Sign In New user? Start here.

Fathers Day

 Kavita
१७ जून २०१२

बोट धरून चालणं शिकवण्यापासून ते जगताना येणा-या प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत करणारं एक नातं सतत आपल्यासोबत असतं. जे आपल्या चुकीवर आपल्याला फटकावतं, रागावतं आणि शेवटी समजावूनही सांगतं. समोरा समोर असताना तडफदार वागणं आणि समोर नसले की, हळव्या मनाने आपली विचारपूस करणारं नातं, म्हणजेच ‘बाबां’शी असलेलं नातं...! हे एक असं नातं आहे ज्याची छाया सतत आपल्या सोबत असते. ते मग दु:खं असो की सुख असो. अशाच या नात्याबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी त्यांच्या खास आठवणी आणि गमती जमती ‘फादर्स डे’च्या निमित्ताने झगमग टीमशी शेअर केल्या....

चांगले संगीतकार आणि शिक्षक बाबा - मिथिलेश पाटणकर


खरंतर मी खूप लकी आहे की, असे बाबा मला मिळाले. ते संगीतकार असल्याने लहानपणापासून जे जे शक्य होतं ते ते त्यांनी मला शिकवले. जी वेगवेगळी वाद्ये ते वाजवायचे ती सर्व वाद्ये त्यांनी मला शिकवली. सगळ्या वाद्यांची त्यांच्यामुळेच मला ओळख झाली. त्यांनी सर्वात आधी मला तबला आणि पेटी शिकवली. मला अजून ही आठवतं की, प्रत्येक सुट्टीत ते माझ्या हाती एक नवीन वाद्य द्यायचे आणि ते वाजवायला शिकवायचे. त्यामुळेच ११ वी, १२ वी पर्यंत सर्वच वाद्य मला वाजवता आली. वाद्यांची अंग जाणून घेता आली.Read more..

प्रिय बाबा - सौ. अदिती मोहिले

आभार या computer चे कारण मी इतक्या प्रस्तावना सुरु केल्या आणि परत खोडल्या की कागदावर लिहित बसले असते तर खूप कागद फुकट गेले असते. (हातात पेन घेऊन लिहायची सवय गेलीये ही गोष्ट निराळी). बाबा, तुमच्याबद्दल लिहायला योग्य न्याय देईल अशी सुरुवातच सापडत नाहीये आणि याला एकाच कारण आहे की तुम्ही इतके dynamic आहात की तुमच्या कुठल्या एका गोष्टीबद्दल बोलले तर तो दुसऱ्या खुबीवर अन्याय होईल. Read More..

माझे सर्व सिक्रेट्स बाबांना माहित आहे - स्वानंदी टिकेकर

‘रंगत संगत’, ‘काफिला’, ‘सातच्या आत घरात’, ‘अनोखे हे घर माझे’, ‘बागी’, ‘लाल सलाम’ ‘सतरंगी रे’ या अनेक गाजलेल्या चित्रपटातून, वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे उदय टिकेकर. ते एक चांगले अभिनेते असल्याचे आपणा सर्वांना माहित आहेच. मात्र ते एक वडील म्हणून कसे आहेत, आपल्या घरासाठी कसा वेळ काढतात, काय धमाल करतात याबाबत सांगते आहे त्यांची मुलगी स्वानंदी टिकेकर.... Read more..

अतिशय डिसिप्लिन आणि वर्कोहोलीक - रोहन मंकणी


‘स्वामी’ मालिकेतील माधवराव पेशवे, ‘त्रिकाल’मधील ठाकूर हरीसिंग किंवा ‘शांती’ मालिकेतील सिद्धार्थ सिंघानिया ह्या भूमिकांसोबत अनेक गाजलेल्या नाटकातील या अभिनेत्याच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्या स्मरणात आहेत. ह्या भूमिका केल्या त्या प्रसिद्ध अभिनेते रविंद्र मंकणी यांनी...मालिका आणि नाटकांसोबतच अनेक चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्यात. Read More..

झगमगच्या मुख्य पानाकडे