Subscribe For Newsletter   
Hello Sign In New user? Start here.
google facbook twtter
 
 
zagmag

‘प्रियतमा’.... खडकाळ माळराणावर फुललेलं एक हळवं प्रीतस्वप्न...

‘प्रियतमा’.... खडकाळ माळराणावर फुललेलं एक हळवं प्रीतस्वप्न... सहज फुल उगवावं तसं मनातून अलगद उगवलेलं... तिच्या आणि त्याच्या मनातलं.... कधी हळूवार, नाजूक तर कधी तीव्र ओढ लावणारं त्यांच प्रेम, याच प्रेमाची उत्सुकता वाढवणारी कहाणी असलेला ‘प्रियतमा’. हा मराठी चित्रपट समस्त प्रेमिकांच्या आवडत्या दिवशी म्हणजेच ‘व्हेलेंण्टाईन डे’ ला १४ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीस येतोय. सेजल शिंदे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश मोतिलिंग यांनी केलंय.

शेक्सपियरच्या ‘ रोमियो-जुलियट’ या उत्कट प्रेमकहाणीची आठवण करून देणा-या ‘ प्रियतमा’ चित्रपटात नायकाच्या भूमिकेत सिध्दार्थ जाधव झळकणारा असून त्याची नायिका असणार आहे गिरीजा जोशी... सिध्दार्थच्या आजवरील चित्रपटांमधील एक वेगळा बाज आणि लूक असलेला हा चित्रपट ठरेल हे निश्चित!

या चित्रपटाची कथा सचिन दरेकर यांची असून संवाद सचिन दरेकर, प्रशांत लोके यांनी लिहले आहेत. ‘प्रियतमा’ ला संगीत चैतन्य अडकर यांनी दिले असून कला दिग्दर्शन मनोहर जाधव यांनी केलंय. गीतकार- प्रकाश होळकर, अभय इनामदार, सिनेअमॅटोग्राफी- सतीश मोतिलिंग, संकलन- प्रितम नाईक, ध्वनी- गिरीश तवाडिया, नृत्य दिग्दर्शन- फुलवा खामकर अशी इतर श्रेयनामावली आहे.

------------------