेलही कदाचित; पण त्याला सत्याचा दृढ आधार मात्र असायला हवा. मला हे भारतानंच शिकवल. खर तर भारतानं मला काय काय शिकवलं हे सांगताही येत नाही माझं भारतातील आयुष्य हे निरंतर शिक्षणाची प्रक्रिया आहे. राजकारण्याच्या धामधुमीत प्रत्यक्ष सहभागी होताना जे काही मी जगले, ती संपूर्णपणे एका नव्या शोधाची प्रक्रिया होती."हा सुखसंवाद ह अंतर्मनातून प्रकटलेला होता. हे त्यातील विचारांचा धांडोळा घेताना आढळते. एखाद्या निकटच्या मैत्रिणीला विश्वासात घेवून मन मोकळं करावं, तसा हा प्रकार होता आणि त्यातून भारताचं मन जगाने ओळखलं असेल, जरी सोनिया गांधी

या जन्मानं परदेशीय होत्या तरी तितक्याच राजीव गांधींवर प्रेम करताना, त्यांच्याबरोबर संसार थाटतना जे मनातले भाव त्यांनी आपल्या पतीशी प्रकट केले असतील त्यांचं प्रतिंबिंब या त्यांच्या भाषणात निश्चितच प्रतिबिंबित झालेलं दिसतं म्हणूनच त्यांच्या विदेशीपणाचा प्रश्‍न केवळ रजकीय विद्वेषापायी विरोधकांनी ताणण्याची जी खेळी निवडणूकीत खेळली गेली त्यांचं पारदर्शक उत्तर यापेक्षा वेगळं काय असू शकतं? आपल्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "माझं खासगी कौटुंबिक आयुष्य एखाद्या शांत जलाशयाप्रमाणे होतं. तिथून सार्वजनिक जीवनाच्या वादळात मी आले. हा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासातील अडचणी आणि वेदना मी अनुभवल्या. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे माझ्या त्या अस्तित्वानं मला दोन्ही मिळलं समाधन आणि प्रयोजन! मला भारताचा शोध लागत गेला. "भारताचा शोध ही अशी गोष्ट आहे की, एखादा निष्कर्ष हाती येतो यासाठी शोधाची भूक आणखी आणखी वाढती जाते. भारताच्या आकलनाची प्रक्रियाएवढी समृध्द करणारी असते की, स्वत:लाही स्वत:चंही आकलन होत जातं आयुष्याला ठोस प्रयोजन मिळतं ते भारतानं मला दिलं" हा जो सोनियाजींचा भाषणाचा शेवटचा परिच्छेद आहे त्याचा अनुभव भारतातल्या आजच्या किती राजकारण्यांना असेल? त्यांच्या ठायी एक तर पूर्व-ग्रहदूषितता दिसेल अथवा त्यांच्यातला देशासाठी समर्पण करण्याची भावनाच हरपलेली असेल, असं म्हटलं तर ते वावगं ठरले असं वाटत नाही. सत्य हे नेहमी सत्यच असतं. ते नाकारण्यानं त्याचा अपलाप होत नाही. सोनियाजींचं हे भाषण जितका सुखसंवाद आहे तितकच ते चिंतनात्मकही आहे. चिंतनात्मकतेता आपण आपल्या मनाचे पदर आपल्याशीच उलगडावेत असं. त्या विदेशात जन्मल्या, विदेशी संस्कारात वा लहानाच्या मोठ्या झाल्या पण भारताची सून झाल्यानंतर त्यांनी भारताला इतकं आपलं मानलं ही भारताच्या ’भा+रत’ याचा उलगडा त्यांना योग्य प्रकारे झाला. ज्यादेशात जन्मलो त्या देशाचे मनोगत आपल्याला कळ्तंच असं नाही त्यासाठी जिवाशिवाची गाठ पडावी लागते आत्म्याशी आत्म्याला सुसंवाद साधला जावा लागतो. पण बहूधा आपण अमूक देशात जन्मलेले हे बाह्यरूप पांघरूनच आपण वावरत असतो. यात अतिशयोक्ती होत असेल पण ती अपरिहार्यआहे. But one thing is certain that though she has been adopted by Bharat through the marriage in the Gandhi family, she also simultaneously adopted the very soul and spirit of Bharat which is the very luminous country in the entire world and the world of to day is realizing it better than nearest yesterday with much better comprehensively! मला वाटतं असं म्हणताना मी काहीच चूक करीत नाही कारण Hate is not the fate of my thinking process!
९१
भारताची सून मागच्या प्रकरणाचा शेवट करताना मी म्हटलंय, she also simultaneously adopted the very soul and the spirit of Bharat. Adoption ही एक मानसिक प्रक्रिया असते. कोवळ्या व अपरिपक्व मनात ती थाटण्यास वेळ लागत नाही. पण एका विशिष्ट समाजाच्या परंपरेत वाढलेल्या, परक्या देशात लहानाची मोठी झालेल्या परिपक्व मनाच्या अवस्थेत वेगळ्या देशाशी मनाच्या भावना जुळल्या जाण हे कठिण असतं. स्थलांतरितकरु शकतात ते मानसिक एकरूपतेच्या प्रक्रियेतून नव्हे तर वैचारिक तडजोडीच्या स्वरूपात, त्यातून मानसिक नातं जुळतं असं नाही; किंबहूना नाहीच.आजभारतीय परदेशांत स्थिरस्थावर होण्यासाठी (नोकरीसाठी) गेले आहे आणि तेथे settle झाले आहेत त्यांना आपल्यावरच्या पारंपारिक आणि सांस्कृतिकवातावरणच्या खाली आपल्या मातृभूमीची ओढ लागलेली असतेच व जमेल तशी रजा घेऊन ते तीन-चार आठवडे का होईना आपल्या स्वत:च्या देशात प्रदेशात येतच असतात पण त्या परदेशात जन्माणारी त्यांची मुलंबाळं अथवा त्या पिढ्या यांना ती ओढ असेलच असे नाही. खुद्द भारतात जन्मलेली व वाढलेली इंदिराजींची सून ही त्या घरात आपलं व्यक्तिमत्त्व समर्पित करू शकली नाही पण सोनियाजींनी ते केलं म्हणून तीइंदिराजींची आवडती झाली आणि इंदिराजींनी मुलीसारखं प्रेम दिलं. मेनकाच्या बाबतीत जे काही घडलं त्याचं वर्णन एकाच संकल्पनेत करता येईल व ती म्हणजे ’a clash of personalities' आणि त्यांचा उदभव हा दोन वेगवेगळ्या identities मधला होता. There was never asubmersion between them. अर्थातच ’पिण्डे पिण्डे मतिर्भिन्न:’ मेनका ही विशिष्ट वैचारिक प्रक्रियेखाली वावरत होती तर सोनियाजी याविशिष्ट समर्पित भावनेखाली, म्हणजे मानसिकतेनं. आपण जेव्हा ’नात’ असं म्हणतो तेव्हा आपल्या विचारांचा ’दोन मनाच एकत्र जुळणं दोन व्यक्तिमत्त्वांचं एकमेकांत सख्य निर्माण होणं या मानसिकतेचा भावार्थ अभिप्रेत असतो. अशा नातेसंबंधात त्या दोन मनांचा पारस्परिक ’संवाद’जुळावा लागतो. सोनियाजी ही किमया करू शकल्या आणि म्हणूनच कायावाचामने करून त्या भारताच्याच झाल्या. नेक्सस इन्स्टीट्यूपूढे (नेदरलॅंड) त्याच्या झालेल्या भाषणाबद्दल मी गेल्या प्रकरणात she was thinking aloud असं म्हटलं आहे त्याचा भावार्थ नेमकाहात आहे. टाईम मॅगझीननं जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींत सोनियाजींचा समावेश केला आहे त्यामागे नेमकी उपरोक्त प्रक्रियाच त्यांच्या कार्यबरोबर प्रभावी ठरलेली असावी. सोनियाजीनी म्हटलं आहे"भारताचा शोध मी पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्ष जगण्यातून घेतला आहे." हा उपरोक्त प्रक्रियेचाच पुरावा म्हणता येईल. एकरूप किंवा तद्रूप होण म्हणजे काय हे एकरुपतेतून अथवा तद्रूपतेतूनच अनुभवायचं असतं कारण ती एक व्यक्तिनिविष्ट प्रक्रिया असते पण अंगभूत नसते. जिथं Mind and though यांचं पारस्परिक मिलन होतं तिथंच ते संभवत. सोनियजी यांनी भारताचं राजकीय स्वीकारलं नसलं तरी त्या कॉंग्रेसच्या नेत्या आहेत; पण इंदिराजी व्यतिरिक्त इतर कोणाही कॉंग्रेस अध्यक्षाचाजनतेच्या मनावर जो प्रभाव पडलेला आहे त्याचं इंगीत माझ्या मते त्यांनी या भूमीशी य मातीशी समर्पित भावनेनं जोडलेल्याना त्यांतच आहेअसं मला वाटत.राजकीयदृष्ट्या त्या गांधी घराण्याच्या सून म्हणून त्यांचा हा प्रभाव आहे हे मूल्यांकन माझ्या मते सार्थ नाही वास्तविक राजीव गांधीची हत्या होऊनमध्ये बराच काळ गेला आणि त्या काळात इतर पक्षांची आघडी सत्ताधारी होऊन गेली आणि काही राज्ये वगळता कॉंग्रेस पक्ष नगण्य ठरण्याच्या अवस्थेत असताना सोनियाजीनी पुन्हा धुळीतून कॉंग्रेस पक्षाला संजीवनी देऊन राजकारणात पुन्हा प्रतिष्ठाप्राप्त करून दिली. राजकीयदृष्ट्या कॉंग्रेस नेहमीच प्रभावी ठरले हे छातीठोकपणे कुणीही सांगू शकणार नाही, कारण मतदार हे विचारांवरअवलंबून नसतं ते मतदारांच्या जीवनातील कमी होणार्‍या दैनंदिन समस्यांवर आधारून राहतं, त्याचे हितसंबंध जपण्यातून होत असतं, हाआपला नेहमीचा अनुभव आहे कारण सर्वसामान्य जनतेचं राजकारण असतं ते फक्त दोन वेळची भाजी-भाकरी सुलभतेनं मिळ्वण्यावरअसतं देशापुढच्या अनेक जटिल समस्यांना तोंड देत त्यांनी आपल्या आघाडीचे सरकार चार वर्ष टिकवून ठेवलं, लोकांसाठी अनेक योजना हाती घेऊन व विशेषत: पहिल्या वर्गाला सक्षम बनविण्याच्या दॄष्टीनंअनेक ठोस पावलं टाकली आघाडीतील अनेक दबावांना आता पावेतो सामंजस्यांना तोंड दिलं आणि कन्या प्रियांका व पुत्र राहूल यांच्यावर आपल्या विशिष्ट राजकारणाची संस्कार करून उद्याच्या नेतृत्त्वाला आकार देण्याचं काम केलं आहे. ’घराणेशाही’ ही संकल्पना माझ्या दृष्टीनं एक Misnomer आहे. कारण नवी रक्त पक्षात यावं ही पक्षसंघटनेच्या विकासाचीचएक अपरिहार्य प्रक्रिया आहे. एका विशिष्ट राजकीय विचाराच्या आणि तदनुषंगित संस्कारात वाढणारी नवी पिढी तौलनिक दृष्ट्यासक्षम ठरत असतेच परंतु व्यक्ति स्वातंत्र्याची व व्यक्तीच्या हक्काची बूज राखणार्‍या आपल्या देशात एकादा नव्यापिढीतला मुलगा अथवा मुलगी ही त्या नेतृत्त्ववादी घरात जन्माला आली असेल तर तो त्यांचा काय दोष? त्यांना त्यांचे हक्क का नाकारावेत? हाप्रश्‍न निश्चितच उपस्थित होतो. कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेनं आपल्या पक्षासाठी कार्य करावं याला कोणी बंदी केलेली आहे का? भा.ज.प.मध्ये प्रमोदमहाजन यांनी किंवा शिवसेनेत आनंद दिघे जे स्थान आपल्या कार्यानं त्यांच्या मृत्यूपूर्वी प्राप्त केलं होतं ही कार्यकर्त्यांच्यासमर्पित भावनेची उदाहरणं आहेतच ना? अंतर्गत वादावादीनी आणि संघर्षानं अन्य पक्ष जर कमकुवत होत असतील तरदोष कोणाचा? आज राजकारण्यांना सर्व ’रेडीमेड’ हवं आहे, हेच या सुंदोपसुंदीचं कारण असून लोक तो प्रकार पाहत आहेत.अगदी निम्नस्तरातील लोकांना केंद्रीभूत मानूनच लोकशाहीची वाटचाल सुकर होत असते. नेहरू-गांधी कुटुंबाची घराणेशाही विरोधी पक्षांना दिसते पण तेवढा समर्पित भावनेनं त्याग करण्याची तयारी किती राजकारण्यांपाशी आहे?
९२
राजकीय प्रशिक्षणाचे धडे सोनिया गांधीनी कॉंग्रेस संघटनेची सूत्रे हाती घेतली त्या प्रवासात अनेक भल्याबुर्‍या प्रसंगाना त्यांना तोंड द्यावे लागले. पणत्याचे राष्ट्रीय प्रशिक्षण कसे आकारत गेले याची माहिती असणे आवश्यक आहे. राजकारण हे जसे व्यक्तिनिष्ठ असते तसेच किंबहूना त्यापेक्षाही आधिक ते समोर येणार्‍या परिस्थितीशी अधिक निगडित असते. या दोन्हींच्या समन्वय साधण्याची दृष्टीज्याच्यापाशी असते तेच खर्‍या अर्थानं नेतृत्व करू शकतात.राजकारणापासून अलिप्त राहू पाहाणार्‍या राजीव गांधींना नाईलाज म्हणून राजकारणात उतरावं लागलं.पण त्या अलिप्ततेमधूनही त्यांच्या ठायी नकळत एक राजकीय नेतृत्वाचा अंकूर वाढत होता. नेमकी तीच गत सोनियाजींचीही झाली खरं तर राजीव गांधी रजकारणात उतरले तर त्यांच्या जीवनातून आपण निघून जाऊ अशी सोनियाजींनी धमकीही दिलीहोती राजीव आपली दोन मुले यांच्यासाठी त्या एखाद्या ’वाघिणी’ सारख्या लढल्या असा अभिप्रायही त्या राजकारणात ओढल्या जाण्यापूर्वी व्यक्त झाला होता. राजीवजी राजकारणात पडले तर ते विनाशाकडे जातील अशी पुसटशी भीती त्यांच्या मनात होती तरळत होती.’परंतु पुढं मला जाणवलं की, इथं पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढायला ती गोष्ट अटळ आहे’ अशी त्यांची खात्री झाली. राजीव गाधींच्या राजकारणातील प्रवेशामुळे सोनियाजींच्या जीवनावर बराच परिणाम झाला. त्यांनी पाश्चिमात्यपेहेराव सोडून दिला आणि १९८३ मध्ये त्यांनी आपलं इटालियन नागरीकत्व सोडून भारताचं नागरीकत्वच अंगीकारलं. राजीवजींच्या बरोबर त्या राजकीय दौ‍र्‍यावर जात. त्यावेळी अन्य फावल्या वेळात राजीवजी त्यांना भारतीय इतिहासातीलबारकावे समजावून देत आणि शास्त्र व तंत्र नामुळं भारताचा कसा काया पालट होऊ शकेल याबद्दलही ते सोनियाजींशीभरभरून उत्साहात बोलत हळूहळू सोनियाजीना त्यात अधिकाधिक रस वाटत गेला राजीव गांधीचं भारताच्या भावी काळाचंस्वप्न त्यादेखील पाहू लागल्या इथंच भारताबद्दलची खरी ओढ त्यांच्या ठायी रूजू लागली. राजीव गांधी पंतप्रधान होते त्याकाळात (१९८४ ते १९८९) सोनियाजी राजकारणातले बारकावे समजून घेत होत्या तरीत्यांनी प्रत्यक्षात राजकारणापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच एक छोटंसं मित्रमंडळ होतं त्यात काही युरोपीय व भारतीय व्यक्ती होत्या. मंडळीही आठवड्यातील एक दिवस, बहुधा रविवार, त्यांच्या ७ रेसकोर्स रोड येथेएकत्र जमत व दिलखुलास गप्पा मारीत. या गप्पा फ्रेंच, स्पॅनिश अथवा इटालियन भाषेत असायच्या त्यात उद्योजकव कनिष्ठ राजनैतिक अधिकारीही असत. ते सर्व एकत्र नाश्ता घेत. त्यात बोफोर्स प्रकरणात प्रसिध्द झालेले क्वात्रोचीहीअसत. आणखी एक विदेशी व्यक्ती म्हणजे सोनियाजींची बहीण नादिया ही असे. नादियानं स्पॅनिश व राजनैतिक अधिकरीजोसे व्हाल्डोमोर यांच्याशी लग्न केलं होतं नाशत्याचे सगळे पदार्थ सोनियाजी स्वत: करीत. सोनियाजींची सौंदर्य प्रसाधन सल्लागार सोनियाजीना देशी (भारतीय) सौंदर्य प्रसाधनाची आवड असे. असे सांगत उत्तरप्रदेशच्या मायावती आणि सोनियाजींची सौंदर्य प्रसाधन सल्लागार ख्यातनाम शहनाज हुसेन ही एकच होती. त्यांचा मार्फत सोनियाजींची त्यावेळी मायावतींशी ओळख झाली होती. या मैत्रीतूनच १९९९ मध्ये वाजपेयी सरकारविरूध्द मतदान करूनते सरकार पाडले होते. मायावतींचा उत्तर प्रदेशातील दलित वर्गावर प्रभाव होता. इंदिराजींच्या निर्घण हत्येनंतर राजीव गांधीनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली पण बोफोर्स तोफांच्या खरेदीत झालेल्यातथाकथित भ्रष्टाचारात विरोधकांनी राजीव गांधीना गोवलं(या बोफोर्सचं वेगळं समग्र प्रकरण पुढे येईलच). विरोधी पक्षांच्याहातांत एक कोलीत मिळालं आणि त्या प्रकरणाची छाया दीर्घकाळपर्यंत कॉंग्रेस पक्षावर पडलेली राहिली. या प्रकरणाचा विरोधी पक्षांनी आणि वृत्तपत्रांनी एवढा गाजावाजा केला की, १९८९ सालच्या निवडणूकीत राजीव गांधींचा व कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यामुळे सोनियाजींच्या नेहमीच्या प्रसन्न मुद्रेवरचं हास्य मावळलं.राजीव गांधी पराभूत झाल्यानं ते आपल्या खासगीजीवनात सोनियाजींबरोबर बराच वेळ घालवीत राजीव गांधींनी त्या काळात पश्चिम उत्तर प्रदेश ते लखनौपर्यंतच्या आगगाडीच्यासाध्या डब्यातून, गर्दीतून आपल्या सदभावना यात्रा केली होती त्यांच्या या साधेपणामुळं तेथील जनता त्यांच्याकडे फार मोठ्याप्रमाणावर आकर्षित झाली होती.

- (Source - नवसंदेश)

AddThis Social Bookmark Button